हेरगिरी आणि शहाणपण

शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ ग्रेट ब्रिटन (यापुढे ‘ब्रिटन’ किंवा ‘इंग्लंड’) ही जगातली एकमेव महासत्ता होती. एकोणिसावे शतक संपताना तिचे साम्राज्य विरायला लागले; कुठेकुठे तर फाटायला लागले. पहिल्या महायुद्धाने इंग्लंडला स्पर्धक उत्पन्न होत आहेत हे अधिकच ठसवले. ते युद्ध जिंकायला इंग्लंडला यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची (यापुढे ‘अमेरिका’) मदत लागली, आणि अमेरिका महासत्ता आहे हे जाहीर झाले.
पहिल्या महायुद्धाच्या (१९१४-१८) मध्यावर युरोपच्या पूर्व टोकाला एका नव्या देशाचा उदय झाला, यूनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स (यापुढे ‘सोव्हिएत रशिया’). जुन्या झारवादी रशियन साम्राज्याचा वारस असलेला हा देश अनेक अर्थांनी ‘न भूतो’ असा होता. बाकी विकसित देश मुख्यतः भांडवलवादी अर्थव्यवस्था वापरत, तर सोव्हिएत रशिया भांडवलवादाला शत्रू मानणाऱ्या साम्यवादावर बेतलेला होता. आणि या देशाने झपाट्याने प्रगती करत प्रगत पश्चिम यूरोप आणि मागास पूर्व यूरोप हे अंतर कमी केले. तसाही उदारमतवाद्यांना, समाजवाद्यांना हा साम्यवादी प्रयोग मोहवत होताच. लवकरच बऱ्याच लोकांध्ये, विशेषतः तरुणांध्ये सोव्हिएत रशिया आणि साम्यवाद यांचे प्रे पसरू लागले. फारदा हे प्रे टिकावू नसे. त्यामुळे एक वाक्य वारंवार उच्चारले जाई, “तुम्ही तरुण असताना साम्यवादी नसाल, तर तुच्या हृदयात खोट आहे. आणि जर चाळिशीतही तुम्ही साम्यवादी असाल, तर तुच्या डोक्यात खोट आहे.’ माझ्या आठवणीनुसार भारतात हे वाक्य १९६७ च्या आसपास यशवंतराव चव्हाणांनी उच्चारले. त्यानंतर मात्र तारुण्य, साम्यवाद आणि त्यां धले भावनिक आकर्षण भारतात दखलपात्र उरलेले नाही!
पहिले महायुद्ध संपले तेव्हा जर्मनी सर्वार्थाने पराभूत होती. लवकरच तिथे एक वंशवादी, हुकूमशाही विचारप्रणाली जन्माला आली, नॅशनल सोशलिझम नावाची. पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या विरोधात लढलेल्या इटलीतही या विचारप्रणालीने जोर धरला. स्पेन या देशात नामधारी राजघराणे आणि व्यवहारात लोकनिर्वाचित सरकार असे. पण १९३३ साली तिथेही नॅशनल सोशलिस्ट वृत्तीच्या हुकूमशहाने सत्ता बळकावली. १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा फिन्लंड व जपान हे देशही जर्मनी इटलीच्या बाजूने युद्धात उतरले. स्पेनने मात्र वरकरणी तरी तटस्थ राहायचे ठरवले. तिकडे दूर ब्राझील आणि आर्जेंटिनातही हुकूमशाहीला समर्थन होते, पण या देशांची सैन्ये परिणामकारक नव्हती.
दुसरे महायुद्ध मुख्यतः जर्मनी, इटली, जपान (दोस्त राष्ट्रे किंवा अळी) विरुद्ध इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका (मित्र राष्ट्रे किंवा अश्रश्रळशी) असे लढले गेले. पण ही केवळ सुरुवातीची स्थिती होती. सोव्हिएत रशिया व जर्मनी यांनी सुरुवातीला ‘ना-युद्ध’ करार केला होता, पण लवकरच ते नाटक संपून त्या दोन देशांत युद्ध सुरू झाले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने सोव्हिएत रशियाही मित्र राष्ट्रां ध्ये सामील झाला. महायुद्ध संपले तेव्हा इंग्लंड, अमेरिका व सोव्हिएत रशिया हे विजेते ठरले, तर दोस्त राष्ट्र पराभूत झाली. महायुद्धापुरत्याच्या एकत्रीकरणाला मात्र ताबडतोबच तडे गेले. अमेरिकेत विकसित झालेल्या अणुबाँब-तंत्रज्ञानाने जपानला हरवले. लवकरच ते तंत्रज्ञान सोव्हिएत रशियालाही मिळाले, आणि तेही अमेरिकेतल्या सोव्हिएत हेरां र्फत!
