मासिक संग्रह: एप्रिल, २०२०

आय डू व्हॉट आय डू

‘आय डू व्हॉट आय डू’ डॉ. रघुराम राजन यांचे आज गाजत असलेले पुस्तक. ते वाचून मला लिखाण करावेच लागले.’….मार्च २०१८

मला अर्थशास्त्रामध्ये कसा काय रस उत्पन्न झाला ते आठवत नाही. पण जॉन केनेथ गालब्रेथ यांची ‘इंडस्ट्रियल सोसायटी’, ‘पॉवर’ यांसारखी गाजलेली काही पुस्तके वाचल्यापासून तो विषय समजायला आणि म्हणून आवडायला लागला. नंतरही अनेक अर्थतज्ज्ञांची पुस्तके जेवढी जमतील तेवढी वाचली आणि त्यातून माझी एक समज घडत गेली. आर्थिक विकासाच्या संदर्भात नागरी अर्थव्यवस्था आणि ग्रामीण ‘नांगरी’ अर्थव्यवस्था (आसाराम लोमटे यांच्या ‘धूळपेर’मधील भावलेली ही व्याख्या) यांबाबत थोडा अभ्यास केला होता.

पुढे वाचा

जंक फूड

जंक फूड हा शब्दच फसवा व विरोधाभासी आहे. कुठलेही अन्न हे जंक कसे काय असू शकते? जंक या शब्दाचा अर्थच मुळी भंगार, टाकाऊ असा होतो व कुठलीही खाण्याची वस्तू ही अशी असणे शक्यच नाही. तरीही जंक फूड हा शब्द इतका प्रचलित झालेला आहे की त्यामधील विरोधाभास सहज लक्षातदेखील येत नाही.

खरेतर मनुष्य जन्माला आल्यापासून ते अखेरचा श्वास घेईपर्यंत तो खातच असतो व तेही दिवसातून किमान ३ वेळा. याचा अर्थ मनुष्याचे सरासरी आयुर्मान ८० वर्षे धरले तर त्याच्या संपूर्ण आयुष्यात साधारणपणे ८८००० वेळा खाण्याची क्रिया घडते.

पुढे वाचा

शेतीक्षेत्रातील महिलांच्या सबलीकरणासाठी स्वयंसहाय्य गट

भारतात कामकरी महिलांपैकी ८०% महिला शेतीत व संलग्न व्यवसायात आहेत. शेती, पशुपालन, वनीकरण, मासेमारी या व्यवसायात शेतकरी, मजूर, किरकोळ विक्रेते म्हणून त्या काम करतात. या महिला सामाजिक, आर्थिक, राजकीय व आरोग्य या दृष्टीने सर्वात जास्त वंचित आहेत. या महिलांचे सबलीकरण करून त्यांचा विकास करणे हे फार मोठे आव्हान आहे.

आर्थिक स्थिती- शेतीमध्ये महिला पेरणी, रोवणी, निंदणी, कापणी, खुडणी, वेचणी यांसारखी अकुशल व कष्टाची कामे करतात. शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांची मजुरी ही पुरुषांपेक्षा कमी असते व त्यांना नियमित काम मिळत नाही. कोरडवाहू शेतीत केवळ ४०-५० दिवस काम मिळते व ओलीत क्षेत्रात ८० ते १०० दिवस काम मिळते.

पुढे वाचा