‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’

सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बौद्धधर्म हिंदुस्थानांतून परांगदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडीवाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठे होते? विद्वान संशोधकांच्या मते, आर्याच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्ष धरली, तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव, देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे? आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरडय़ा भाकरीची पंचाईत! पण या देवांना सकाळची न्याहारी! दुपारी पंचपक्वान्नांचे भरगच्च ताट! पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय दिवस सुना जायचा नाही.”

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकावरून

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.