१९४५ सालानंतर इंग्लंड-अमेरिका विरुद्ध सोव्हिएत रशिया, हा जगातला मोठा संघर्ष ठरला. जरी युद्ध असे घडले नाही तरी दोन्ही पक्ष एकमेकांवर दमदार हेरगिरी करू लागले. १९८९ साली सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन डझनभर स्वतंत्र राष्ट्रे घडेपर्यंत ही न-लढता-लढण्याची, शीतयुद्धाची स्थितीच जगाच्या राजकारणाची पोर्शभू ी होती. या सर्व काळात नवनवी युद्धसामग्री घडवून शड्ड ठोकत एकमेकांना भीती दाखवणे, आणि हर प्रयत्नाने एकमेकांची युद्धसज्जता आणि हेतू व धोरणे जाणून घेण्यासाठी हेरगिरी करणे, हाच मुख्य व्यवहार सुरू होता. अर्थातच या काळात हेरकथा हा साहित्यप्रकारही भरभराटीला आला. यांतले सर्वांत लोकप्रिय उदाहरण म्हणजे इयान फ्लेमिंगच्या जेम्स बाँड-कथा, ज्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीला आवडत असत! पण जेम्स बाँड-कथा मुळीच वास्तववादी नसत. त्यांचे वर्णन ‘सेक्स, सेडिझम अँड स्नॉबरी’ असे केले गेले आहे. सुंदर स्त्रियांशी जेम्स बाँड ‘लफडी’ करतो, तो खलनायकाकडून भरपूर पीडा (torture) सहन करतो, आणि कथांचे सर्व वातावरण ऐय्याश अतिश्रीमंतीचे असते; हे बाँड-कथांचे लक्षणगुण आहेत. आणि ते पुस्तके खपवायला मदत करतात! खरी परिस्थिती मात्र इतकी चित्तथरारक आणि नाट्यपूर्ण नव्हती. माणसांनी इतर माणसांना फतवून, साम-दाम-दंड-भेद वापरून मिळवलेले शत्रूच्या स्थितीचे ज्ञान हे ‘ह्यूमिंट’ (Humint : Human Intelligence)या नावाने ओळखले जाई. शत्रूच्या वेगवेगळ्या कार्यालयां धील संदेशांचे दळणवळण इलेक्ट्रॉनिक पद्धतींनी तपासून जे ज्ञान मिळे, ते ‘एलिट’ (Elint : Electronic Intelligence) या नावाने ओळखले जाई. या बाँडच्या तुलनेत ‘साध्याभोळ्या’ हेरगिरीवरही अनेक लोक कथा-कादंबऱ्या लिहीत. त्यांना त्यांचा असा वाचकवर्ग असे आणि असतो; अर्थात, बाँड-कथांपेक्षा संख्येने लहान! अशा लेखकांपैकी सातत्याने वास्तवाला धरून आणि साहित्यिक अंगाने लिहिणारा म्हणजे जॉन ल् कॅरे (जन्म १९३१). याचे वडील फुटकळ बदमाष्या करत ‘मि. नटवरलाल’ पद्धतीने जगत. ल कॅरे सांगतो की त्याला त्याची आई खरी त्याच्या एकविसाव्या वर्षापर्यंत भेटलीच नाही! वडलांसोबत सावकार आणि पोलिसांना टाळत यूरोपभर भटकतच ल् कॅरे वाढला. वडलांच्या अनेक ‘धंद्या’मध्ये वार्ताहरकी आणि हेरगिरीही होती.त्याचाच भाग म्हणून १९५० साली (वयाच्या एकोणिसाव्या वर्षी) निर्वासितांच्या मुलाखती घेणारा जर्मन-इंग्लिश दुभाषी म्हणून ल कॅरे ब्रिटिश हेरखात्यासाठी काम करू लागला. पुढेही वाणिज्य राजदूत (Consul Commercial) वगैरे पदे सांभाळत तो हेरगिरी करत राहिला.
