मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा से
नसो आज ऐशर्य या माऊलीला
यशाची पुढे थोर आशा असे…
असे कमी माधव ज्युलियन यांनी १७ मे १९२२ सालीच म्हणून ठेवले आहे. पण आज नव्वद वर्षांनंतरही मराठीची अवहेलना चालूच आहे. आज मराठी माध्यमांच्या शेकडों शाळा बंद पडताहेत. खेड्यापाड्यातून चकचकीत, भव्य, शोभिवंत इमारतीत इंग्रजी माध्यमांच्या शेकडोंनी शाळा सुरू झाल्या आहेत. कचकड्याच्या बाहुलाबाहुलीगत, बूट, टाय घालून लहान-लहान गोजिरवाणी मुले पिवळ्या गाड्यात बसून इंग्रजी भाषेचे आणि संस्कृतीचे धडे गिरवीत आहेत. मराठी लेखक असोत, ऑफिसर असोत, मंत्री, आमदार असोत अनेकांची मुले, नातवंडे या इंग्रजी माध्यमाच्या भोवऱ्यात अडकलेली आहेत. इंग्रज गेले पण आपली भाषा इथल्या लोकांच्या मनावर बिंबवून गेले, त्यांना माहीत होते की इंग्रजी भाषा या देशात कायम राहील आणि भाषे ळे इंग्रजी संस्कृतीसाठी प्रचारप्रसार या देशात होईल. भाषा आणि संस्कृती यांचा अन्योन्य घट संबंध आहे. मराठीमाध्यमाच्या शाळा बंद होणे, मराठी पुस्तकांची पीछेहाट होणे म्हणजे मराठी संस्कृतीचा ह्रास होणेच आहे. भाषा टिकली तरच संस्कृती टिकते.
आपापसात बोलतानासुद्धा इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा आपण इतका वापर करतो की मराठीची धेडगुजरी होऊन जाते, जसे वॉश घेऊन फ्रेश झालो! बायबाय! टाटा! हॅल्लो! बँकयू! शब्दांच्या बाबतीतसुद्धा परधार्जिणी वृत्ती नसावी, इंग्रजी शब्दांऐवजी मराठीतील, बोलीतील शब्दही वापरणे चांगले, बोलीत तालबद्धता, नादमधुरता व भावपूर्णता असते. असे कितीतरी इंग्रजी शब्द आपण बिनधास्तपणे दररोज वापरत असतो आणि वाईट याचे वाटते की हे शब्द आपण अतिशय अभिमानाने वापरतो, त्याऐवजी नमस्कार, ‘येतो’, कसे आहात, ‘आभारी आहे.’ – पण असे शब्द वापरताना आपल्याला लाज वाटते, शरम वाटते, जणु काही असे शब्द वापरले तर आपण गावंढळ ठरू, असंस्कृत ठरू अशी मनाची एक धारणाच होऊन बसली आहे. परभाषेतून आलेले शब्द मराठीतील स्वाभाविक शब्दांना नष्ट करत नाहीत ना याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. स्वभाषेविषयी अनादर निर्माण होऊ नये, तिची उपेक्षा होऊ नये, तिची अस्मिता, तिचा स्वाभिमान नष्ट होऊ नये यासाठी आपण जागरूक असले पाहिजे. माँटेसरीतला एक पाच वर्षाचा मुलगा इंग्रजी शाळेतून घरी आल्यावर आपल्या आजीला विचारतो ‘वॉट इज युवर ने?’ बिचाऱ्या आजीला हे कोठून कळणार! ती म्हणते ‘बाळा, माझा काय ने ? मी आज आहे उद्या नाही! यांत केवळ विनोदाचा भाग नाही, ही बाब गंभीर आहे.
या पिढ्यांमध्ये संवाद कसा साधणार ? संपर्क कसा टिकणार ? टॉय, बूट आणि कोट म्हणजे डच संस्कृती का ? कोणीच कसलाच विचार करत नाही. इंग्रजी ही विशभाषा आहे हे साफ खोटे आहे. जर्मनी, जपान, चीन, रशिया अशा अनेक प्रगत राष्ट्रांत त्यांच्या मातृभाषेतूनच सर्व व्यवहार चालतात. तिथे दैनंदिन व्यवहारात, शाळेत इंग्रजीचा अजिबात वापर नाही. पण आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी, संकुचित वृत्तीच्या, इंग्रजीप्रेमी लोकांनी भारतात इंग्रजीचे स्तोम माजवले, आपल्याकडील विद्वान लोक इंग्रजीचे पायचाटे बनले आहेत. मातृभाषेचे महत्त्व या लोकांना कळत नाही असे नाही पण वरिष्ठ पातळीवरच्या नोकऱ्या, अधिकारपदे आपल्याला व आपल्या वंशजांनाच मिळावीत म्हणून हे इंग्रजीचे पोवाडे गात असतात. मराठी भाषेची आज जी पीछेहाट दिसते आहे तिला अनेक घटक कारणीभूत आहेत. आपल्याकडचे विद्वानही याला कारणीभूत आहेत. मराठीचा ह्रास होतो आहे असे म्हणून रडगाणे गाणाऱ्या या लोकांनी मराठीच्या विकासासाठी काय केले? – काही नाही!
