मन मेलं आहे… आणि हातावरच्या रेषा

मन मेलं आहे…

आता दुःख करणंही सोडलं आहे,
सुन्न होणं दूरच
आता 
हळहळ करणंही सोडून दिलं आहे.

निर्भया बलात्कारानंतर वाटलेला
क्रोआक्रोश आटला आहे.
कशासाठी कोणासाठी मेणबत्त्या लावायच्या?
अन्याय होतो, पण न्यायासाठी व्यक्ती मात्र या जगातही नाही.

दगडाला सुद्धा जिथे पाझर फुटतो असं म्हणतात,
तिथे आता हृदयाला पाझर फुटणं कठीण झालं आहे.
मुद्दामच, कळूनही, माणसाने स्वत:तील माणुसकी
कुठे तरी संपवून टाकली आहे
.
जिथे असे नरभक्षक, वासनांध जन्माला येतात, निर्माण होतात,
ज्यांना कोणाचं भान रहात नाही,
तिथे आता स्व
तःची कीव करावीशी वाटते.

जिथे स्त्रीला पुजलं जातं,
तिथे तिची लक्तरं ओढली
जाता.
त्या समाजातील चित्र अजून काय वेगळं असावं?
आणि का
अपेक्षा करावी?
आज अश्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या अनेक घटनांनी
वाईट वाटेनासे झाले आहे
.

बोलण्यासाठी तिथे काहीच उरलं नाही
तिथे स्वतःची सुरक्षा तरी कशी मागायची?
न केंव्हाच मेलं हे

मन केंव्हाच मेलं आहे.
आई, बहीण, सून, सासू
आता नातीसुद्धा संपली जिथे
मन केंव्हाच मेलं आहे

मेणत्त्या पेटवून, न्याय मागून
अन्याय संपत नाही तिथे,
मन केंव्हाच मेलं आहे.
कलिका… तिचे हरण, शोषण करिती
नराधम तिथे,
मन केंव्हाच मेलं आहे.

हातावरच्या रेषा….

हातावरच्या रेषांनीच
ठरवले असते जर
सर्व काही त्यांनी बदलले

तर
कोणीच काम केले नसते.

म्हणतात रेषा, नशीब घडवतात.
हातावरच्या रेषा;
खरंतर कष्ट करताना
पुसल्याही जातात.

कष्टकरी लोकांना
एकदा विचारून तर बघा,
त्यांनी त्यांच्या रेषा
हात न दाखवताच बदलेल्या आहेत.
आयुष्यभर काम

करता करता.

अभिप्राय 12

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.