मार्क्सचा शासनसंस्थाविषयक विचार या लेखातून आध्यात्मिकता

आध्यात्मिकते (spiritualism)ची खरोखरच गरज आहे का ? आजकाल ‘माझा कुठल्याही धार्मिक कर्मकांडावर विशास नाही; मी धार्मिक नाही; परंतु मला आध्यात्मिकतेची (spiritualism) रुची आहे’ असे सार्वजनिकरीत्या विधान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जणु काही आध्यात्मिकता म्हणजे एक फॅशन असल्यासारखे त्याकडे बघितले जात आहे. इंटरनॅशनल म्हणून स्वत:च शिक्का मारून घेतलेल्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये तर याचे पेवच फुटले आहे. त्यांच्या मते प्रत्येकाला आपले समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आध्यात्मिक शहाणपणाची (spiritual) आहे. मुळात आध्यात्मिकता ही एक अत्यंत ढोबळ, तकलादू अशी संकल्पना आहे. त्याची शाब्दिक फोड केल्यास ऐहिकतेच्या विरोधातील ही संकल्पना आहे, हे लक्षात येईल. त्याचप्रमाणे आध्यात्मिकता ही वास्तवातील भौतिकतेपेक्षा वेगळे काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हेही लक्षात येईल. विज्ञानातील नियम, तत्त्व, सिद्धान्त याव्यतिरिक्त या जगात इंद्रियजन्य अनमुभवाच्यापलिकडे कित्येक – आत्मा, चेतना, अलौकिकशक्ती, अतीन्द्रिय शक्ती. इ. इ. गोष्टी असून त्यांची जाणीव ठेवल्यामुळे आपले आयुष्य समृद्ध होत राहील असा तर्क त्यामागे असण्याची शक्यता आहे. ध्यान, योग, एकांत, प्राणायाम इत्यादींद्वारे मानसिक समाधान मिळू शकते, माणूस चिंतामुक्त होऊ शकतो यावर येथे भर दिला जातो. आधुनिक तत्त्वज्ञ व वैज्ञानिक यांना मात्र आध्यात्मिकता ही एक इतिहासकालीन कालबाह्य व निरुपयोगी अशी संकल्पना आहे, असे वाटते. आपल्यातील काही जणांना आध्यात्मिकतेच्या रूढ अ-न्वयार्थाऐवजी आयुष्याला आकार देणारे जीवनमूल्य म्हणून याकडे पाहावे असे वाटते. आपल्या सुखी व समाधानी आयुष्यासाठी अ-न्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व यासाठी पैसा-संपत्तीची ओढ असावी लागते. त्याचबरोबर सौंदर्य, प्रे , सहानुभूती यांची अनुभूती घेणेसुद्धा गरजेचे असते. निसर्गातील विविधतेकडे, चमत्कारसदृश घटनेकडे विस्मित दृष्टीने बघण्याचीही गरज असते. या प्रकारच्या गोष्टींचे स्पष्टीकरण विज्ञानाच्या आवाक्याबाहेरचे असल्यामुळे व यासाठीच्या ऐहिक दृष्टिकोणात हिशोबीपणा असल्यामुळे आध्यात्मिकतेला जीवनमूल्य म्हणून स्वीकारायला हवे, असे त्यांना वाटते. परंतु सौंदर्य, प्रे , आश्चर्य, इत्यादीसाठी आध्यात्मिकता हा शब्दप्रयोग योग्य ठरेल का? मुळात अध्यात्माची भलावण करणारे कुठल्या हेतूने हा शब्द वापरतात याचा ने का अंदाज येत नाही. या भौतिक जगाच्या पलिकडे काही अज्ञात गोष्टी असून त्यांचा मागोवा घेणे हेच त्यांना अपेक्षित असल्यास आध्यात्मिकता धर्मव्यवहाराच्या जवळ जाणारी संकल्पना ठरेल. धर्म म्हटले की श्रद्धा. ग्रंथप्रामाण्यवाद, शब्दप्रामाण्य, चिकित्सा न करण्याची अट. त्यामुळे आध्यात्मिकतेसाठीसुद्धा श्रद्धेची गरज आहे, असा निष्कर्ष काढावा लागेल. हेच जर खरे असेल तर अशा प्रकारे आडवळणाने सांगण्याची गरज नाही. शब्दांचा घोळ घालण्यात अर्थ नाही. सरमिसळ करणाऱ्या कसरतीची गरज नाही.
