मनोगत

‘आजचा सुधारक’चा लेखकवर्ग आणि वाचकवर्ग यांचे प्रतिसाद सुधारकच्या टीमसाठी एकंदरीतच अतिशय उत्साहपूर्ण ठरत आहेत. ऑनलाईन स्वरूपात सुरू केला तेव्हा सुधारकचा आवाका विस्तारावा अशी इच्छा असली तर ते इतक्या अल्प वेळात साध्य होईल अशी कल्पना नव्हती. आज सुधारकच्या लेखांवर येणारे प्रतिसाद नवनव्या विषयांवर साधकबाधक चर्चा होत आहे याचेच द्योतक आहेत.

वैचारिक चर्चेमध्ये सर्वांत आवश्यक घटक असतो, तो प्रश्न उपस्थित करण्याचा असे आम्ही मानतो. सुधारकच्या लेखांच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण तर होत आहेच; सोबतच वाचकांच्या मनात प्रश्न उपस्थित करण्यातही सुधारक यशस्वी ठरत आहे.

असे प्रश्न विचारांना चालना देतात. नवे रस्ते शोधण्याचे बळ देतात. असे प्रश्न मनात उमटत राहाणे आणि ते व्यक्त होण्यासाठी सुधारकसारख्या व्यासपीठांनी सजग असणे यातूनच सामाजिक बदलांच्या विचारांनाही चालना मिळते.

‘आजचा सुधारक’चा अंक तुम्हाला कसा वाटला हे कळवत असतानाच यात आणखी सुधारणा काय आणि कशा करता येतील अशा सूचनांचेदेखील स्वागत असेल.

नव्या वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.