अविनाश पाटील ह्यांच्या भाषणाचे समालोचन

डिसेंबर २०२२ च्या १८ तारखेला पुण्यातल्या गोखले सभागृहात राष्ट्रीय नास्तिक परिषद थाटात सम्पन्न झाली. परिषदेची सुरुवात अविनाश पाटील यांच्या विचारप्रवर्तक भाषणाने झाली. अविनाश हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ब्राइट्सचे जुने स्नेही आणि सहयोगी आहेत. महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर आपल्यातून हिरावले गेले, त्यावेळी बसलेल्या तीव्र धक्क्यातून आणि कठोर अग्निपरीक्षेतून बाहेर पडण्यासाठी अविनाश यांनी अंधश्रद्धांशी लढ्याचा अधिक तीव्र निर्धार केला. दाभोलकरांची हत्या ही कदाचित अजूनही त्याचा ‘तपास’ करणाऱ्या CBI साठी एक रहस्य असेल, पण जगभरच्या विवेकवादींसाठी ते तसे नाही. एका अश्या तात्त्विक विचारवंताची हत्या-ज्याने एका ‘निधर्मी’ राष्ट्राने देऊ केलेली सुरक्षा नाकारली आणि त्यामुळे धर्मांध शक्तींच्या भ्याड हल्ल्याला बळी पडले.

सुरुवातीला विचारपीठावरील वक्त्यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केल्यावर अविनाश यांनी इतिहास आणि पुराणे (मायथॉलॉजी) यात फरक करण्याची आणि नागरिकांनी सांवैधानिक मूल्ये जपण्याची गरज जोरकसपणे विशद केली. आताच्या धर्माच्या मुखवट्यामागे असणाऱ्या उजव्या विचारांच्या विदुषकी चाळ्यांना हे आव्हानच आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी श्रोत्यांना आठवण करून दिली की ही विवेकी विचारांची दशके-शतके-पिढ्यानुपिढ्या चालणारी लढाई आहे आणि जिचा परिणाम म्हणून आपण आजूबाजूला बदलत जाणारा समाज बघतोय.

त्यांनी श्रोत्यांसाठी काही प्रश्नसुद्धा उपस्थित केले-आपण विवेकवादी लोक धार्मिक समाजाच्या भावना समजून घेण्यात कमी पडतोय का? आपण आपले पुरोगामी विचार त्यांच्यावर लादल्याने, आपणच त्यांच्या तीव्र प्रतिक्रियांसाठी आणि त्यामुळे अपरिहार्यपणे स्वतःच्या पराभवासाठी जबाबदार आहोत का? त्यांनी विवेकी साथींना आपले विचारांचे क्षितिज विस्तारण्याचा आणि संघटन मजबूत करून एकमेकांशी जोडून घेण्याचा चांगला सल्ला दिला. त्यांनी सांगितले की कोविडच्या २ वर्षांच्या काळात त्यांनी आधीच्या प्रयत्नांचा मागोवा घेतला आणि त्याची खोलवर चिकित्सा केली. त्यांनी कबूल केले की अंनिस आणि इतर विवेकवादी चळवळी समाजावर चांगला प्रभाव पाडण्यात/बदल घडवून आणण्यात तितक्याशा यशस्वी/परिणामकारक ठरल्या नाहीत. इथून पुढच्या भाषणात अविनाश यांनी आपल्या संघटनांसाठी काळानुसार बदलण्याची आणि त्यानुसार प्रासंगिक राहण्याची गरज अधोरेखित केली.

