हिंदू कशाचा अभिमान बाळगू शकतात आणि त्यांनी कशाचा अभिमान बाळगावा

मूळ लेखक: रामचन्द्र गुहा

धर्माच्या भविष्याची चिंता करणाऱ्यांनी सुधारकांच्या कार्याचे मूल्य लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी ह्या प्राचीन, अश्मीभूत अनेक तुकड्यां ध्ये विभागल्या गेलेल्या धर्माला त्याच्या पूर्वग्रहापासून, त्याच्या संकुचित मनोवृत्तीपासून मोकळे केले.”
माझ्या एका उच्चवर्णीय ‘भद्रलोक’ मित्राचे असे मत आहे की १६ डिसेंबर हा दिवस भारत-सरकारने ‘विजय-दिवस’ म्हणून साजरा करावा. १९७१ साली बांगलादेश युद्धात, पाकिस्तानी सेनेने भारतीय सेनेसमोर त्यादिवशी शरणागती पत्करली होती. त्याच्यामते सर्वसाधारण भारतीय आणि प्रामुख्याने हिंदू ज्या सोशीक, पराभूत मनोवृत्तीमुळे पांगळे बनले आहेत त्यातून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे आणि विजय दिवसासारखे समारंभ त्यासाठी आवश्यक आहेत. परकीय आक्रमणांसमोर पराभूत होण्याची मानहानी भारतीय (विशेषतः हिंदू) हजारो वर्षे सहन करत आले आहेत. त्यामुळे ढाक्यातला विजय माझ्या मित्राच्या दृष्टीने इतिहासातला एक लखलखता क्षण आहे.
मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने उभारलेले जाहिरातींचे फलक वाचताना मला माझ्या ह्या मित्राच्या लाडक्या स्वप्नाची आठवण झाली. ह्या फलकावर एका प्रमुख भाजप नेत्याचे चित्र आहे आणि शेजारी इंग्रजी घोषवाक्य आहे : ‘मी हिंदू राष्ट्रवादी आहे.’ आणि हिंदीत लिहिले आहे ‘गर्व से कहो हम हिंदू हैं!’ दक्षिण भारतीयांसाठी दुसऱ्या घोषवाक्याचे भाषांतर करण्याची गरज आहे आणि तरुणांकरिता त्याचा संदर्भ स्पष्ट करायला हवा. ‘आपले हिंदुत्व अभिमानाने जाहीर करा’ हे त्याचे योग्य भाषांतर होईल. रामजन्मभूीकरिता १९८० आणि १९९० च्या दशकांध्ये जो लढा लढला गेला त्यात ह्या घोषवाक्याचा जन्म झाला होता. राम ह्या पौराणिक देवाच्या जन्मस्थानावर १६ व्या शतकातली बाबरी मशीद उभारली गेली आहे असा दावा करत विहिंप, रा.स्व.संघ, भाजप आणि बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी ती जमीनदोस्त करण्यात यावी अशी मागणी केली, आणि त्यासाठी माणसे आणि सामान गोळा करण्याच्या मोहिमेत ह्या घोषवाक्याचा वापर केला. ढाक्यातील विजय १९७१ मध्ये भारतीय सेनेने ढाक्याला जो विजय मिळवला त्याचा हिंदूंना अभिमान वाटावा का? युद्धाची मुळे पश्चिम पाकिस्तानी सेनेने पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकांची जी क्रूर दडपशाही केली त्यात होती. भारतात आलेले शरणार्थी हिंदूही होते आणि मुसलमानही होते. भारत सरकारने त्यांना मदत करताना त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा विचार केला नाही. भारताच्या लष्करी मोहिमेचा विचार केला तर युद्धभूमीवरचा प्रमुख अधिकारी एक ज्यू होता, त्याच्या वरचा अधिकारी शीख होता. चीफ ऑफ आर्मी स्टाफ पारसी होता. त्याचा वरिष्ठ अधिकारी–भारताचा पंतप्रधान–एक स्त्री होती जिने हिंदू माणसाशी विवाह केला नसल्याने पुरीच्या जगन्नाथमंदिरात तिला प्रवेश नाकारला होता. हे खरे आहे की भारतीय सैन्यातले अनेक अधिकारी आणि सैनिक हिंदू होते, पण तरीही स्वतःकडे त्यांनी संकुचित सांप्रदायिक दृष्टिकोनातून पाहिले नाही. तेव्हा आणि आतासुद्धा आपल्या लष्करी फौजां धील हिंदू आणि मुसलमान, ख्रिश्चन आणि शिख, पारसी आणि ज्यू एकत्र लढले, झगडले, जगले. हिंदू हेतू, हिंदू आशयः
