बंधुत्व-अभाव

(एक)
दर माणसामागे किती जमीन उपलब्ध आहे असा विचार केला, तर प्रत्येक अमेरिकन हा प्रत्येक भारतीयाच्या सुमारे अकरा पट ‘जमीनदार’ आहे. दोन्ही देशांमधल्या जमिनीकडे पाहायच्या दृष्टिकोनांत अर्थातच बराच फरक आहे. हा फरक सर्वांत तीव्रतेने दिसतो तो प्लॉट-फ्लॅट या संबंधातल्या रीअल इस्टेट उद्योगात.

भारतीय माणसांना मालकीचे घर असणे, त्यात दरडोई ऐसपैसपणा असणे, ते फॅशनेबल वस्तीत असणे, जमल्यास ‘फ्लॅट’ऐवजी बंगला असणे, या गोष्टींचे फार अप्रूप वाटते. राजधानी दिल्लीत तर बंगल्यांना ‘कोठी’ म्हणतात, जो शब्द महाराष्ट्रात अन्नधान्य साठवण्याच्या खोलीसाठी किंवा पत्र्याच्या मोठ्या डब्यांसाठी वापरतात! यामुळे भारतीय माणसे घरे घेण्याऐवजी बांधून घेणे श्रेष्ठ समजतात. आधी जमीन विकत घ्यायची, मग आर्किटेक्ट शोधायचा, ठेकेदार शोधायचा, त्याच्याशी कमीजास्त लवचीक करार करून घर बांधून घ्यायचे; असा हा प्रकार असतो. त्यातला प्रत्येक टप्पा अत्यंत जिकिरीचा असणार, वेळखाऊ असणार, या खात्रीतून म्हण घडली आहे, ‘घर पाहावे बांधून’! आजकाल यात वास्तुशास्त्र, फेंगशी वगैरे प्रकारही आले आहेत. असे सांगतात,की आधुनिक काळातील सर्वांत महाग महाल, तब्बल सहासात हजार कोटी रुपयांचा, बराच काळ वास्तु-फेंग शी प्रकारामुळे रिकामा राहिला. भारतीय पद्धतीने थोडा खर्च करून प्रश्नसोडवले गेले, आणि मगच घर वापरात आले. एकूण हा उच्चमध्यमवर्ग व त्याच्याही वरच्यांसाठीचा व्यवहार आहे. मध्यमवर्ग शहरी लोक तयार फ्लॅट विकत घेतात. यात उपलब्ध पैसे हा कळीचा घटक असतो. यानंतर फ्लॅट कोणत्या वस्तीत आहे, किती मोठा आहे, बिल्डरचे नाव कसे आहे, इत्यादी घटक येतात. पण सारे काही मुळात खिसा तपासून वेगवेगळ्या तडजोडी करण्यातलेच असते.

अगदीच पैसा नसेल तर वेगवेगळ्या सरकारी योजना शोधून तकलादू, गावाकडेची घरे व फ्लॅट्स यांवर समाधान मानावे लागते. या सर्व टप्प्यांत घर फ्लॅट भाड्याने घेणे हा पर्यायही असतो, पण बहतांश भारतीय असे करणे तात्पुरते आहे, आणि अंतिगतः गालकीचे घर फ्लॅट घेणे आहे, असेच सगजतात. अशा सर्व व्यवहारांत जी बाजारपेठ वापरली जाते ती विक्रेत्याच्या नियंत्रणात असते. विक्रेता म्हणेल ती किंमत, म्हणेल तो दर्जा स्वीकारावाच लागतो. एक खरेदीदार नाही म्हणाला, तर इतर ग्राहक मी घेतो/घेते म्हणायला तत्परतेने रांग लावून उभे असतात. पण २००५-०७ च्या सुमारास नागपुरात काही काळ गंगा उलटी वाहिली. चौकाचौकात पंचविशीतली तरुण मुले प्लॉट/फ्लॅट विकणे आहे अशा अर्थाची पत्रके वाटत उभे राहू लागली. यात पाचदहा टक्के मुलीही दिसत. पत्रके अगदी वाईट कागदावर वाईट छपाईची असत, पण पाचदहा टक्के गुळगुळीत कागदांवर बरी बहुरंगी छपाईही दिसत असे. ही मुले सुमारे दोनेक महिने दिसली, व नंतर नाहीशी झाली. एरवीही असे मौसमी उद्योग दिसतात; होळीच्या सु राला रंग आणि पिचकाऱ्या विकणे, राखी पौर्णि जवळ राख्यांचे स्टॉल, दिवाळीआधी फटाके दारोदार विकणे, वगैरे. रीअल इस्टेटही अशी फूटपाथवर येणे मात्र आधी-नंतर पाहिल्याचे मला तरी आठवत नाही.

याच सुमाराला टीव्हीवर ‘ग्लेनगॅरी ग्लेन रॉस’ (Glengarry Glen Ross) नावाचा चित्रपट दाखवला जात असे. त्यावेळी इंग्रजी चित्रपटांतील संभाषणांची ‘सब्-टायटल लिखित रूपे दिसत नसत. सुदैवाने वेगवेगळ्या वेळी चित्रपटाचे पुनःप्रसारण होत असे. याची मला तरी गरज होती, कारण संभाषणे वेगवान बोलीभाषेत होती. सुखाचा भाग म्हणजे भरपूर अपशब्द होते. हो, मी त्याबाबतीतला रसिक आहे!