 “आपण आपली भूमिका सोडणे त्यांना अपेक्षित आहे का?” या अस्वस्थ करणाऱ्या विचारांत ब्राइट्स सदस्य अडकले. सुरुवातीची हलकी चुळबुळ अस्वस्थेत/अस्वीकारात परावर्तित झाली जेव्हा त्यांनी पाश्चात्य आणि भारतीय विवेकवादात स्पष्ट फरक असल्याचे सांगितले. त्यांनी विवेकवादाच्या परिप्रेक्ष्यात धार्मिक विचार स्वीकारण्याचे आणि त्याची नवी व्याख्या करण्याचे सुचवले. आश्चर्यकारकरित्या त्यांनी धार्मिकतेच्या भारतीयत्वाचा आवश्यक भाग असण्याला संविधानाचा दाखला दिला जेव्हा की संविधानाने भारत एक इहवादी-निधर्मी राष्ट्र असल्याचे स्पष्टपणे उद्घोषित केले आहे. निधर्मी असणे म्हणजे “कुठल्याही धर्माशी संबंधित नसणे”. अविनाश यांनी ‘निधर्मी’ या संकल्पनेचा खूप जास्त वापरल्या गेलेल्या पण चुकीच्या अशा “सर्वधर्मसमभावा”शी गल्लत केली आहे का? 

त्यांनी निरीश्वरवादासारखी कुठलीही टोकाची भूमिका नाकारणारे ‘ग्रामीण शहाणपण’ अंगिकारण्याचा सल्ला दिला. त्यांनी एक किमान समान कार्यक्रम अंमलात आणण्याचे आवाहन केले ज्यात नास्तिकता/निरीश्वरवाद अंतर्भूत नसेल/वगळले जाईल, किमान त्यात संघटना तरी निरीश्वरवादी नसतील. भाषणाच्या पुढच्या भागात त्यांनी मान्य केले की हा विचार त्यांना नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर सुचला होता. याचा अर्थ असा होतो का की यापुढे अंनिसने अंधश्रद्धांनाही सौम्यपणे विरोध करावा? यामुळे आम्हाला महाभारताच्या समरप्रसंगी हतबुद्ध होऊन शस्त्रे खाली टाकणाऱ्या अर्जुनाचे स्मरण झाले.

कदाचित अविनाश यांनी हे लक्षात घेतले नसावे की ज्याला ते टोकाची भूमिका म्हणतात ती विवेकी, निरीश्वरवादी किंवा इहवादी समुदायासाठी ‘स्वाभाविक’ भूमिका आहे. तुम्ही कधीतरी एखाद्या नास्तिक/निधर्मी अतिरेक्याचे नाव ऐकले आहे का? ते क्षेत्र फक्त धर्मांध व्यक्तींसाठी राखीव आहे. नास्तिक/निधर्मी लोकांनी धर्म ही एक आदिम भावना असल्याचे ओळखून खूप आधीच सोडून दिली आहे. ते उत्क्रांतीतून विकसित झालेल्या तर्कसंगत विचार करण्याच्या क्षमतेवर चालतात. अविनाश यांना आम्ही पुन्हा अश्मयुगात जायला हवे आहे का? ते म्हणाले की तुमची मते व्यक्तिगत ठेवा आणि काम करा. तशी समान उद्दिष्टे ब्राइट्स सोसायटीसाठी फक्त राजकीयच असतील, विवेकी अथवा तार्किक नसतील. 

अविनाश यांनी मान्य केले की अंनिससोबत नास्तिकांनी खूप काम केले, पण जेव्हा नास्तिकांनी नास्तिकांसाठी संघटना स्थापन केली तेव्हा त्यांचे अंनिसमध्ये स्वागत झाले नाही. उघड आहे की अविनाश छोट्या-मोठ्या अंधश्रद्धांना त्यांच्याहून मोठी अंधश्रद्धा असलेल्या धर्माचा भाग मानत नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन करत असतांना धर्माचे समर्थन करणे हा एक विरोधाभास आहे. हे म्हणजे एखाद्या विषारी झुडुपाच्या अधिक वाढलेल्या फांद्यांची काटछाट करत असताना त्याच्या मुळांना पाणी घालण्यासारखे आहे.

