माझ्या देशात

माझ्या देशात..

कितीही दंगली होवोत.

कितीही अत्याचार हावो.

कितीही हल्ले होवोत.

त्यात कधीच…..

माणसे मरत नाहीत.

याआधीही मेली नाहीत.

पटत नसेल तर…

जुना दस्तावेज तपासा…

दिसतील तुम्हाला,

वर्तमानपत्राच्या हेडलाईन.

दंगल वा हल्ला झाल्यावर..

हिंदूला भोसकले…

मुसलमानाची कत्तल…

हिन्दूला जाळले..

मुसलमानाला चिरले…

दाखवा एखादा पुरावा

माणसे मेल्याचा…

दाखवा एखादी हेडलाईन

दंगलीत माणसे मेल्याची..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.