जर्मनी, जपान, चीन, रशिया येथील विद्वानांनी मेडिकल, इंजीनिअरिंगसह सर्व कोर्सेस आपल्या मातृभाषेत आणले. त्यांच्या मातृभाषेतच मुलांना उच्च शिक्षण मिळते तसे प्रयत्न त्यांनी केले. आपल्याकडील मराठीतील पर्यायी शब्द वाचले म्हणजे ‘भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणण्याची पाळी येते. ‘बीज गुणन प्रक्षेत्र’ असा बोर्ड एखाद्या शेतात दिसतो. ‘बी ला ‘बीज’, विकासाला ‘गुणन’ आणि शेताला ‘प्रक्षेत्र’ असे पर्यायी शब्द देणाऱ्यांची कीव करावीशी वाटते. ‘बी विकासाचे शेत’ असे साध्या सोप्या भाषेत म्हटले तर बिघडले असते का? ‘मॅटर्निटी हो ‘ साठी ‘शिशप्राप्ती कार्यालय’ अशा प्रकारचे प्रतिशब्द देणाऱ्यांचे हेतू लक्षात यायला वेळ लागत नाही.
एखादे मराठी परिपत्रक आफिसात आले तर त्या मराठीची कीव करावी वाटते, शेवटी मराठी परित्रकाऐवजी इंग्रजी परिपत्रक पाठवा असे उत्तर लिहावे लागते आणि येथेच या कावेबाज लोकांचा हेतू सफल होतो. आज न्यायालय, बँकेत, सरकारी कामकाजात जे मराठी शब्द वापरले जातात ते सामान्य माणसाला कळण्यासारखे असतात का? त्यासठी साधे सोपे शब्द मराठीत नाहीत का? या कार्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत पण आपले भाडोत्री विद्वान यांनी हे करायचेच नाही.
इंग्रजांना दोष देण्यात अर्थ नाही, आपणच दोषी आहोत, मराठीच्या विकासासाठी अगदी अंतःकरणापासून, जाणूनबुजून प्रयत्नच होताना दिसत नाही. कर्नाटकात प्रत्येक शाळेत मग ती अल्पसंख्यकांची असो, इंग्रजी असो अगर मराठी असो ‘कानडी’ अनिवार्य आहे. हे आपल्याकडे का होत नाही? कारण आपली तशी मानसिकताच नाही. आम्ही मनानेच अजुनी इंग्रजांचे गुलाम आहोत. मराठीत मान्यता पावलेल्या पुस्तकांचे अनुवादही इतर भाषेत झालेले दिसत नाहीत. त्या मानाने इतर भाषांतील विशेषतः इंग्रजीतील अनेक पुस्तकांचे मराठीत भाषांतर झालेले आहे. ना.ग.गोरे एकदा म्हणाले होते की आचार्य जावडेकरांनी त्यांचे ‘आधुनिक भारत’ इंग्रजीत लिहिले असते तर त्याला ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला असता. हल्ली फूटपाथवर इंग्रजी पुस्तकांचेच ढीग दिसतात. आपण इंग्लंडमध्ये आहोत का भारतात ? असे वाटावे इतपत हे इंग्रजीचे स्तो माजले आहे. शेक्सपीयर, वर्डस्वर्थ, बर्नार्ड शॉ आदि इंग्रजी लेखकांचे साहित्य जगतश्रेष्ठ का मानायचे? आमचा ज्ञानेशर, तुकाराम हजारो नोबेल पारितोषिकांच्या पुढे आहेत.त्यांचा अभिमान आपण बाळगणार की नाही ? संगणकाचे युग आहे हे खरे आहे; पण जगातल्या संगणकतज्ज्ञांना संस्कृत भाषा ही जगातल्या इतर कुठल्याही भाषेपेक्षा संगणकाला जास्त उपयुक्त आहे, कारण तिच्यात अधिक वैज्ञानिकता आहे असे सांगितले आहे. मग त्यासाठी प्रयत्न का होत नाहीत ? आम्ही मराठी लोक अतिशय आळशी, आत्मकेंद्रित, स्वार्थी, भ्रष्टाचारी आण कुटिल राजनीती करणारे आहोत. खरे म्हणजे केवळ मराठीच्याच नव्हे तर इर विकासातले हे मोठे अडथळे आहेत!