सुरुवातीलाच एक तीव्र संभाषण आहे. त्याचे संपादित रूप असे :
ब्लेक : काही महत्त्वाचं बोलू या! (लेव्हीनला) तो कॉफीचा कप खाली ठेव! कॉफी फक्त सौदे पुरे करणाऱ्यांसाठी असते. (लेव्हीन तुच्छतादर्शक हुंकार भरतो). तुला काय वाटतं मी तुझ्याशी फकिंग करतोय ? मी फकिंग करत नाहीये. मी हेड ऑफिसातनं आलोय, मिच् अँड मरेकडनं. तु च्यावर दया दाखवतोय मी. तुझं नाव लेव्हीन नं?
लेव्हीन : हो.
ब्लेक : स्वतःला सेल्समन म्हणवतोस, रांड लेका?
मॉस : मला ही गटारगंगा ऐकायची नाहीये.
ब्लेक : नको ऐकू नं. तुम्हा सगळ्यांच्या नोकऱ्या अत्ता गेल्या आहेत. आठवड्याभराची मुदत देतोय, नोकऱ्या परत मिळवायला. आता कसे लक्ष देऊन ऐकतायत सगळे. या महिन्यात सेल्स स्पर्धेत नवा पेच आहे. सर्वांत जास्त जमीन विकणाऱ्याला कॅडिलॅक एल डोरेडो कार. नंबर दोनला काट्याचमच्यांचा सेट. नंबर तीन आणि चारची नोकरी जाणार.
मॉस : नाव काय तुझं ?
ब्लेक : ‘फक यू’. हे आहे माझं नाव! का माहीताहे? तू इथे यायला ह्यंदाई चालवत आलास. मी ऐंशी हजार डॉलर्सच्या बीएमडब्लूनं आलो.
मॉस : मग एवढा हिरो आहेस, एवढा श्रीमंत आहेस, तर आम्हा फटीचरांवर का वेळ वाया घालवतोस?
ब्लेक : (घड्याळ मनगटावरून काढत) घड्याळ पाह्यलंस? हे घड्याळ पाह्यलंस? तुझ्या कारपेक्षा महाग आहे. मी पावणेदहा लाख कमावले गेल्यावर्षी. तू? चांगला माणूस आहेस! जा घरी जाऊन पोरांशी खेळ ! पुढे ब्लेक एका दोरीला बांधलेल्या दोन पितळी ‘गोट्या’ काढून स्वतःच्या पुढ्यात धरतो. ‘ब्रास बॉल्स’ हे अमेरिकन बोलीत मर्दानगीचे प्रतीक आहे. ज्यांना मूळ संभाषण पाहायचे असेल त्यांनी Glengarry Glen Ross च्या विकिपीडियात जाऊन शेवटच्या संदर्भातील Coffee is for Closers वर जावे. पूर्ण संहिताही उपलब्ध आहेच.

कथावस्तू अशी : मिच् अँड मरे या रीअल इस्टेट विकणाऱ्या कंपनीच्या एका शाखा कार्यालयात एक व्यवस्थापक आणि चार विक्रेते असतात. हेड ऑफिसातला ब्लेक हा अधिकारी येऊन सांगतो, की विक्री वाढवा, नाहीतर नोकरी गमवा. एका विक्रेत्याला (रो) एक मोठा प्लॉट विकता येतो, तर इतर तिघांना (मॉस, अॅरोनॉव आणि लेव्हीन) काही जमत नाही. ब्लेकने संभाव्य गिऱ्हाईकांच्या पत्त्यांची यादी, ऊर्फ ‘लीड्स’, आणलेली असते. पण ही व्यवस्थापकाने विक्रेत्यांना दाखवायची नसते! “हे लीड्स म्हणजे सोनं आहे, पण ते तुम्हाला मिळणार नाहीत. कारण? कारण तुम्हाला ते देणं आणि कचऱ्यात फेकून देणं सारखंच! ते सौदे पटवणाऱ्या क्लोझर्सकरता आहेत.” रो ने विकलेल्या प्लॉटचा ग्राहकाने दिलेला चेक वटलेला नसतो. मॉस आणि अॅरोनॉव लीड्स चोरून मिच् अँड मरेच्या स्पर्धकाला विकायची योजना आखत असतात, इतके ते ब्लेकच्या शिव्यागाळीने दुखावलेले असतात. लेव्हीन वयस्क असतो. त्याची मुलगी गंभीररीत्या आजारी असते. तो खरेच लीड्स चोरतो, पकडला जातो आणि नोकरी आणि स्वातंत्र्य, दोन्ही गमावतो. एवढीच दोनेक दिवसांची स्त्रीपात्रविरहित गोष्ट आहे. डेव्हिड मेमिट (Devid Mamet) या प्रसिद्ध नाटककाराने ‘ग्लेनगॅरी ग्लेन रॉस’ लिहिले १९८३ साली. पुढच्याच वर्षी त्या नाटकाला पुलित्झर पारितोषिक मिळाले. नाटक शिकागोत सुरू होऊन न्यू यॉर्क, लंडन, सगळीकडे फिरले. प्रेक्षकांनीही सगळीकडे गर्दी केली, आणि सगळीकडचे समीक्षकही नाटकावर खूष झाले. लवकरच एका चित्रपटनिर्मात्याने बरीच रक्कम देऊन डेव्हिड मेमिटकडून चित्रीकरणाचे हक्क विकत घेतले. निर्माता व दिग्दर्शक फार काही नावाजलेले नव्हते, पण अनेक उत्कृष्ट नटांनी कामे करण्याची इच्छा व्यक्त केली. अखेर पात्रयोजना ठरली ती अशी –

हेड ऑफिस प्रतिनिधी ब्लेक : अॅलेक बॉल्डविन
व्यवस्थापक विल्यमसन : केव्हिन स्पेसी
‘यशस्वी’ विक्रेता रो : अॅल पॅचीनो
‘कालबाह्य’ विक्रेता लेव्हीन : जॅक ले न चोरी करायची इच्छा असलेले : एड हॅरिस
विक्रेते मॉस आणि अॅरोनॉव : अॅलन आर्किन

