फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांचे भवितव्य !

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी 4 एप्रिल 2014 रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील ‘मतसंग्रामा’च्या बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.

नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणाच्या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष खाली दिलेले आहेत. अंदाज / भाकितं निकाल निष्कर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही चूक कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही भाजप 282 चूक काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही युती 334+ चूक भाजपला 155 ते 165 जागा 282 चूक काँग्रेसला 115 ते 126 जागा 44 चूक राष्ट्रवादीला 8 ते 10 जागा 6 चूक शिवसेनेला 10 ते 12 जागा 18 चूक समाजवादी पक्षाला 18 ते 22 जागा 5 चूक बसपाला 16 ते 18 जागा 0 चूक महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखीच परिस्थिती चूक आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही बरोबर वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी मोदींना यश मिळेल बरोबर वाराणसीत त्यांना ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांची कडवी लढत मिळेल फरक 371784 चूक एकही सेलिब्रेटी निवडून येणार नाही बरोबर पुण्यात विश्वजित कदम आणि अनिल शिरोळे यांच्यात अटीतटीची लढत फरक 315769 चूक विश्वजित कदम यांची सरशी होणार चूक मुंबईत सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. सर्व जागा युतीला चूक मावळला लक्ष्मण जगताप निवडून येणार बारणे विजयी चूक शिरूरला शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार आहेत बरोबर नितीन गडकरींना केवळ पाच ते दहा हजार मतानी विजय मिळेल फरक 284828 चूक येणारे सरकार दोन ते तीन वर्ष टिकणार वाट पाहू या त्या निवडणुकीतून येणारे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल वाट पाहू या भाकीत 21 व 22 साठी वाट पहावी लागेल. परंतु उरलेल्या 20 भाकितांपैकी केवळ 4 भाकितं बरोबर ठरली. वरील आकडेवारीवरून निष्कर्ष काढल्यास फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांच्या खरे खोटेपणविषयी संशय घेण्यास भरपूर वाव आहे असे म्हणता येईल. सुज्ञास जास्त सांगणे न लगे!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.