मनोगत

चित्र – तनुल विकमशी

जगण्याच्या रोजच्या धडपडीतून, मनात चाललेल्या वैचारिक गोंधळाकडे थोडे दुर्लक्ष होत असते. परंतु सभोवतालच्या घटनांमुळ आपण अस्वस्थ होत असतो. ही अस्वस्थता दूर करण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे संवाद. हा संवाद परस्परांमध्ये थेट घडत असतो किंवा पुस्तके, नाटके, चित्रपट, वा समाजमाध्यमे अशा अनेक मार्गांनी तो घडत असतो.

१८ डिसेंबर २०२२ ला पुणे येथे झालेली नास्तिक परिषद ही संवादाची अशीच एक जागा होती. ‘आजचा सुधारक’च्या प्रस्तुत अंकासाठी केलेल्या आवाहनात या परिषदेच्या निमित्ताने आपण काही प्रश्न उभे केले होते. त्यांपैकी काहींची उत्तरे आपल्याला या अंकात नक्कीच वाचायला मिळतील. याशिवाय राज्यघटना, शिक्षणव्यवस्था, पर्यावरण यांसारखे महत्त्वाचे विषयही या अंकात समाविष्ट आहेत.

लेखांवरील तुमचे प्रतिसाद इतर वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक लेखाखाली मोकळी जागा आपण देत असतो. ती जागा संवादाची/व्यक्त होण्याचीच आहे. तेथील प्रतिसाद हे जसे वाचकांसाठी आहेत, तसेच ते लेखकांसाठीदेखील आहेत. टीका किंवा कौतुकाची पावती या दोन्हींचे तेथे स्वागत असते, याची नोंद घ्यावी.

हा अंक तुम्हाला भावेल अशी आशा.

समन्वयक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.