ही सर्व नावे हिंदी चित्रपटसृष्टीतील नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, ओ पुरी दर्जाची आहेत. बरे, काम न मिळाल्याने जराशा नाराज झालेल्यां धला रॉबर्ट डि’नीरोही असाच उच्च दर्जाचा आहे. चित्रीकरणाच्या काळातली आणिकही एक गोष्ट लक्षणीय आहे. एखाद्या दिवशी आपला प्रवेश नसलेले नटही आवर्जून इतरांचे काम पाहायला येऊन बसत! अखेर १९९२ साली चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षक, समीक्षक, कलाकार, पुरस्कार देणारे, साऱ्यांनी चित्रपटाचे भरपूर कौतुक केले. अभिनयाच्या अंगाने कमकुवत (स्टार, ॲक्टर नव्हे) समजल्या गेलेल्या बॉल्डविनच्या शिवराळपणाचेही कौतुक झाले. ‘डेथ ऑफ अ सेल्समन’ या जुन्या, प्रसिद्ध नाटकावरून या नाटकाला ‘डेथ ऑफ अ फकिंग सेल्समन’ म्हटले गेले आहे! मागे मराठी नाटकांपैकी ‘गिधाडे’, ‘सखाराम बाईंडर’ या नाटकांवर शेरेबाजी झाली होती, की स्टेजवरून शिव्या देण्यामुळेच नाटकांना गर्दी होत होती, मूळ कृती मात्र फार थोर नव्हत्या. अमेरिकन प्रेक्षकांना चार अक्षरी शिव्या सवयीच्या आहेत. त्यामुळे नाटक व नंतर चित्रपटांच्या लोकप्रियतेचे स्पष्टीकरण म्हणून शिवराळपणाला महत्त्व नाही.

मग चित्रपट कशामुळे गाजला ? उत्तम अभिनय, संयत आणि कल्पक दिग्दर्शन या बाबीही हॉलिवुड चित्रपटांत दुर्मिळ नाहीत. मग….? एक मला सुचलेले स्पष्टीकरण मांडतो. पाहा, पटते का ते. अमेरिकन समाज व्यक्तिस्वातंत्र्याला फार महत्त्व देणारा आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेतच ‘जीवन, स्वातंत्र्य आणि सुखासाठीचा प्रयत्न’ (Life Liberty and Pursuit of Happiness) यांना अत्यंत वांछनीय मानले गेले आहे. अमेरिका इंग्लंडपासून स्वतंत्र झाली १७७६ साली. त्याच वर्षी भांडवलवादाचा आदिग्रंथ मानले गेलेले अॅड स्मिथचे ‘द वेल्थ ऑफ नेशन्स’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

बाजार ही यंत्रणा आपोआप न्याय्य अर्थव्यवस्था घडवते, ही स्मिथची मांडणी. इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिका बाजारपेठेतल्या स्वातंत्र्याला, ‘मुक्त बाजारपेठे’ला जास्त महत्त्व देते. ‘बाजार जण काही अदृश्य हाताने संपत्तीचे न्याय्य वाटप करतो’, हे स्मिथचे मत अत्यंत आवाजी रूपात अमेरिका स्वीकारते आणि इतरांच्या गळी उतरवायला धडपडते. सोबतच स्मिथच्या ‘अदृश्य हाता’ची सौम्य टिंगलही केली जाते! सरकारने सर्व शक्ती बाजाराला बंधनांपासून मुक्त ठेवावयालाच वापरावी, असे अमेरिकेत बहान्य, बहुप्रतिष्ठित असलेले “शिकागो स्कूल अर्थशास्त्र’ मानते. याचा सर्वांत प्रसिद्ध पुरस्कर्ता आहे मिल्टन फ्रीडमन. या विचारातून कोणकोणत्या सरकारी कृती वेळोवेळी गैर मानल्या गेल्या याची काही उदाहरणे पाहू.

किमान वेतन कायदा नको, कारण बाजार आपोआपच सर्वांना जीवनावश्यक वस्तू व सोई-सुविधा पुरवतो. एखादे कायदेशीर किमान वेतन बाजारात विकृती आणेल. उद्योग चालवण्याच्या ठिकाणी सुरक्षेसाठीच्या साधनांवर आग्रह धरणारे कायदे असेच बाजारात विकृती आणतात. असुरक्षित किंवा थेट घातक वातावरणातही काम करू इच्छिणारे जर मिळत असले, तर महागड्या सुरक्षा व्यवस्था का उभारायच्या? कोणालाही नोकरीवरून कारण न देता काढून टाकण्याचा अधिकार मालकांना असायलाच हवा. मालक भांडवल पुरवतो, संसाधने पुरवतो, नफ्यातोट्याची जबाबदारी घेतो; त्यामुळे नोकरांना कामावरून काढून टाकण्याचा ‘मेरी मर्जी’ हक्कही मालकांना हवाच. ही यादी भरपूर वाढवता येईल. हा प्रत्येक अन् प्रत्येक विचार एका चुकीच्या गृहीतकावर आधारित आहे, की मालक आणि नोकर या दोन्ही घटकांना सारखेच निर्णयस्वातंत्र्य आहे, कारण त्यांची ताकदही साधारणपणे सारखीच आहे, प्रत्यक्षात मात्र फारदा कामगार वा नोकर दुर्बल असतो. त्याला जीवनावश्यक नसलेले वेतनही मान्य करावे लागते. त्याला सुरक्षा नसलेल्या परिस्थितीत काम करावे लागते. त्याला हर प्रयत्नाने मालकाची मर्जी सांभाळावी लागते, कारण नोकरी टिकणे आत्यंतिक महत्त्वाचे असते. या तुलनेत मालक सबळ असतो. आधीच्या नाटकातल्या उताऱ्यात मॉस लेव्हीन हे नोकर, ब्लेक हा मालक, असे समजून विचार करून पाहा.