१९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानात झालेली लष्करी मोहीम आणि अयोध्येध्ये मंदिर-उभारण्यासाठी घडवून आणलेली मोहीम ह्या अगदी वेगळ्या प्रकारच्या घटना होत्या. मंदिर उभारणीच्या मोहिमेचा हेतू आणि आशय निःसंशयपणे हिंदू होता. कुठल्याही मुसलमान, अथवा शीख, अथवा पारसी अथवा ज्यू किंवा ख्रिश्चन व्यक्ती त्यात सहभागी नव्हत्या; पण हिंदूंनी ह्या घटनेचा अभिमान बाळगायला हवा होता का? मला असे वाटत नाही. ज्या समाजातील बहुसंख्य लोकांना पुरेसे शिक्षण, आरोग्यसेवा, घरे उपलब्ध नाहीत, जिथली बरीच प्रजा कुपोषित आहे, जिथे सुरक्षा आणि पर्यावरणाचा दर्जा, त्यांच्यावर सतत होत असलेल्या आक्रमणामुळे धोक्यात आला आहे, अशा देशामध्ये एक मशीद नेस्तनाबूत करून तिथे नवे कोरे मंदिर उभारण्याकरिता एवढी प्रचंड राजकीय ऊर्जा आणि मानवी भांडवल खर्च करणे हे मूर्खपणाचे तर होतेच; पण धूर्त कावेबाजपणाही त्या कृतीत अंतर्भूत होता. परिणामतः उत्तर आणि पश्चिम भारत रामजन्मभूीच्या मोहिमुळे जवळजवळ दोन दशके संघर्षाच्या तणावाखाली होता. हजारो लोकांना प्राण गमवावे लागले, लाखो लोकांची घरे आणि उपजीविकेची साधने नष्ट झाली.
१९७१ चे युद्ध हे हिंदू युद्ध नव्हते आणि बाबरी मशिदीचा नाश ही घटना कुठल्याही हिंदूने अभिमान बाळगावा अशी नव्हती. मग हिंदूंनी कशाचा अभिमान बाळगावा? हिंदू धर्माच्या भविष्याची चिंता करणाऱ्यांनी एखादा विवक्षित क्षण किंवा एखादा मोठा विजय ह्यात गौरव मानण्यापेक्षा शांतपणे आणि सातत्याने काम करणाऱ्या सुधारकांच्या कार्यांचे मूल्य लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी ह्या प्राचीन, अश्मीभूत झालेल्या, अनेक तुकड्यां ध्ये विभागल्या गेलेल्या धर्माला त्याच्या पूर्वग्रहांपासून, संकुचित मनोवृत्तीपासून सोडवले. ज्या हिंदू-गौरवगाथेची गोष्ट मला सांगायची आहे त्याची सुरुवातही बंगालमध्येच होते. पण १९७१ मधील पाकिस्तानच्या शरणागतीपासून नाही, तर त्याच्या कितीतरी आधी १९ व्या शतकात राममोहन रॉय यांनी केलेल्या कार्यापासून होते. ते निःसंशय पहिले भारतीय आधुनिकतावादी होते. राममोहन रॉय ह्यांची ‘मोहीम’ सतीप्रथा बंद करण्यासाठी आणि एकूणच स्त्रियांना जास्त हक्क मिळावेत ह्यासाठी होती. आधुनिक विज्ञानाचा शिक्षणात समावेश करावा म्हणून ते धडपडले. मुक्त चिकित्सा आणि बौद्धिक चर्चेला आवश्यक असणाऱ्या उदार मनोवृत्तीला त्यांनी प्रोत्साहन दिले. ईशरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद ह्यांच्यासारख्या इतर बंगाली सुधारकांनी त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन स्त्रीशिक्षण आणि जातिव्यवस्थेचा नाश करण्यासाठी प्रयत्न केले. आमूलाग्र सुधारणावादी विचारांचा केंद्रबिंदू बंगालमध्ये सुधारकांनी पेटवलेली ही ज्योत महाराष्ट्रामध्ये अधिक रोजस्वी झाली. १९ व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतातील मूलभूत सुधारणावादी विचारांचे केंद्र महाराष्ट्रात होते. अस्पृश्यतेसारख्या हीन प्रथेवर जोतीबा फुल्यांनी खालून आणि गोपाळ कृष्ण गोखल्यांनी वरून हल्ला चढवला.