याच काळात शीतयुद्ध-हेरगिरी प्रकारात एक मोठे प्रकरण घडत होते. १९५१ साली डॉनल्ड मॅक्लीन आणि गाय बर्गेस (Donald McLean, Guy Burgess) हे दोन ब्रिटिश हेर सोव्हिएत रशियात पळून गेले. त्यांची निष्ठा ब्रिटिश हेरखात्याशी जुळलेली नव्हती, तर कम्यूनिस्ट सोव्हिएत रशियाशी निगडित होती. यानंतरच्या वृत्तपत्री व इतर चर्चा ध्ये वारंवार एक मुद्दा सांगितला जात असे, तो असाः १९३३-३४ पासून सतरा-अठरा वर्षे वरकरणी ब्रिटिश हेर असलेले बर्गेस-मॅक्लीन प्रत्यक्षात सोव्हिएत रशियासाठी हेरगिरी करत होते, यात त्यांना आणखीन एका (तरी) माणसाची मदत असणारच! हा ‘थर्ड मॅन हायपॉथिसीस’ मुद्दा ग्रॅहॅ ग्रीन या लेखकाने ‘द थर्ड मॅन’ या कादंबरीतही (१९४८) ठसवला. ग्रीनचा मित्र किम (हॅरल्ड अॅड्रियन रसेल) फिल्बी याने हेरखात्यातील नोकरीचा राजिनामा दिला. (१९५१) कारण तो बर्गेस-मॅक्लीनचा मित्र होता. पण नंतरही बारा वर्षे तो वार्ताहरकी करत सोबतच ब्रिटनतर्फे हेरगिरीही करत होता!
१९६३ साली फिल्बीही पळून सोव्हिएत रशियात गेला. अर्थातच आणखीही कोणीतरी असणार, अशा अर्थाचा ‘फोर्थ मॅन’ मुद्दा उपस्थित झाला. अँथनी ब्लंट हा कलासमीक्षक ब्रिटिश राजघराण्याला त्यांच्या चित्रांच्या खरेदीत सल्ले देत असे. तो ‘फोर्थ मॅन’ आहे, हे ब्रिटिश हेरखात्याला माहीत होते. परंतु ते १९७३ च्या आसपासच जाहीर झाले. सोबतच जॉन केर्नक्रॉस नावाचा पाचवा माणूसही वरकरणी ब्रिटिश हेरखात्यात, पण प्रत्यक्षात सोव्हिएत रशियाचा हेर होता, हेही स्पष्ट झाले. बर्गेस, मॅक्लीन, फिल्बी, ब्लंट, केर्नक्रॉस, सारे केंब्रिज विद्यापीठात एकाच वेळी शिकत होते (१९३०-३३). आज त्यांना ‘केंब्रिज फाईव्ह’ या नावाने ओळखले जाते.
यांपैकी किम फिल्बी तब्बल पंचवीस वर्षे रशियात राहत होता. केंब्रिज फाईव्हपैकी तो सर्वांत उच्चपदस्थ हेर होता. बराच काळ तो इंग्लिश व अमेरिकन हेरखात्यांच्या समन्वयाचा मुख्य होता. हेरखात्यांबद्दलच्या माहितीचे आपले भांडार त्याने उघडे केले.