लेव्हीनची नोकरी गेली तर त्याच्या आजारी मुलीचा जीव धोक्यात येतो. ब्लेकला जमिनी विकता नाही आल्या तर फारतर (!) बीएमडब्ल्यूवरून ह्युदाईवर उतरावे लागेल. हा असमतोल, ही विषमता स्वातंत्र्याला निरर्थक ठरवते. पण अमेरिकन संविधानात ना समतेचा उल्लेख आहे, ना त्यामागील न्याय या संकल्पनेचा. अॅड स्मिथने त्याच्या प्रसिद्ध पुस्तकाआधी ‘द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेट्स’ नावाचे पुस्तक लिहून सर्व कृतींमध्ये माणुसकी राखा असे सांगितले होते, हेही भांडवलवादाच्या अर्थशास्त्रात येत नाही. उलट अर्थशास्त्र कसे नैसर्गिक विज्ञानशाखांसारखे आहे, आणि मानव्य शाखांच्या दूर आहे. हे ठसवण्यात फार जणांची फार ऊर्जा खर्ची पडते. बरे, ही मते मुळातच चुकीची असल्याने हे यत्न-प्रयत्न थेट वाया जातात. भांडवलवादाचा पर्याय जो समाजवाद, आणि त्यातला पोटपंथ साम्यवाद, यांनी भांडवलवादावर बरीच सक्षम टीकाही केली आहे. ती चुकीची आहे हे सांगणारा एक चुटका भांडवलवादी बरेचदा सांगतात, तो असा —
एरोडायनॅमिक्सच्या तत्त्वांनुसार भुंगे (bumblebee) उडू शकत नाहीत. पण भुंग्यांना एरोडायनॅमिक्स येत नसल्याने ते उडतात. भांडवलवादाचे तसेच आहे. तो तत्त्वतः टिकाऊ नाही. पण तो टिकून मात्र आहे! आता भुंगे इकडेतिकडे आपटत उडतात; हिशू ीीलश्रशीसह. पण ते उडतात तरी. समाजवादी-साम्यवादी समाज मात्र उडतच नाहीत. जेव्हा भांडवलवादाचा भुंगा आदळआपट करू लागतो तेव्हा मात्र भांडवलवाद्यांना शंका यायला लागते, की काही चुकत तर नाही आहे.

१९८०-८८ या काळात इंग्लंड-अमेरिकेत मार्गरेट थेंचर-रॉनल्ड रेगन यांची सत्ता होती. त्या देशांध्ये अर्थव्यवस्था बऱ्या चालल्या होत्या. पण त्यांच्या प्रभावक्षेत्रांध्ये मात्र गोंधळ होते. चीन अनपेक्षित वाटांनी सबळ होत होता. सोव्हिएत रशिया अडखळत होता. युरोपात इंग्लंड-अमेरिकेच्या प्रभावाबाहेरचे क्षेत्र होते. लॅटिन (दक्षिण) अमेरिकेत भयंकर अस्थैर्य होते. अनेक देशांत लोकनिर्वाचित सरकारे विरुद्ध सबळ अमेरिकन कॉर्पोरेशन्स असे झगडे होते. आर्जेंटिना तर एका लहानशा द्वीपसमूहावरून, फॉकलंड आयलंड्सवरून, इंग्लंडला आह्वान देत होता. एकूण पाहता यशस्वी अर्थव्यवस्थेसोबतच अनेकानेक शंकास्पद व्यवहार, असे चित्र होते. इंग्लंड, आणि त्याहूनही जास्त प्रमाणात अमेरिका, यांची सुबत्ता कोणाच्यातरी दुःख-दैन्यावर उभी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत होता. आणि यातच भांडवलवादी स्पर्धेच्या अगदी सौम्य पातळीवरच्या अमानुषतेचे उदाहरण असावे तसे ‘ग्लेनगॅरी ग्लेन रॉस’ नाटक आले. ते, त्यावर बेतलेला चित्रपट, सारेच भंडवलवादाने स्वतःबद्दलच्या साशंकतेला, (self-doubt) ला वाट करून देणारे प्रकरण. शिट्टी वाजवून प्रेशर कुकरमधला दाब कमी करणारा प्रकार. किंवा एका स्नेह्याने ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटातले एक वाक्य सांगितले, तसा प्रकार : ‘वेश्येच्या तोंडून पातिव्रत्याचे पुराण वदवून घेणे लोकांना आवडते.”! कर्मठ भांडवलवादी समाजाला त्या विचारधारेतले दोष दाखवून देणे आवडते; विशेषतः ती विचारधारा यशस्वी आहे असे दिसत असताना ! यात, “बरे झाले, मी जिंकणाऱ्या पक्षात आहे!” हा भावही असणार. असणारच. पण ब्लेकने लेव्हीनवर अत्याचार करणे हा अंतर्गत मामला होता. ब्लेकच्या मनात लेव्हीन-मॉस-अॅरोनॉव यांच्याबद्दल तुच्छता असणे बाहेरच्या जगाला दुखवत नव्हते. तसे ते दुखवायला लागेल तेव्हा काय होईल ? सुदैवाने (!) तेही चित्र हॉलिवुडने रेखाटले आहे! (दोन)
एकाच व्यापारी संस्थेतल्या कर्मचाऱ्यांध्ये कशी जीवघेणी स्पर्धा लावली जाते याचे चित्र डेव्हिड मेमिटने ‘ग्लेन्गॅरी ग्लेन रॉस’ या नाटकातून (१९८३) आणि त्यावरील चित्रपटातून (१९९२) रेखले. याच काळात अतिमुक्त बाजारपेठी अर्थशास्त्र जगभर पसरले. मध्ये १९८९ साली सोविएत रशियाही फुटला. जगाचे राजकारण अमेरिका-पश्चिम युरोप या एकुलत्या एका ध्रुवाभोवती फिरू लागले. ११ सप्टेंबर २००१ ला पेंटॅगॉन-वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यामुळे हा ध्रुव जगन्मान्य नाही, हेही स्पष्ट झाले. पण तो नाईन-इलेव्हन हल्ला धर्मातून आला होता, अर्थव्यवहारातून नव्हे. त्यामुळे त्या हल्ल्यातून जन्मलेले, इराक, अफगाणिस्तान, पुन्हा इराक वगैरे संघर्षही मुक्त बाजारपेठेला आह्वान देऊ शकेनात.

सरकारी पुढाकाराचे कल्याणकारी राज्य, वेल्फेअर स्टेट, ही संकल्पना हास्यास्पद मानली जाऊ लागली. रेगन-थेंचर काळातली (१९८०-८८) कॉर्पोरेशन्सना भरमसाठ सवलती आणि स्वातंत्र्य देणारी धोरणे बळावर आली. ती धोरणे राष्ट्रीय सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय होत गेली. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया, सर्वत्र मुक्त बाजारपेठी ऊर्फ कॉर्पोरेशनकेंद्री धोरणांवर आग्रह धरला जाऊ लागला. उदाहरणार्थ, एक मोठा अमेरिकन अधिकारी म्हणाला, ‘भारत आणि अमेरिका यांचे संबंध सुधारण्यात एकच पाच अक्षरी अडथळा आहे, ENRON”! एन्रॉनचे अमेरिकेतले व्यवहारही अनैतिक आहेत, हे उघड होण्याआधीचा तो काळ ; गोपीनाथ मुंडे एन्रॉनला अरबी समुद्रात बुडवायला निघाले होते, तेव्हाचा. तर मेमिटच्या नाटकानंतर जगभर कॉर्पोरेशन्स, बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन्स सबळ होत गेल्या. आजवर तेच सुरू आहे.