भारताच्या देशी जमिनीत रुजून उगवलेला पहिला स्त्री-मुक्तीवादी विचार — ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई ह्यांच्या रूपाने महाराष्ट्राने जोपासला. आपल्या निबंधांधून त्यांनी पितृसत्ताक पद्धतीवर कठोर टीका केली ज्यामुळे अनेक तरुण मुलींना प्रोत्साहन मिळून आधुनिक शिक्षणाचा मार्ग त्यांच्यासाठी प्रशस्त झाला. दोन दशके देशाबाहेर राहिलेले मोहनदास करमचंद गांधी १९१५ मध्ये भारतात परत आले. दक्षिण आफ्रिकेत राहत असताना हिंदू मुसलमानांत जास्त एकोप्याचे, परस्परांना हितकारक असे संबंध निर्माण होण्याची गरज त्यांना तीव्रतेने जाणवली होती. धार्मिक अनेकतत्त्ववादावरची आपली निष्ठा त्यांनी पुन्हा दृढ केली. दरम्यानच्या काळात जातिभेदाबद्दल ते जास्त चिकित्सक होऊन टीका करायला लागले. वर्णाश्रमधर्माचे प्राचीन तत्त्व त्यांनी उचलून धरले; पण अस्पृश्यतेवर हल्ला केला. नंतर एकमेकांत मिसळणे, एकमेकांबरोबर जेवणे ह्याचे समर्थन करून शेवटी आंतरजातीय विवाह ह्या संकल्पनेचा त्यांनी पुरस्कार केला.
गांधींना ह्या मूलभूत सुधारणावादी भूमिका घ्यायला डॉ. आंबेडकरांनी भाग पाडले. आंबेडकर श्रेष्ठ वकील होते, विद्वान होते आणि अस्पृश्य जातीत जन्माला आले होते. आधुनिकतावादी आणि विवेकवादी डॉ. आंबेडकरांचा विशास होता की दलितांना जर जुलांपासून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर अपराधी भावनेने ग्रस्त असलेल्या सुधारकांकडून मदतीची अपेक्षा न करता स्वतःच ‘शिक्षण, चळवळ आणि संघटनेच्या मार्गाने जाऊन स्वातंत्र्य मिळवले पाहिजे. डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व आजही प्रेरणादायी आहे. आणि त्यांचे कार्य आणि वारसा दलित आणि सवर्ण दोघांसाठीही अर्थपूर्ण आहे.