ज्या अनेक इंग्रज-अमेरिकन हेरांचा फिल्बीने ‘पर्दाफाश’ केला, त्यात वाणिज्य कॉन्सल म्हणून काम करणारा डेव्हिड जॉन मूर कॉर्नेवेल हा होता. त्याचे हेर असणे १९६४ साली उघड झाले, पण त्याआधीपासून, १९६१ पासून तो जॉन ल् कॅरे या टोपणनावाने कथा कादंबऱ्या लिहीत होता, हे मात्र उघड झाले नव्हते. ल् कॅरेची पहिली दोन पुस्तके ही सरळसोट डिटेक्टिव्ह कादंबऱ्या होती. त्यांत गुन्हे उकलणारा जॉर्ज स्मायली हा हेर आहे असे सुचवले मात्र आहे ; प्रत्यक्षात तो डिटेक्टिव्ह म्हणूच वावरताना भेटतो. यानंतर आले ‘द स्पाय हू केम इन फ्रॉ द कोल्ड’ (१९६४). जेव्हा एखादा माणूस हेरगिरी करायला शत्रूच्या देशात जातो, तेव्हा तो ‘आउट इन द कोल्ड’ असतो. पाठबळ, स्नेहीसंबंधी, अशा कशाचीही ‘ऊब’ त्याला मिळत नाही. प्रत्येक शास सांभाळून घ्यावा लागतो, सांभाळून सोडावा लागतो. बरे, हेर हा गणवेषधारी सैनिक नसतो. त्यामुळे पकडला गेल्यास त्याला जिनीव्हा करार वगैरेंचे संरक्षण नसते. तो युद्धबंदी मानला जात नाही, तर थेट मृत्युदंडच सामोरा येतो. आणि इथे तर स्वपक्षीयच नायकाचा ‘गोठवून’ बळी द्यायला तयार असतात! शत्रुपक्षाच्या हेरखात्यात दोन गट असतात. त्यांपैकी आपल्याला धार्जिण्या गटाला ‘यशस्वी’ करून दाखवायला ‘द स्पाय’चा बळी दिला जातो. एका पातळीवर कपटी बुद्धिबळाचा खेळ वाटणारा व्यवहार वेगळ्या पातळीवर जीवनमरणाचे प्रश्न कसे उत्पन्न करतो, याचे सुंदर चित्रण ‘द स्पाय…’ मध्ये आले. आणि एक सच्चा, सक्षम लेखक, अशी ल कॅरेची कीर्ती घडायला सुरुवात झाली.
‘द स्पाय….’ नंतरही ल् कॅरेने तीन पुस्तके लिहिली, एकूण सहा. पण हा सारा सराव होता. यानंतरच्या तीन पुस्तकां धून इंग्रज हेर जॉर्ज स्मायली आणि सोव्हिएत हेर कार्ला (घरीश्रर) यांचे एक द्वंद्व ल् कॅरेने रेखले. यांतले पहिले पुस्तक ‘टिंकर, टेलर, सोल्जर, स्पाय’ (१९७४) काही अर्थी किम फिल्बीवर होते. खरे तर फिल्बीची गोष्ट आणि ‘टिंकर, टेलर’ची गोष्ट यांच्यात नेकी समांतर स्थळे नाहीत. फिल्बी आणि एकूणच केंब्रिज फाईव्ह लोक देशद्रोही कसे झाले त्याचे उत्तम स्पष्टीकरण मात्र ल् कॅरे देतो. फिल्बीवर बेतलेले पात्र ‘बिल हेडन’ आणि जॉर्ज स्मायली हे केंब्रिज फाईव्हसारखेच उच्चवर्गी, अभिजन इंग्रज. दोघेही शिक्षणातून, सामाजिक स्थानातून ब्रिटिश साम्राज्य ‘चालवायला’ घडलेले.
पण दुसरे महायुद्ध संपून शीतयुद्ध सुरू होताना जेते तिशी गाठलेल्या या लोकांना चालवायला साम्राज्य उरलेलेच नव्हते. आणि असे होणार आहे याची पूर्वसूचनाही फिल्बी पिढीला मिळालेली होती. साम्राज्य चालवायची कौशल्ये आहेत, साम्राज्य मात्र नाही. मग पर्याय काय ?
एक तर नवश्रीमंत अमेरिकेची अधिसत्ता स्वीकारून मांडलिकासारखे राहायचे; नाहीतर आपला भ्रनिरासच नव्हे, विशासघात झाला आहे असे मानून ‘फसव्या’ स्वदेशाचा घात करत सोव्हिएत नवसाम्राज्याचे पाईक व्हायचे! एक लक्षात घ्यावे, की शीतयुद्धाच्या सुरूवातीला थट्टेने ब्रिटनचा उल्लेख ‘अमेरिकेचा एक्कावन्नावा प्रांत’ असा केला जाई. आजचे ब्रिटिश नागरिक याला भागीदारी मानतात, मांडलिकत्व नव्हे. पन्नाससाठ वर्षांपूर्वी मात्र मानी इंग्रजांना अमेरिकेशी संबंध अंतर्बाह्य दुखवत असणार.