कोणतेही सरकार जोदार अर्थव्यवस्थेसाठीचे श्रेय घेत नाही. त्यांना ते घेऊ दिले जात नाही. अर्थव्यवस्था जो दार होतात त्या केवळ भांडवलवादी कॉर्पोरेट व्यवहारां ळे, असे मानले जाऊ लागले. अर्थव्यवस्था कमकुवत होऊन मंदी येते ती मात्र नेहीच सरकारी धोरणां ळे, हे अर्थशास्त्राच्या मूलतत्त्वां ध्ये धरले जाऊ लागले. पण २००७-०८ मध्ये जागतिक मंदी, महामंदी येणार, असे दिसू लागले. याची सुरुवात झाली ती मात्र अमेरिकन शेअरबाजारांत, आणि तीही सरकारी हस्तक्षेपाशिवायच! यावर ‘मार्जिन कॉल’ (Margin Call, २०११) नावाचा एक चित्रपट निघाला आहे. तो समजून घ्यायला मात्र काही अर्थशास्त्र (! ?) समजून घेण्यापासून सुरुवात करायला हवी.

कॉर्पोरेशन्स आपल्या नफ्याचे काय करतात? आपले मॅनेजर्स, शेअर होल्डर्स यांध्ये बहुतांश नफा वाटून टाकतात. आता हे मॅनेजर्स, शेअर होल्डर्स आपापल्या जीवनशैली ‘सुधारून’, चैन करून काही थोडा नफा पचवतात. पण या उपभोगाला, चंगळ करण्याला, मर्यादा असतात. सर्व अतिरिक्त नफा बँकां ध्ये ठेवला जातो. या जमा रकमांच्या प्रमाणांत इतरांना कर्जे देऊनच बँका नफा कमावू शकतात. मुक्त बाजारपेठी धोरणां ळे जेव्हा कॉर्पोरेट नफे प्रचंड होऊ लागले, तेव्हा बँकांना कर्जे देणेही जड जाऊ लागले. कर्जदार कर्जाची परतफेड करेल, तीही सव्याज, याची खात्री असलेले कर्जदारच ‘चांगले’, ‘प्राई ‘, प्रथम श्रेणीचे समजले जातात. त्याखालचे, ज्यांची सव्याज कर्जफेडीची क्षमता खात्रीलायक नाही, ते ‘हलके’, ‘सब् प्राई ‘, दुय्यम दर्जाचे.

तर अमेरिकन बँका अशा सब्-प्राई कर्जाकडे वळू लागल्या; अशा कर्जाकडे, की ज्यांच्या सव्याज परतफेडीची खात्री नाही. बँकांना आधार होता तो शेअरबाजारांचा, त्यांत पैसे गुंतवणाऱ्या श्रीमंतांचा. यातही अतिश्रीमंत वर्ग मुक्त बाजारपेठांनी घडवला होता. त्यांना केवळ बँकांध्ये पैसे ठेवणे अनुत्पादक वाटत होते; आणि शेअरबाजार आकर्षक वाटत होते. पण शेअरबाजार अखेर सट्याचा, जुगाराचा प्रकार आहे. त्यात हरण्याचा, शेअरबाजार उतरण्याचा धोका असतोच. हा धोका टाळायला म्यूच्युअल फंड ही रचना सुचवली जाते. अनेक शेअर घेणे, हे जुगारातला धोका कमी करत नाही हे अटळ सत्य डोळ्यांआड केले, की म्यूच्यूअल फंडही आकर्षक वाटू लागतात. याच्याच जास्तजास्त तरल आवृत्त्या वापरात येऊ लागल्या. ऑप्शन्स, डेरिव्हेटिव्हज, हेज फंड्स, प्रायव्हेट एक्विटी, इत्यादी नावांनी अतिश्रीमंत लोक जास्तजास्त तरल जुगारां ध्ये भाग घेऊ लागले. का गरज पडली याची? २०११ सालचा जोसेफ स्टिग्लित्झचा (‘नोबेल’ विजेता, जागतिक बँकेचा माजी प्रमुख अर्थशास्त्री) एक लेख आहे, “ऑफ द १%, बाय द १%, फॉर द १%”. लेखाचा मथळा ‘गव्हर्न ट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल’ या अमेरिकन राज्यघटनेतल्या, संविधानातल्या वाक्याचे विडंबन आहे. त्यात स्टिग्लित्झ सांगतो, की अमेरिकेतली सर्वांत श्रीमंत एक टक्का माणसे पाहा. पंचवीसच वर्षांपूर्वी (१९८६ सालाच्या आसपास) ही माणसे एकूण अमेरिकन उत्पन्नांचा १२% भाग घेत होती, आणि एकूण अमेरिकन श्रीमंतीचा ३३% भाग धरून होती. आज (२०११ साली) हेच एक टक्का लोक उत्पन्नांचा २५% भाग घेतात, आणि संपत्तीपैकी ४०% भागाचे मालक आहेत! तर ही सरकारी मुक्त धोरणां धली श्रीमंती हलक्या, बेभरवशाच्या कर्जा ध्ये उतरू लागली. यानंतर जे घडले, ते एका काल्पनिक संभाषणां धून मांडणेच इष्ट आहे. संभाषण आहे एक बँकर व एक नवे घर घेऊ पाहणारा अमेरिकन गृहस्थ यांच्यातले.

बँकर : काय तु चं एक लाख डॉलर्सचंच घर आहे ? तुम्ही दोन लाख डॉलर्सच्या घरात जायला हवं!
गृहस्थ : पण माझी दोन लाख डॉलर्सच्या घरात राहण्याची ऐपत नाही.
बँकर : मग आम्ही कशासाठी आहोत! आम्ही कर्ज देतो, तुम्ही मोठं घर घ्या. हो, गहाणखत करू आपण. तो उपचार पूर्ण करावा लागेलच!
गृहस्थ : पण दोन लाखांचे हप्ते मी कसे भरू ?
बँकर : आम्ही दहाऐवजी वीस वर्षे देतो, मग तर झालं ? तर गृहस्थाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून बँकरने त्याच्या माथी कर्ज ‘मारले’ !