म्हणूनच हा शब्दप्रयोग धार्मिकाच्याच शब्दकोशातच राहू दे, असे म्हणावे लागेल. या प्रकारचा धूसर शब्द प्रे , आश्चर्य, सौंदर्य इत्यादी जीवनमूल्यांसाठी न वापरता यासाठी वेगळाच कुठलातरी योग्य शब्द शोधण्याची गरज आहे. ऐहिक जगातच आपण समृद्ध जीवन जगू शकतो, याला पुष्टी न देणारे कुठलेही विधान स्वीकारार्ह नाही हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या आयुष्यात कमतरता असून ही कमतरता भरून काढण्यासाठी आध्यात्मिकतेला शरण जायला हवे अशी समजूत असल्यास यासाठी कुठून सुरुवात करावी व ने के काय काय करायला हवे या प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत. एके काळी आध्यात्मिक व ऐहिक या संकल्पना स्पष्ट होत्या. त्यांना समजून घेण्यासाठी कष्ट पडत नव्हते. या एकमेकांच्या विरोधात आहेत याची पूर्ण कल्पना होती. आध्यात्मिकतेकडे ओढा असणाऱ्यांनी अंतर्मनाचा वेध घेत घेत, सर्वसंगपरित्याग करून परमेरेशरापाशी पोचण्याची अनुभूती प्राप्त करून घेणे व परब्रह्माशी विलीन होणे यावर भर दिला जात असे. स्वत:चे अस्तित्व आणि ऐहिक सुखांना नाकारणे म्हणजेच आध्यात्मिकता असे समजले जात असे. परंतु आता हे सर्व बदलत आहे. आध्यात्मिक बुवाबाजीचे प्रस्थ वाढत आहे. पूर्वीच्या आध्यात्मिकतेला नवीन साज चढवून विकृत स्वरूपात त्याची मांडणी केली जात आहे. सुखोपभोगाशी हात मिळवणी करत आध्यात्मिकता पुढे जात आहे. एकांतासाठी आता जंगलात जाण्याची गरज नाही. पंचतारांकित सोई-सुविधा असलेल्या एखाद्या थंड हवेच्या ठिकाणच्या रिसॉर्ट ध्ये वास्तव्य करण्यात काही गैर नाही, असे या आधुनिक आध्यात्मिक बुवा, महाराज, बाबांना वाटत आहे. आध्यात्मिकता म्हणजे ध्यान व योग, या व्यतिरिक्त काहीही नाही, ही मानिसकता दृढ होत आहे. योगाचा वापर आरोग्य व विश्रांतीसाठी मुख्यत्वे होत आहे. एका दृष्टीने आध्यात्मिकतेतील अशा प्रकारचा बदल व त्याची ऐहिकतेच्या जवळ जाणारी लवचीकता स्वागतार्ह आहे. आपण हाडामांसाची माणसे आहोत. यामुळे या गोष्टीत आध्यात्मिकता आहे की नाही याची चर्चा करत बसण्यापेक्षा अशा प्रकारची आध्यात्मिकता मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी हातभार लावते, ही गोष्ट खरोखरच स्पृहणीय ठरेल. परंतु ऐहिकतेचाच विचार करत राहणे हा माणसाचा आदिम स्वभाव असून त्यात सौंदर्यानुभवासारख्या गोष्टी नसल्यास त्या आक्षेपार्ह आहेत, असा अनेकांचा आक्षेप आहे. ऐहिक गरजा पूर्ण झाल्या तरी माणसात कुठे तरी असमाधानाची, अपूर्णतेची भावना असते. पूर्वीच्या काळची अध्यात्मिक संकल्पना त्यासाठी व त्याकाळी नक्कीच उपयोगी पडली असावी. पारलौकिकतेचे गाजर पुढे करून माणसावर भुरळ पाडली असावी.
सखोपभोगाच्या पलिकडे जाण्यासाठी पारलौकिकरोला शरण जायला हवे, यात तथ्य नाही. त्याऐवजी आपल्या अंतर्मनाला समाधान देऊ शकणाऱ्या गोष्टीत मन गुंतवून ठेवणे हाही एक (सोपा) मार्ग असू शकेल. आपल्या संवेदनांना अत्युच्च पातळीवर नेऊ शकणाऱ्या कला, साहित्य, संगीत, निसर्गाशी जवळीक वा इतर तत्सम प्रकारात मन गुंतवल्यामुळे आपले जीवन नक्कीच समृद्ध होऊ शकेल. ही समृद्धी, आध्यात्मिकवादी सांगतात त्याप्रमाणे केवळ ध्यानधारणा वा योग-प्राणायाम यांतूनच येऊ शकते याला कुठलाही आधार नाही. यामुळे अंतर्मनाला समाधान देऊ शकणारे विचार व कल्पना यासाठी जास्त वेळ देत असल्यास या तथाकथित आध्यात्मिकतेची गरजच भासणार नाही.
pkn.ans@gmail.com

हिंदी संस्कृतीची अनाग्रही वृत्ती
हिंदुस्तानात अनेक धर्मांचे व जातीचे लोक प्रथमपासून राहात असल्याने, येथील राज्यकर्त्यांनी कोणत्याही एकाच धर्माशी तादात्म्य पावून इतरांविरुद्ध पक्षपात करणे, हे अन्यायाचे व राज्यविघातक आहे, अशी समजूत फार पुरातन कालापासून येथे रूढ झालेली आहे. अशोक, समुद्रगुप्त, हर्ष, अकबर, शिवाजी इत्यादी सर्व थोर राज्यकर्त्यांनी अथवा सम्राटांनी हे तत्त्व आपल्या राजनीतीचे अधिष्ठान बनविले होते. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील अनेक थोर धर्मपुरुषांनीही परधर्मसहिष्णुतेचे, म्हणजेच ‘सर्व धर्मी समानत्वा’चे तत्त्व उपदेशिलेले आहे. हिंदुस्थानात निर्माण झालेल्या अनेकधर्मपंथांनी व तत्त्वज्ञानांनीही या थोर तत्त्वांचा अवलंब केल्यामुळे हिंदी जनतेच्या अंतःकरणातही ते खोल रुजलेले आहे. यामुळे आधुनिक काळामध्ये धर्मजातिभेदातीत राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यास फार कष्ट करावे लागले नाहीत. हिंदू संस्कृतीत अध्यात्मशास्त्राला अनुभवसिद्ध शास्त्राचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झालेला असल्याने, हिंदू लोक अध्यात्मशास्त्रातील सिद्धान्ताकडे अनाग्रही व सत्यसंशोधनाच्या निःपक्षपाती दृष्टीने पाहू शकतात.
– आचार्य शं. द. जावडेकर,
नवभारत, १९४७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.