केंब्रिज फाईव्हचा ‘टिंकर, टेलर’मधील नमुना असाच अमेरिकन वर्चस्व असह्य झाल्याने सोव्हिएत हेर झाला आहे. पण ज्या स्थितीने बिल हेडनला गद्दार केले, तीच स्थिती हेडनसारखीच पोर्शभू ी असलेल्या स्मायलीला मात्र जास्त नेटके, निष्ठावान काम करायला लावते. एकूण ब्रिटिश हेरखात्यात स्मायली नमुन्याची माणसे हेडन नमुन्याच्या माणसांपेक्षा जास्त असणारच. खुद्द ल कॅरेच्या टोपणनावाचा फ्रेंच भाषेतला अर्थ आहे, चौकोनी जॉन. इथे पु.ल.देशपांडे ज्या अर्थाने चौकोनी कुटुंब म्हणतात तो अर्थ घ्यायचा; कोणतेही वैशिष्ट्य नसलेला, ने का सरासरी वर्तणुकीचा, म्हणजे चौकोनी!
टिंकर, टेलर’मध्ये अनेक जागी हेडन तात्त्विक चर्चेकडे झुकणारे संभाषण करतो, तर स्मायली मात्र आज्ञाधारक मुलासारखा हातातले, ने लेले काम करत राहतो. पुस्तकात हळूहळू हे काम हेडनचा गुन्हा हुडकण्याचे आणि पुढे हेडनच्या देशद्रोहाचे दुष्परिणाम दूर करण्याचेच काम ठरते. चौकोनी जॉर्ज स्मायली ते काम पद्धतशीरपणे करतो. ‘टिंकर, टेलर’ मधला उत्कंठेचा, सस्पेन्सचा भाग उत्तम आहे. एका दूरवरच्या, कनिष्ठ दर्जाच्या हेराचे एका सोव्हिएत हेराच्या पत्नीशी झालेले ‘लफडे’, हा गोष्टीचा आरंभ आहे. इंग्रज ‘भुरटा’ हेर आपण सोव्हिएत हेर ‘फोडू’ शकतो असे लंडन कार्यालयाला कळवतो. त्याला आदेश तर येत नाहीतच, पण त्या रशियन बाईला मात्र घाईने पकडून ‘स्वगृही’ पाठवले जाते. हेराला अर्थातच लंडनमध्ये कोणी घरभेदी, सोव्हिएत निष्ठा असलेला उच्च अधिकारी असणार, हे सुचते. तो भूमिगत होऊन लंडनला परततो आणि आपल्या जुन्या वरिष्ठाला भेटून आपली शंका त्याच्यापुढे मांडतो. इथून सुरुवात होऊन निवृत्त स्मायलीचे पुनरागमन, पाचसात वर्षे जुन्या गुन्ह्यांची उकल, शेवटी बिल हेडनचे पकडले जाणे, हा सारा हेरचातुर्यकथांच्या कारागिरीचा मानदंड आहे. इंग्रजीतली प्रसिद्ध उपमा वापरायची झाली तर असे म्हणू, की गोष्टीची अंगे-उपांगे स्विस घड्याळाच्या नेकेपणाने एकमेकांशी जुळतात. पण हा कारागिरीचा, लीरषीरपीहळा चा भाग झाला.
त्यापेक्षा मजेदार आहेत ते मानवी नातेसंबंध. हषार, अविवाहित स्त्रियांचे निष्ठावान ‘संशोधना’चे काम आपल्याला एका निवृत्त हेर-स्त्रीच्या स्मायलीशी भेटीतून कळते. ती निवृत्तीनंतर ऑकस्फर्ड विद्यापीठात प्राध्यापक असते, आठवणी आणि ‘पिणे’ यांतून संधिवातावर मात करणारी! हेडनच्या देशद्रोहाने अनेक निम्न दर्जाच्या हेरांची आयुष्ये बरबाद होतात. नोकऱ्या तर सुटतातच, पण त्यांच्या निष्ठांवर प्रश्नचिह्ने उमटल्याने नव्या कारकिर्दी घडवणेही अवघड होते.