पण बँकरलाही दहाऐवजी वीस वर्षे वसुली करण्यात रस नव्हताच. मग त्याने त्याच्याकडची गहाणखते इतर कोणालातरी देऊन सुटायचा प्रयत्न केला. हे ‘इतर कोणीतरी’ कोण होते? त्यांना गहाणखते घेऊन त्यांवर कर्ज देण्यात, सेकंड मॉर्गेजमध्ये (Second Mortgage) काय रस होता? बँकरांच्या सुदैवाने गहाणखतांवर कर्जे देणाऱ्या दोन शासन-समर्थित संस्था अस्तित्वात होत्या.

१९३८ साली महामंदी हटवण्याचा एक उपाय म्हणून अमेरिकन सरकारला घरबांधणीला उत्तेजन देण्याची इच्छा झाली. फेडरल नॅशनल मॉर्गेज असोशिएशन (ऋछचअ) या नावाची संस्था घडवली गेली, जी बँकांची गहाणखते विकत घेऊन त्यांऐवजी ‘गहाणाधारित रोखे’ देत असे. हे सरकारी रोखे शेअरबाजारात विकता-खरीदता येत. तर या संस्थेला सामान्य व्यवहारांत फॅनी मे (ऋरपपळश चरश) म्हटले जाई, आणि तिच्या रोख्यांना चइड (Mortgage Based Securities) म्हटले जाई. अशाच प्रकारे १९७० साली फेडरल हो -लोन मॉर्गेज कॉर्पोरेशन (FHLMC) ऊर्फ फ्रेडी मॅक् (Freddie Mac) ही संस्थाही अमेरिकन सरकारने काढली.

२००० सालापर्यंत मात्र फॅनी मे-फ्रेडी मॅक् यांच्यावर सरकारी नियंत्रण उरले नव्हते. चइड ना सरकारी पाठबळही नव्हते. फारतर अमेरिकन सरकार या दोन संस्थां धले एक मोठे शेअर-होल्डर होते, एवढेच. इतर दृष्टींनी पाहता दोन्ही संस्था सरळ साध्या व्यापारी सावकरी कॉर्पोरेशन्स होत्या.

२००७-०८ पर्यंत अनेक गृहस्थ हप्ते भरणे जड झाल्याने घरे सोडून पळून जाऊ लागले. अर्थातच त्यांच्या गहाणखतांची खरी किंमत शंकास्पद ठरू लागली. आधी जुन्या गृहस्थांना बाद करायचे, मग नवे गिहाईक गाठून त्याच्याशी किंमत, हप्ते, मुदत याबाबत सौदा करायचा. यानंतर गहाणावर कर्ज देणाऱ्या बँकेला किती मिळाले आणि किती मिळणे शक्य आहे याचे हिशोब करायचे. असे शेकडो हजारो शंकास्पद व अनिश्चित व्यवहार पूर्ण झाल्यावरच फॅनी मे-फ्रेडी मॅक यांच्या चइड रोख्यांचे खरे महत्त्व ठरणार. आणि चइड चे दर्शनी मूल्य फारदा बुडबुड्यासारखे फुगवून सांगितलेले असणार. या पोर्शभू विर ‘मार्जिन कॉल’ चित्रपट समजून घ्यायला हवा. एक मोठी इन्व्हेस्टमेंट बँक आहे. अतिश्रीमंतांचे पैसे सांभाळणे ; कर्जे, शेअरबाजार, यांच्या मदतीने ते पैसे वाढवणे, हे या बँकेचे काम. अर्थातच ज्येष्ठ मॅनेजर्स, मालक, वगैरेही अतिश्रीमंतच. सुरुवात होते पीटर सलिव्हन नावाच्या एका संगणक-तज्ज्ञाला नोकरीवरून काढण्यापासून. बडतर्फी इतकी तातडीने केली जाते, की आपले खाजगी सामान(च) बाहेर नेईपर्यंत पीटरसोबत सुरक्षा गार्ड दिला जातो! पण लिफ्टमध्ये चढताना पीटरचा सहाय्यक सेठ बर्ग न अल्-विदा म्हणायला येतो. पीटर एक स्टिक् (पेन ड्राईव्ह) सेठच्या हातात देतो, आणि सांगतो, “आपण बोललो होतो ते काम पूर्ण कर. आणि खूप सांभाळून राहा!” लिफ्ट आणि इमारत सोडताना पीटर सेलफोनवर एक कॉल करायचा प्रयत्न करतो. हे जमत नाही, कारण कंपनीने सेलफोन कापलेला असतो!

पीटर मुळात सिव्हिल एंजिनीयर असतो, तर सेठ रॉकेट सायंटिस्ट ; जो पेशा अमेरिकेत अपार बुद्धिमत्तेचा मानला जातो. दोघांनी मिळून बँकेच्या हातातले शेअर्स, विशेषतः चइड, केव्हा विकावे ते तपासणारा संगणक प्रोग्रॅ घडवलेला असतो. पीटरला गेल्या महिन्याभरात दोनतीनदा मोठ्या प्रमाणात रीअल इस्टेट शेअर्स विकायला हवे होते, हे समजलेले असते. तसे ते न विकल्याने एकूण बँकेचेच दिवाळे निघण्याची शक्यता उत्पन्न झालेली असते. अर्थात, संगणक प्रोग्रॅ ही बातमी, “ऐतिहासिक अतिसंवेदनशीलता निर्देशांक ठरीव मर्यादांच्या बाहेर गेला”, या शब्दांत सांगतो. ही धोक्याची सूचना पीटरने सेरा रॉबर्टसन या त्याच्या वरिष्ठ बाईला सांगितलेली असते, आणि ती न आवडून तिने पीटरचा काटा काढलेला असतो; फोनसकट!