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ह्या नवीन राष्ट्रासमोर केंद्रस्थानी असलेला प्रश्न होता, धर्म आणि राष्ट्र ह्यांच्यामधला संबंध. भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित केले जावे ह्याकरिता एक जो दार चळवळ सुरू झाली – इस्लामी पाकिस्तानची ‘आरशातील प्रतिमा’ ह्या मताच्या विरोधात खंबीरपणे उभी राहिलेली व्यक्ती होती पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. १५ ऑक्टोबर १९४७ ला मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्रात ते सांगतात, “आपल्या देशात असलेल्या अल्पसंख्य मुसलमानांची संख्या एवढी जास्त आहे की ते इच्छा असली तरी इतर कुठे जाऊ शकत नाहीत. त्यांना भारतातच राहाणे भाग आहे. ही मूलभूत परिस्थिती आहे ज्याच्या बाबतीत कुठलीही चर्चा संभवत नाही. पाकिस्तानने कितीही चिथावले आणि तिथल्या गैरमसलमानी जनतेवर अत्याचार करून तिला अपमानित केले तरी आपल्याला इथल्या अल्पसंख्य मुसलमानांशी सभ्यतेनेच वागायला हवे. त्यांना लोकशाही राज्यातल्या नागरिकांचे हक्क आणि सुरक्षा मिळायलाच हवी.” धर्मातील भिन्न मतांचा आदर करणारे गांधी हे एका अर्थी ‘पाखंडी’ हिंदू होते. सनातनी ब्राह्मणांनी त्यांचा इतका राग केला की सर्व शंकराचार्यांनी मिळून एक स्वाक्षरी-मोहीम राबवायचा प्रयत्न केला ज्यात गांधींना ‘अहिंदू’ घोषित करण्याची ब्रिटिशांना विनंती केली होती. नेहरू हे ‘भ्रष्ट’ हिंदू होते. प्रौढ आयुष्यात ते कधीही देवळात गेले नाहीत. हिंदूंच्या वतीने बोलण्याचा अधिकार आगाऊपणे स्वतःकडे घेतलेले संत-महंत आणि शाखाप्रमुख नेहरूंचा तीव्र द्वेष करत असत. आंबेडकर तर धर्मत्याग केलेले हिंदू होते. हिंदुधर्मात जन्माला येऊन आयुष्याच्या शेवटी त्यांनी त्याचा त्याग केला. मृत्यूच्या काही महिने आधी त्यांनी समारंभाने धर्मांतर केले. सनातन धर्मापासून भ्रष्ट होऊनसुद्धा — किंवा भ्रष्ट झाल्यामुळेच — गांधी, नेहरू, आंबेडकर ह्या विसाव्या शतकातल्या तीन व्यक्तींनी हिंदू धर्गाला त्यातील अनिष्ट गोष्टींपासून आणि अतिरेकी विचारांपासून मुक्त केले. गनुरगृतीने नाकारलेले सगान नागरिकत्वाचे तत्त्व जोपासण्यासाठी ते शौर्याने लढले. त्यांनी आणि त्यांच्या आधी होऊन गेलेल्या सुधारकांनी केलेल्या संस्मरणीय कार्याचा हिंदूंनी अभिमान बाळगायला हवा.
खोलवर रुजलेले पूर्वग्रह
ह्या सगळ्या चर्चेनंतरही हिंदूंनी लाज बाळगावी अश्या बऱ्याच गोष्टी आहेत. दलितांवर आणि स्त्रियांवर आजही होत असलेले अत्याचार, जात आणि पितृसत्ताक पद्धतीचे पूर्वग्रह भारतातील खूप भागां ध्ये किती खोलवर रुजलेले आहेत हे दर्शवतात. दरम्यान आपल्या शेजारी राष्ट्रां ध्ये इस्लामी मूलतत्त्ववाद वाढतो आहे ज्यामुळे येथील तीव्र सांप्रदायिक पंथांना आणि कट्टर हिंदुधर्मीयांना खतपाणी मिळते आहे. राममोहन रॉय आणि ज्योतिबा फुल्यांनी सुरू केलेला आणि नेहरू आंबेडकरानी पुढे नेलेला लढा पुन्हा लढण्याची गरज निर्माण झाली आहे. जातीबद्दलचे पूर्वग्रह मोडून काढणे, लिंगभेद नष्ट करणे, धार्मिक अनेकतत्त्ववादाला प्रोत्साहन देणे — हे काहीसे धूसर आदर्श स्वतःला (गर्वाने किंवा कसेही) हिंदू आणि भारतीय म्हणवणाऱ्या लोकांसमोर आहेत.

१९३, मश्रुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर ४४००१०.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.