ब्रिटिश हेरखात्याचा पूर्वीचा प्रमुख ‘कंट्रोल’ याला आपल्या खात्यात एक उच्चपदस्थ गद्दार (मोल, चेश्रश, एक प्रकारचा उंदीर!) आहे, हे जाणवलेले असते. तो कोण असेल ते शोधायला कंट्रोल एक मोठे ‘ऑपरेशन’ योजतो. तेही शत्रुपक्षाला आधीच समजलेले असते. या फसलेल्या योजनेचा अनेक वर्षांनी स्मायलीने केलेला पंचनामा तर सुन्न करणारा आहे. एखाद्या मोठ्या बस किंवा रेल्वे अपघातातून वाचलेले तो अपघात आठवत असावेत, तसे वातावरण ल् कॅरे उत्पन्न करतो. बिल हेडनचा रशियन नियंत्रकही कंट्रोलसारखाच नाव-आडनाव यांचे एकत्रीकरण झालेला असतो. ‘कार्ला’ नावाचा. हा पूर्वी एकदा स्मायलीला भेटलेला असतो. (दिल्लीतल्या तुरुंगात!) त्यावेळी स्मायलीने त्याला निष्ठा बदलून ब्रिटिशांसाठी हेरगिरी करायचे आमंत्रण दिलेले असते. यावेळी स्मायली त्याला “तुझ्या पत्नीचीही सोय करता येईल. उलट तू परत रशियात गेलास तर एखादवेळी मारलाही जाशील”,असे सांगतो.
याच वेळी स्मायलीचा विवाह ताणात असतो. त्याची सुंदर पण उल्ल पत्नी अॅन अनेक लफडी करत करतच जॉर्जवर प्रे ही करत असते. आपल्या पत्नीच्या सोईची खात्री देणारा स्मायली स्वतःच्या पत्नीबाबत हळवा आहे, हे कार्लाला जाणवते. सोबतच ब्रिटिश वृत्तीही जाणवते, की पेशेवर आयुष्य आणि खाजगी आयुष्य यांच्यात गल्लत करू नये. व्यवहारात या दोन मुद्द्यांधून स्मायली आपल्या पत्नीच्या ‘प्रियकरां’ बद्दल ज्यादाच तटस्थ होणार, हे कार्लाला जाणवते. तो हेडनला आवर्जून अॅनशी लफडे करायचे सुचवतो, कारण यामुळे स्मायली हेडनवर हेरगिरीची,गद्दारीची शंकाच घेणार नाही !
एकदा हा पेच सुटला, की स्मायलीला हेडन देशद्रोही आहे हे सिद्ध करायची वाट सापडते. प्रत्यक्षात किम फिल्बी लफडेबाज होता. बर्गेस-मॅक्लीन यांच्या बायकांशी त्याचे संबंध होते. खुद्द बर्गेस, मॅक्लीन, ब्लंट हे उभयलिंगी वृत्तीचे होते, असेही मानले जाते. यात फिल्बीला त्याच्या लफडेबाजीने संरक्षण दिले, असा संदर्भ नाही. पण खाजगी व्यवहार आणि पेशेवर व्यवहार यांचे एकमेकांवर कसे परिणाम होऊ शकतात, हे मात्र ल् कॅरे तज्ज्ञ मानसशास्त्राच्या सफाईने दाखवतो.