आता सेठ पीटरचेच विश्लेषण आणखीही मागच्या काळातल्या व्यवहारांसाठी करून पाहतो, आणि निष्कर्ष काढतो, की गेली दोन वर्षे वारंवार बँक दिवाळखोरीजवळ जाऊन केवळ योगायोगानेच वाचलेली आहे. याचा उपनिष्कर्ष असा, की हे धोकादायक व्यवहार सेराच नव्हे तर तिच्या वरिष्ठांच्याही मूकसंतीने केले गेले होते! आता सेठ घाबरून आपला नवीन वरिष्ठ सँ रॉजर्स याला हे सारे समजावून सांगतो. तो अर्थातच हे आपल्या वरिष्ठांपुढे मांडायला जातो. आपली बाजू सबळ करायला तरुण सेठ पुरणार नाही, जास्त पक्व असा पीटर लागेल, हे सँ ला उमगते. पण पीटर हाकलून दिलेला, सेलफोन नसलेला, घटस्फोटित असल्याने घरी जायची ओढ नसलेला; थोडक्यात म्हणजे अनुपलब्ध असतो! एकीकडे सेठला पीटरला शोधून आणावयाला पाठवले जाते, आणि दुसरीकडे सँ जास्तजास्त वरच्या अधिकाऱ्यांपुढे धोक्याची घंटा वाजवू लागतो. अखेर बँकेचा प्रमुख जॉन टल्ड याला बोलावले जाते. भर मध्यरात्री हेलिकॉप्टरने तो येऊन पोचतो. ताज्या हुषार पोरांपासून ते पूर्वीपासून नको ते धोके घेऊन श्रीमंत झालेल्या बुजुर्गांपर्यंतच्या बैठका, हा चित्रपटाच्या पुढील भागाचा गाभा आहे. एका टप्प्यानंतर बँकप्रमुख जॉन टल्ड ताज्या ‘ज्ञानिया’ ला, सेठला विचारतो, “तू काय आहेस ?’ “रॉकेट सायंटिस्ट.” “मग इथे कसा पोचलास?” “दोन्हीकडे आकड्यांचं विश्लेषणच करायचं असतं; आणि इथे पैसे खूपच जास्त मिळतात!”

हे माणसांशी संबंधित व्यवहार आहेत याचा चर्चा ध्ये मागमूसही नाही. आकडे, चइड व तसली लघुरूपे, दिवाळखोरीचा धोकाही एका निर्देशांकाशी जोडलेला, या साऱ्यातून जणु काही हा बौद्धिक खेळ आहे, असे चित्र उभे केले आहे. पण माणसांचे चेहेरे मात्र भीती, काळजी, ताण, हेवेदावे, हे सारे दाखवत राहतात. एका टप्प्यांवर सेठ व त्याचा एक साथी यांना पीटर ‘सापडतो’. तो त्याने पूर्वायुष्यात बांधलेल्या एका पुलाचा उल्लेख करतो. या पुलाने दोन गावां धले किती अंतर कमी झाले हे तो सांगतो. पण येवढ्यावरच न थांबता किती वाहने तो पूल वापरतात, त्याने दिवसाला, महिन्याला, वर्षाला किती प्रवास वाचतो याचे तोंडी हिशोब पीटर फाडफाड करत जातो. त्याला म्हणायचे असते, की त्याच्या पुलाइतकी उपयुक्तता या बँकेची नाही. प्रत्यक्षात मात्र तर्कशुद्धता ठसवायला तो आकड्यां गून आकडे बोलत सुटतो.
आपण दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आपल्याकडे खूपसे कागद आहेत, जे आजवर मूल्यवान वाटत होते, आणि आज मात्र ते कवडीमोल झाले आहेत. पण आपल्याला आपली ही बाजारपेठ माहीत आहे. आपला अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी आहे. हे सारे न बोलताच टल्ड आणि इतर मालक-उच्च मॅनेजर लोकांच्या मनांत घोळत असते. आणि त्यातून एक पळवाट सापडते. जॉन टल्ड व त्याचे सहकारी ठरवतात की दुसऱ्या दिवसाभरात जवळपास सर्व चइड विकून टाकायचे. गुलामचोर या खेळात जसे हातातले गुलाम दुसऱ्याला देता आले तर आपण साव ठरतो, तसाच हा प्रकार. ‘कचरा’ रोखे इतरांना विकून आपण सुखात राहायचे!

पण शेअरबाजारात नुसते शेअर विकून चालत नाही; काहीतरी घ्यावेही लागते. पण सँ ला यावर उपाय म्हणून एक योजना सांगितली जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याला अमुक एका रकमेचे चइड विकायची जबाबदारी दिली जाईल, आणि ती पूर्ण करणाऱ्याला केवळ त्या एका दिवसासाठी तेरा लक्ष डॉलर्स प्रत्येकी, असा बोनस दिला जाईल ; खरेदी नाही, हे देऊन ते घेणे नाही, केवळ शंकास्पद मूल्याचे रोखे विकणे! “शेअरब्रोकर कर्मचाऱ्यांना ही योजना सांग”, असे टल्ड सॅ ला सांगतो. सॅ म्हणतो, “पण आपण भेदरलो आहोत, पॅनिक झालो आहोत, असं यातून दिसत नाही का ?” यावर टल्ड म्हणतो, “दरवाजा उघडून बाहेर पडणाऱ्या पहिल्या माणसावर भेदरण्याचा आरोप होत नाही. त्याच्या मागून बाहेर पडायला गर्दी होतो, ती भेदरलेल्यांची असते!” थोडक्यात म्हणजे, “आपण निसटूया, ज्यांना नंतर नीट निसटता येणार नाही त्यांची काळजी आपण करूया नको.” तर या तुच्छतावादी, सिनिकल वृत्तीने बँक कचरा – चइड ओझे हलके करायची तयारी करते.

