प्रतिसाद

( 1)
मे 2016 च्या संपादकीयात आपण वाचकांच्या संवादहीनतेबद्दल चिंता प्रकट केली आहे, ती शंका रास्त असली तरी तिला दुसरी बाजूही आहे. कोणत्याही नियतकालिकाचा वाचक हा त्या नियकालिकाचा फक्त शिष्य असावा/व्हावा, त्याचे (वाचकाचे) मित्रत्व मान्य होणार नाही, ही विचारधारा बहुतेक नियतकालिक चालकांची असते. शिष्यत्व म्हणजे जुन्या परिभाषेत एक पायरी खाली व मित्रत्व म्हणजे समपायरीवरील, असा हा प्रकार आहे. काही वाचकांना, किंबहुना बहुतेक वाचकांना शिष्यत्व मान्य नसून ते मित्रत्वाची अपेक्षा करतात, परंतु त्यांची ती अपेक्षा म्हणजे नियकालिकाच्या ध्येय धोरणाला, विचारधारेला विरोध अशी भावना संचालकांच्या मनात सुप्तरूपाने का होईना अवतरित झालेली असते. त्यामुळे वाचकांच्या पत्रांना कोणताही प्रतिसाद न देणे, ही वृत्ती बळावू लागते. अशाने वाचकही अलिप्त होत होत दूरावतो व अशा नियतकालिकांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागते. यासंबंधाने मला मे 2016 अंकातीलच संजय संगवई यांच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदातील एक वाक्य उद्धृत करावेसे वाटते. ते वाक्य असे – ‘‘स्वतःची मूल्ये कायम ठेवून नव्या, ‘इतर’ गोष्टी सामावून घेऊन संस्कृती वाढत, समृद्ध होत जाते.’’ या वाक्यातील ‘संस्कृती’ या शब्दाच्या जागी ‘विचार’ किंवा ‘विचारधारा’ हा शब्द ठेवल्यास मला काय म्हणावयाचे आहे हे स्पष्ट होईल.
कोणत्याही नियकालिकासाठी वाचक हा घटक प्रथम महत्त्वाचा असतो, हे सांगावेच लागत नाही. तरी वाचकांच्या विचार, अ-विचार, कुविचारांकडे मात्र दुर्लक्षच करण्याची प्रवृत्ती जास्त प्रमाणात आढळते. मी सुमारे 30-31 नियतकालिकांचा वैयक्तिक ग्राहक/वाचक आहे. त्यांतील बहुतेकांमध्ये मला हीच कम्युनिकेशन गॅप दिसून येते. 3-4 नियतकालिकांमध्ये मी वाचकांच्या पत्रव्यवहाराला जागा मिळवून दिल्याचे मला अल्पसमाधान असले तरी यात आणखी वाढ व्हावी असे मला वाटते.
सुमारे 25-30 वर्षांपूर्वी पुण्याहून (कदाचित) प्रपंच प्रकाशनाने (भूलचूक देणे घेणे) ‘मला काही सांगायचंय’ या नावाचे फक्त वाचकांच्या पत्रव्यवहाराला वाहिलेले पाक्षिक सुरू केले होते. (मी त्याचा ग्राहक/वाचक/पत्रलेखक होतो.) परंतु थोड्याच कालावधीत वाचकांच्या पत्रांच्या अभावी त्यांना ते पाक्षिक बंद करावे लागले. (मला वाटते हा प्रयोग संपूर्ण जगातील प्रथम व एकमेव असावा.) यावरून वाचकही किती निष्क्रियतेने वागतात, हेसुद्धा सिद्ध होतेच. असे असले तरी वाचकांच्या पत्रव्यवहाराला पुरेशी जागा देणारे ‘अंतर्नाद’ सारखे नियकालिक आहेतच व त्यांना वाचकांची पत्रे छापण्याला जागाही अपुरी पडते, इतकी पत्रे येतात असे जाणवते.
एकंदरित ‘वाचकांची संवादहीनता’ ही एकतर्फी बाब नसून ती नियकालिक <===>वाचक अशी दूतर्फा बाब आहे व त्यासाठी नियत-कालिकांच्या संचालकांनी काही प्रमाणात बदलणे आवश्यक आहे, असे माझे मत आहे. वाचकांना शिष्य बनविण्याऐवजी त्यांना मित्र बनवावे, म्हणजे वाद-संवादातून विचार-प्रसार तर घडेलच, वाचकांनाही विविध विचारधारांचा परिचय होईल, पर्यायाने नियतकालिकाचाही प्रसार होईल असे मला वाटते. असो.