‘टिंकर, टेलर’मधल्या घटनांनंतर ब्रिटिश हेरखाते (ल कॅरे आवृत्ती!)अस्ताव्यस्त होते. त्यातून सावरण्याची कथा ‘द ऑनरेबल स्कूलबॉय’ (१९७६) आणि ‘स्मायलीज पीपल’ (१९७९) या पुस्तकां धून ल कॅरे चितारतो. जर फिल्बी प्रकरण आणि त्याचा निपटारा येवढ्यावर ल् कॅरे थांबला असता तरी उत्कृष्ट, एखादेवेळी सर्वोत्कृष्ट हेरकथालेखक म्हणून त्याची कीर्ती टिकून राहिली असती. पण केवळ आपला घात होण्याच्या घटनेतले सत्य सांगणे, हे ल कॅरेचे उद्दिष्ट नव्हते. हेरांचे विश, त्याचे देशांधल्या राजकारणातले महत्त्व, त्याचा ‘नागरिक’ हेरांवरील परिणाम, अशा विस्तृत पटावरील कथानक ल कॅरेला मोहवू लागले होते. त्यामुळे स्मायली-कार्ला त्रिखंडात्मक कादंबरीनंतरही ल कॅरे हेरकथा लिहीतच आहे; आणि त्याही पस्तीसेक वर्षांत (१९७९-२०१३) चौदा, अशा ‘आदरणीय’ वेगाने!
सोव्हिएत रशिया फुटल्यानंतर उत्पन्न झालेली स्थिती, चेचन्यासारखे न सुटणारे प्रश्न, रशियन राजकारणावरचा वाढता गुन्हेगारी प्रभाव, रशियन माफियाचा ऑक्टोपस जगभर, अगदी अमेरिकेतही पसरणे, या साऱ्या घटना आणि प्रक्रिया ल् कॅरे त्याच्या पद्धतीने तपासतो आहे. सोबतच एकुलती एक महासत्ता, हे बिरुद मिळवणाऱ्या अमेरिकेची वागणूकही तो तपासतो आहे.
या सर्व साहित्यिक तपासात ल कॅरेचा दृष्टिकोन ठामपणे ब्रिटिश आहे. त्याचे सर्व-युरोपी (Pan-european) बालपण आठवता हे जरा आश्चर्याचे आहे. “टिंकर, टेलर’मध्ये एका प्रसंगात एका नव्या रंगरुटा’ची हेरखात्यासाठीची मुलाखत आहे. उमेदवार आपले युरोपचे, युरोपीय भाषांचे ज्ञान कसेकसे प्राप्त झाले ते सांगतो. मग इंग्रजी विनोदाचे अस्सल उदाहरण असावे तसा प्रश्न येतो, “मग (या सगळ्या युरोपी आयुष्यात) तुम्ही इतका चांगला ऑफ-ड्राईव्हचा फटका मारायला केव्हा शिकलात?’ ल् कॅरेलाही तसा प्रश्न विचारायचा मोह होतो, “दुहेरी-तिहेरी निष्ठांच्या आरसेनगरीतल्यासारख्या हेरविशात आयुष्य घालवूनही पारंपरिक उदारमतवादी ‘इंग्लिश जेंटलमन’चा दृष्टिकोन कसा टिकवता येतो?’ हो, ल कॅरे उदारमतवादी आहे!
श्रीमंत माणसे घाबरट असतात, तर ‘नंगेसे खुदा भी डरता है’, हे ल कॅरे ओळखून आहे. अमेरिका श्रीमंत आहे, आज जगातली एकमेव महासत्ताही आहे. पण यामुळेच ती घाबरट आहे. आपल्याविरुद्ध जगभर कट-कारस्थाने सुरू असतात, असा विकारी साशंकताभाव, रीिरपेळर अमेरिकन धोरणां ध्ये दिसते. त्यामुळे साध्या, तारुण्यसुलभ बंडखोरीनेही अमेरिकेचा शंकासुर जागा होतो. मग एकेकाळचे बंडखोर, रिवळलरश्र तरुण पुढे सौम्य होऊन एन्जीओछाप कामे करू लागले तरी अमेरिका त्यांच्यावर पाळत ठेवत राहते. पाळत ठेवणे सोपे जावे म्हणून त्यांच्या एन्जीओंना आर्थिक मदत करत त्यांना मिंधे बनवते. ‘अॅब्सल्यूट फ्रेंड्स’ (२००३) या कादंबरीत ल कॅरेने हा प्रकार तपासला. शंकेखोरी आणि ‘मुक्त’ बाजारपेठी विचार यांतून अमेरिकेने बऱ्याचशा हेरगिरीचे आणि आपल्यावर हेरगिरी करणाऱ्यांना पकडण्याचे (Intelligence आणि Counter intelligence) खाजगीकरण केले आहे. आज FBI, CIA या पारंपरिक अमेरिकन संस्थांचे काम बऱ्याच प्रमाणात ‘होलंड सिक्युरिटी’ या खाजगी कंपनीला दिले गेले आहे. होलंड सिक्युरिटीचे ‘कामगार’ मात्र FBI, CIA, सैन्यशाखा वगैरेधूनच येतात. हे केवळ अमेरिकेतच होत नाही, तर तिच्या प्रभावाखालच्या इंग्लंडातही होऊ लागले आहे. याचे चित्रण ल् कॅरेच्या ताज्या (२०१३) कादंबरीत ‘अ डेलिकेट टूथ’ मध्ये भेटते.