जातीपाती, भ्रष्टाचार, हेवेदावे ह्यांतच आम्ही पुरते अडकलो आहोत. मराठी बोलताना शरम वाटावी यासारखी शरमेची दुसरी बाब नाही. आजच्या तरुण पिढीने मराठीपुढील हे सर्व धोके ओळखून तिच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुंबई-पुण्यात गेल्यावर मराठी जाणणाऱ्या माणसाबरोबरही आपण हिंदी आणि इंग्रजीत बोलतो! हा काय वेडेपणा! आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली पाठ्यपुस्तके! मुलांना गोडी वाटावी, त्यांचे औत्सुक्य वाढावे, त्यांच्या ज्ञानात भर पडावी अशी साध्या, सोप्या, रसाळ भाषेत लिहिलेली, मुलांच्या मनाशी संवाद साधणारी पाठ्यपुस्तके आहेत का । पु.ल.देशपांडे म्हणायचे, जे सोपे अवघड करून सांगतो तो विद्वान’ असे विद्वान आज आपल्याकडे आहेत! आजची पाठ्यपुस्तके बारकाईने पाहिली तर काय दिसते? विद्यार्थी म्हणतात ‘आम्हाला मराठीचा कंटाळा येतो, मराठी बोअर वाटते! अशी पहिल्यापासूनच मुलांच्या मनाची धारणा झाली तर ती मराठी विषय घेतीलच कशी? त्यात आपल्याकडे राजकारण, वशिलेबाजीने धडे घुसडणे, प्रादेशिकता यांचे स्तो ,पुण्यामुंबईचे लेखक, मराठवाडा विदर्भाला चान्स दिला पाहिजे, खेड्यातले लेखक, जातीजमातीचे लेखक यांचे धडे कविता घेतल्या पाहिजेत, हे सर्व काय आहे? या लेखकांवर अन्याय होऊ नये म्हणून मुलांच्यावर अन्याय करणार का ? मुलांच्या शिक्षणावर, मनावर कितीही अन्याय होऊ दे पण राजकारणातले हितसंबंध साधले पाहिजेत. चांगल्या लेखकाचे दर्जेदार साहित्य एवढाच निकष मराठी पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत ठेवला पाहिजे. मुलांच्या मनात रुजणारी, हृदयाला भिडणारी, त्यांच्या ओठावर सतत राहणारी, सतत गुणगुणावीशी वाटणारी अशी कविता पाठ्यपुस्तकांत पाहिजे. त्यांचे भावविश फुलवणारे पाठ पाहिजेत, पण हे करणार कोण?
जसे पाठ्यपुस्तकांचे तसेच मुलांच्या पाठीवरील दप्तरांच्या ओझ्याचे! आज इतकी वर्षे झाली विद्यार्थ्यांच्या पाठीवरील मणामणाचे दप्तरांचे ओझे कमी करावे असे ना सरकारला वाटते ना शिक्षकाला ! ऊठसूठ पगारवाढीसाठी आणि सवलतीसाठी तीनतीन महिने संप करणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांना लहान मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी एकही मोर्चा काढावा वाटला नाही. हमालानेही हसावे एवढे ओझे त्या कोवळ्या पराठीवर वर्षानुवर्षे ठेवले जात आहे, याची कुणालाच चिंता नाही! एकूणच शिक्षणक्षेत्रातला हा सावळागोंधळ मराठीचाच नाही तर विद्येचाच घात करणारा आहे. डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, टिळक, फुले, आगरकर कुठल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकले? ते खेड्यापाड्यातल्या आपल्या गावठी शाळेतच शिकले, मोठे झाले, आणि आत्ताचे हे इंग्रजी प्रे कोठून आले ?
प्रश्न अनंत आहेत, सुटण्यासारखे आहेत पण इच्छाशक्ती नाही, मानसिकता बदलायला कोणी तयार नाही, चांगल्यासाठी श्रम करण्याची तयारी नाही मग हे असेच चालायचे का? सजग दृष्टीने या विषयाकडे पाहिले नाही तर मराठीचे भवितव्य अंधकारमय ठरेल आणि त्याचे पापी आपण ठरू ; आणि मग कवी माधव ज्युलियनांच्या कवितेतील शेवटच्या ओळी,
‘जगन्मान्यता हीस अयूँ
प्रता हिला बैसवू वैभवाच्या शिरीं’
मायबोली मराठीच्या बाबतीतील त्यांचे हे स्वप्न, स्वप्नच ठरणार का?
सावली, गणेश मंडईनजीक, मु.पो.इस्लामपूर, जि.सांगली-४१५४०९ फोन : ७७०९६७७२८८