‘आजचा सुधारक’च्या वाचकांसाठी जाहीर निवेदन

गेली २७ वर्षे ‘आजचा सुधारक’ने विवेकवादाशी असणारी आपली निष्ठा अढळ राखत, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मार्गक्रमण केले. आर्थिक, व्यवस्थापकीय व कायदेशीर अडचणी अनेकदा आल्या. सत्तावीस वर्षांनीही आजचा सुधारकचे स्वतःचे कार्यालय नाही, पगारी कर्मचारी नाही. आम्ही आमच्या लेखकांना मानधन देत नाही, तसेच आतापर्यंतच्या सर्व संपादकांनीही कोणतेही मानधन न घेता जवळजवळ पूर्णवेळ हे काम केले आहे. आपण सर्वानीही वेळोवेळी आम्हाला साथ दिली आहे.

परंतु, काही काळापूर्वी पोस्ट खात्याने कमी दराच्या टपालहशिलासह अंक पाठविण्याची आमची सवलत काढून घेतली. एवढेच नव्हे तर सुमारे तीन लाखांवर दंड ठोठावला. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान सुधारकचे छापील अंक कोणत्या दराने वाचकांना पाठवावे ह्यावर पोस्ट खात्याने कोणतेही निश्चित धोरण न आखल्यामुळे गेले तीन अंक वाचकांना पाठविण्यात अक्षम्य उशीर झालेला आहे. त्याबाबत अजूनही काही निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत हे मासिक बंद करण्याचा निर्णय अतिशय जड अंतःकरणाने आम्हाला घ्यावा लागत आहे.

ज्या वार्षिक वर्गणीदारांनी डिसेंबर २०१७ पर्यंत वर्गणी भरली असेल त्यांना एप्रिल ते डिसेंबरची वर्गणी परत करण्यात येईल. आजीव वर्गणीदारांना त्यांच्या किंवा नियतकालिकाच्या अखेरपर्यंत अंक पाठवावेत असा संकेत आहे. तरीही जर कोणा आजीव वर्गणीदारांना त्यांच्या वर्गणीतील हिस्सा परत हवा असेल, तर तसे त्यांनी श्री. भरत मोहनी ह्यांना bharat¬_i@yahoo.com ह्या पत्त्यावर किंवा ९८२२७३६८०८ ह्या फोनवर कळवावे. त्यांना त्यांच्या विनंतीनुसार ती परत करण्यात येईल.
आपल्या आजवरच्या सहकार्याबद्दल व प्रेमाबद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद.

आपला,
भरत मोहनी
प्रकाशक, आजचा सुधारक.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.