एका ‘शत्रू’ला जिब्राल्टर या ब्रिटिश वसाहतीत यायला लावून पकडायची योजना आखली जाते. योजना आखणारी संस्था हो लंड सिक्युरिटी नमुन्याची आहे. पण योजना यशस्वी होण्यासाठी ब्रिटिश मदत आवश्यक असते. एका कनिष्ठ ब्रिटिश मंत्र्याच्या मदतीने काही ब्रिटिश सैनिक व अधिकारी वापरून योजना कार्यान्वित केली जाते.
तिला ब्रिटिश सरकारची मान्यता नसते. प्रत्यक्षात ‘शत्रू’ कोणी नसतोच. केवळ एक निर्वासित स्त्री व तिचे मूल हे मारले जातात. पण कनिष्ठ मंत्र्याचा स्वीय सचिव या योजनेच्या आखणीचे ध्वनिमुद्रण करतो. त्याला आपल्या ‘साहेबा’ला पकडण्यातही रस नसतो; फक्त काय चालले आहे याबद्दल कुतूहल असते. ते कुतूहल शमवायचे प्रयत्न मात्र अनेक हिंस्र घटनांची फटाक्यांची माळ पेटवतात !
खाजगीकरण, अमेरिकीकरण हे रोग, हो रोगच, ब्रिटिश सरकारात किती खोलवर किती विस्तृतपणे रुजले आहेत, याचे चित्रण ‘अ डेलिकेट टूथ’मध्ये भेटते.मुळात एखाद्या जागेबद्दलचे प्रे, ‘देशप्रे’ याला साकडे घालणे, हा सहजपणे बदमाषीचा व्यवहार होऊ शकतो. त्यातही ‘देश धोक्यात आहे’चा नारा तर सहज शहाणपणावर मात करू शकतो. सातत्याने पन्नास वर्षे हा व्यवहार साहित्यातून तपासणारा ल् कॅरे देशप्रे ते देशभक्ती ते परक्यांचे भय ते हेरगिरीची गरज भासणे, हा साराचा प्रकार व्यर्थ मानू लागलेला दिसतो! आजवरच्या तेवीस कादंबऱ्या, दोन ललितेतर पुस्तके, यांसोबतच ल कॅरे लेखही लिहीत असतो. ‘द मॅडनेस ऑफ स्पाईज’ (The New Yorker, सप्टेंबर, २००८) या लेखातून आपण, सामान्य नागरिक, हेरखात्यांच्या गाढवपणाला कसे अप्रत्यक्ष प्रोत्साहन देतो, हे दाखवले आहे.
मला या टप्प्यावर ‘टाईम्स नाऊ’ चॅनेलचा अर्णब गोस्वामी ल् कॅरेला (बोलू न देता!) म्हणताना दिसतो आहे, “पण हेरां ळे काही आतंकवादी घटना रोखल्या जातात, हे खरे ना? नाही, श्री ल कॅरे, काही घटना घडतच नाहीत, हे खरे ना ? – – – – – – – ‘ ल कॅरेने २००३ साली ‘द यूएस हॅज गॉन मॅड’ हा लेख लिहिला. तो २००६ साली ‘नॉट वन मोअर डेथ’ या संग्रहात संकलित केला गेला. मी तो वाचलेला नाही. वाचायची गरजही नाही. टिळकांचा ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हा लेख कुठे आपण वाचायला जातो?

१९३, मशरुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर ४४००१०.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.