मात्र हाताखालच्यांना ही विशासघातकी कृती करायला सांगतानाच “यामुळे तु च्यावर नंतर कोणीही विशास टाकणार नाही, ही शक्यता आहे, हं!’, हे सांगून टाकतो. पण प्रत्येकी तेरा लाख डॉलर्स, भाव बरा मिळाल्यास त्यावरही कमिशन, ही मोठी लालूच असते! येवढ्यानेही बँक नावाच्या कायदेशीर व्यक्तिमत्त्वाची हरामखोरी संपत नाही. टल्ड सांगतो, “ठीक आहे, आज चइड चं मूल्य घटलं आहे. पण आपण गेली दोन वर्ष त्या व्यवहारात बरंच काही कमावलं आहे. ते आपण करत राहिलो यासाठी कोणाला तरी बळीचा बकरा करावं लागणार! आणि ही भानगड ज्यानं आज उघडकीला आणली, त्यालाही गप्प बसण्याच्या कटात सामील करू घ्यावं लागणार.” ह्यामुळे ‘रिस्क मॅनेजर’ सेरा रॉबर्टसन, आणि तिने आदल्या सकाळी नोकरीवरून काढून टाकलेला पीटर सलिव्हन, असे दोघे जण एका अंधाऱ्या खोलीत बसून दिवस घालवतात. बँकेचा कचरा विकून जिवावरचे शेपटावर निभावायची योजना यशस्वी झाली, तर यांनाही बोनस मिळणार! अखेर एकांगी व्यापाराचा दिवस संपतो. आपल्या चइड साठ्यातले ९३% विकायची बँकेची योजना यशस्वी होते. सर्व कर्मचारी बोनस मिळणार म्हणून खूष असतात. पण यासोबत एक कडू संदेशही येतो, की आता व्यवहार मंदावले असल्याने साठेक टक्के कर्मचारी कामावरून कमी केले जाणार, बोनससकट बडतर्फी!

‘मार्जिन कॉल’ चित्रपट घडवणारा जे.सी. चॅडॉर (ग. उ. उहरपवी) हा नवशिका चित्रकर्मी आहे. तो १९९२ साली शालांत परीक्षा देऊन पास झाला. याचा अर्थ तो १९७५ च्या आसपास जन्मलेला, आज चाळिशीही न गाठलेला आहे. हा त्याचा दुसराच चित्रपट आहे. पण चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला, विशेषतः समीक्षकांकडून. इथे ‘ग्लेनगॅरी ग्लेन रॉस’ची भाषिक हिंसा नाही. एक बौद्धिक खेळ खेळला जात असावा तसे पैसे आणि भावी कारकिर्दीची आशा, या दोन ‘बक्षिसां’साठी सारे जण झटत आहेत. बहुतेकवेळी खेळाची स्थिती आकडे, चइड सारखी लघुरूपे, ‘हिस्टॉरिकल व्होलटाइलिटी इंडेक्स’ सारखे अर्थ दडवणारे शब्दप्रयोग, अशा तटस्थ यंत्रणां धून मांडली जाते. पण सर्वांच्या चेहेयांवरील ताण, भविष्याबद्दलची चिंता, या गोष्टी या मानवी व्यवहाराची अमानुषता सतत ठसवत राहतात. त्यामुळे या चित्रपटाचे वर्णन ‘वॉल स्ट्रीटबाबतचा (शेअरबाजाराबाबतचा) सर्वोत्कृष्ट चित्रपट’ असे केले गेले आहे. काही कळीच्या बदमाषीबाबतच्या चर्चा करताना सेठ बर्ग न व तसल्या तरुण कनिष्ठ अधिकाऱ्यांना खोलीबाहेर पाठवले जाते. ते एका लहानशा बाल्कनीत जाऊन धू पान करू लागतात. इमारतीत तसे करायची मनाई असते. एक जण कठड्यावर जरा जास्तच रेलतो तेव्हा इतर जण त्याला नसता धोका पत्करू नकोस असे सांगतात, तो म्हणतो, “खरा धोका पडण्याचा नसतो. तो असतो उडी मारायचा मोह होईल याचा!”
घोर अनैतिक, कधीकधी घोर बेकायदेशीरही कृती करायला माणसे का धजावतात ? अमेरिकेत भारतापेक्षा (तरी!) कायद्यांची अंलबजावणी जास्त काटेकोरपणे होते. बिल गेट्स व तत्सम अतिश्रीमंत अमेरिकेतही डझनावारी केसेस लढवत, वकिलांची धन करत बाजारपेठेत विकृती आणत जातात. स्पर्धक संस्थां ध्ये हेरगिरी करणे, त्यांच्यामागे सरकारी गैरसरकारी लचांडे लावणे, असल्या गोष्टी व्यापारी युद्धातील डावपेच म्हणून समर्थित केल्या जातात. पण स्पर्धकांशी संगनमत करून किंमती वाढवणे आजही अमेरिकन अँटाय-ट्रस्ट कायद्यां ध्ये बसत नाही. प्रत्यक्षात मात्र हे कायदे १९६०-६२ च्या काळानंतर (जॉन एफ. केनेडी अध्यक्ष व रॉबर्ट केनेडी अॅटर्नी जनरल) फारसे वापरले गेलेले नाहीत. दोन्ही केनेडी बंधूंच्या हत्यांमागचे खरे कारण उघड झालेले नाही, असे बहुतेक जाणकार मानतात. अँटाय-ट्रस्ट कायदे वाकवून मोडून निष्प्रभ करायला खून झाले, हेही सुचवले गेले आहे. आज वकिलांच्या फौजा जास्त अहिंसक पद्धतीने त्या कायद्यांचा चोळामोळा करतात. का घडते हे सारे? माझ्या मते तरी अपार पैसा माणसांना पाशवी बनवतो. Power corrupts, and absolute power corrupts absolutely, ho वाक्य प्रसिद्ध आहेच. The love of money is the root of all evil, हेही वाक्य प्रसिद्ध आहे. पण त्यातले “the love of’ हे शब्द गाळून ते वाक्य, म्हणजे, money is the root of all evil, वेडसर, भोळसट आदर्शवादाचे बोधवाक्य आहे, असा अपप्रचार केला जातो.

आजतरी अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँका/हेज फंड्स/प्रायव्हेट एक्विटी फंड्स पैशावरच्या प्रेमाच्या साफल्याची प्रतीके ठरली आहेत. त्यांच्यात दुष्टावा येणारच !

१९३, मश्रूवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर ४४००१०.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.