मासिक संग्रह: जून, २०२२

आवाहन

स्नेह.

इतिहास ही घडलेल्या घटनांची नोंद असते. त्या त्या काळातील सत्य परिस्थिती काय होती हे जाणून घ्यायचे असेल तर इतिहासाकडे व्यक्तिनिष्ठ दृष्टीतून न बघता वस्तुनिष्ठ/सत्यनिष्ठ दृष्टीतून बघता यायला हवे. तसे झाले नाही तर इतिहासाकडे बघताना जे झाले ते योग्य/अयोग्य, चांगले/वाईट, नैतिक/अनैतिक हे व्यक्तिनिष्ठ, भावनेनुसार ठरवले जाते. काळानुरूप हे मापदंडही बदलतात. जुने संदर्भ मिटवण्याचा, झाकण्याचा, तसेच सोयीचे असणारे संदर्भ, तथ्ये समोर मांडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी इतिहास बदलत नाही. असे असताना जे झाले त्याचा नम्र स्वीकार करणेच योग्य नाही का? पूर्वी घडून गेलेल्या कुठल्याही घटनेबद्दल अभिमान किंवा लाज न वाटू देता त्याविषयीची स्पष्ट स्वीकृती महत्त्वाची नाही का?

पुढे वाचा