शेवटी ‘पसंद अपनी-अपनी, खयाल अपना-अपना’ हे आहेच. कळावे, ही विनंती.
– लखनसिंह कटरे
मु.पो.बोरकन्हार, ता. आमगांव, जि.गोंदिया – 441902
चलभाष ः 07066968350
(2)
आजचा सुधारक, 3 मे 2016 चा अंक.
संजय संगवई यांचा लेख अप्रतिम आहे. तरी पण भातखंडे यांच्या पुस्तकातून अशिक्षित मुसलमान कलावंत यांचेवर्तन चांगले नसते असे त्यांनी म्हटले आहे. भातखंडे हिंदुत्ववादी नव्हते आणि चांगल्या मुसलमान गायकांनाव्यवस्थित दाद देत असत.
“कट्यार काळजात घुसली” या चित्रपटात मात्र हिंदू-मुसलमान संघर्ष दाखवला आहे. दारव्हेकारांना असा संघर्ष दाखवायचा नव्हता असे मला वाटते.
चतरसिंग जाम यांचा लेख फारच चांगला वाटला. अशा रीतीनेच सगळीकडे कामे व्ह्यायला हवीत. जाणकारअर्थशास्त्रज्ञ व कृषी तज्ञांची भंबेरी उडणार नाही.सुरेश सावंत यांचाही लेख चांगला आहे. जे एन यु चे कन्हेय्या कुमार फार चांगले किंवा फार वाईट असतील असेमला वाटत नाही. जे एन यु चे कन्हेय्या कुमार एक सर्वसामान्य विद्यार्थी युनियनचे लीडर असतात तसे आहेत. Social Studies ला (विशेषतः मार्क्सवादी) social sciences म्हणतात कारण Natural Sciences शी History चे साम्य दाखवायचे असते. ‘मिल्ग्रम प्रयोग” या मुळी यांच्या लेखात Social sciences आणि natural sciences यातले मूलगामी फरक दाखवले जातील असे वाटले होते. मिल्ग्रमप्रयोग विघातक आहेत हे उघडच आहे.प्रदीप पुरंदरे यांनी वर्णन केलेली पात्रे सिनेमात दिसतात. चांगले राजकारणी किंवा धूर्तराजकारणी अश्या तर्हेने बोलतात असे मला वाटत नाही. वाईट राजकारणी डाव्या आणिउजव्या दोघांमधे सापडतात.प्रदीप पुरंदरे डावे असावेत असे मला वाटते.
उत्पल व.बा. यांच्या लेखात डावी बाजू म्हणजे विज्ञान-आधारित जीवन आणि उजवी बाजू म्हणजे धर्माधारित राज्यअशी समजूत दिसते. हे दोन शब्द खरे म्हणजे स्टेट आर्थिक कंट्रोल किंवा आणि निजी आर्थिक स्वतंत्रता या अर्थानेआहेत. बदल हवा हे मत जाणकार डाव्यांचे आणि जाणकार उजव्यांचेही आहे. उजवा विचार (म्हणजे RSS नाही)सगळं सोपं करतो आणि डावा विचार मात्र खरा असे उत्पल व.बा.यांचे मत दिसते. चांगले विश्लेषण आणि सखोलविचार सगळेच चांगले विचारवंत करतात. ती डाव्यांची मक्तेदारी नाही. गरीब गरीब का आहेत या महत्त्वाच्याप्रश्नाचा विचार सगळेच चांगले विचारवंत करतात.
शेवटी संपादकीय. “बाजारशरण” या शब्दावर माझा आक्षेप आहे. व्यवसाय म्हटले म्हणजे नफा हा आलाच. वाईट मार्गाने नफामिळवण्यावर निर्बंध हवेत पण कायदेशीर मार्गाने नफा कमावणारे पण भरडले जाऊ नयेत. बाजार या शब्दाला वाईटवास आहे. मार्केट या शब्दाला नाही. सरकारी नियम बरोबर असतील तर मार्केट चांगल्या वस्तूंनाच आणि योग्यभावालाच प्रोत्साहन देतो वाईट वस्तूंना आणि अयोग्य भावाला नाही
मुकेश अंबानीच सरकारी नियम बनवतो असे आपले म्हणणे असेल तर वादविवाद नंतर केव्हातरी करावा लागेल.

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.