त्यानंतर त्यांच्या एका विरोधाभासातून दुसरा विरोधाभास समोर येतो-पाश्चात्य विरुद्ध भारतीय विवेकवाद. अविनाश यांनी आपल्याला तथाकथित भारतीय विवेकवाद स्वीकारायचा सल्ला दिला जो एका बाजूला भारताच्या संत सुधारकांना आणि दुसऱ्या बाजूला ब्राइट्ससारख्या टोकाच्या नास्तिक विचारवंतांना सामावून घेतो. अविनाश यांनी धर्माच्या आणि राज्याच्या विभाजनाची गरजसुद्धा नाकारली. त्यांनी कुठलाही पुरावा न देता दावा केला की तथाकथित ‘भारतीय विवेकवादा’ने सर्व आस्तिक-नास्तिकांना सामावून घेऊन भारतीय समाज पुढे नेला. खरंच असे आहे का? माझ्या अंगावर तर या विचारानेच काटा येतो की यामुळे अंतिमतः उजवे अतिउत्साही गट आपल्या विवेकवादालाही (राष्ट्रद्रोह) anti-national म्हणतील.

पण विवेकवाद निश्चितपणे गणितासारखा वैश्विक आहे आणि त्याचे भारतीय/पाश्चिमात्त्य असे विभाजन होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती भारतीय विचारधारेप्रमाणे गणित करू शकत नाही तसेच ‘भारतीय कुलाचाराप्रमाणे विवेकवाद’ अशी काही गोष्ट असू शकत नाही. दोन अधिक दोन सर्व देशांत आणि संस्कृतींत चारच झाले पाहिजेत. पण त्याबद्दल नंतर कधीतरी, अविनाश यांच्यासोबतच, एखाद्या वादविवादामध्ये मी माझी भूमिका मांडेन. 

अविनाश यांनी आपल्याला खात्री दिली की जसजसे लोक अंधश्रद्धांमधून बाहेर येतील, तसतसे ते निरीश्वरवादाकडे वळतील. जर असेच असले तर आपण आपल्या अंधश्रद्धा त्यागण्याच्या अंतिम उद्दिष्टाबद्दल पूर्ण पारदर्शकता का बाळगू नये? आपला खरा हेतू जाहीर न करणे म्हणजे आपली अहंमान्यता/शिष्टपणा, दांभिकता ठरून आणि वर लोकांच्या शहाणपणावर प्रश्न उपस्थित करणे ठरेल जे फक्त सामाजिक जडणघडणीमुळे अंधश्रद्धा पाळतात.

कुमार नागेंना अविनाश यांच्या भाषणानंतर त्याचा गोषवारा एका लहान टिप्पणीत गुंडाळावा लागला- 

ब्राइट्सची भूमिका ईश्वराची कल्पना निःसंदिग्धपणे, पूर्णपणे आणि जाहीरपणे नाकारणे आहे, कारण धर्म आणि जातीप्रमाणेच ती तर्कहीन आहे आणि बहुतेकांकडून संरक्षण म्हणून उपयोगात आणली जाते. अधिक महत्त्वाचे म्हणजे एखादी कल्पना फक्त बहुसंख्येने स्वीकारली आहे म्हणून मान्य केलीच पाहिजे असे नसते. हे म्हणजे चर्चसहित शंभरातील नव्याण्णव जण ग्रहमालेच्या मध्यभागी पृथ्वी आहे आणि सर्व ग्रह आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतात हे गॅलिलिओसारख्या एखाद्याने मान्य न करण्यासारखे झाले. विवेक आणि वैज्ञानिक पुराव्याच्या आधाराने आपण अल्पसंख्य असूनही एखादी सुस्पष्ट भूमिका घेऊ शकतो.

अभिप्राय 9

  • ‘भारतीय विवेकवाद’ ही सबगोलंकारी आणि भोंगळ कल्पना आहे. चार्वाक तत्त्वज्ञानाच्या विपरीत आहे. मानवतेची मुल्येच वैश्विक असल्याने त्यांची देशानुरूप विभागणी होऊ शकत नाही.

  • हा लेख टोकाची भूमिका घेत आहे असं मला वाटत. एखादा नास्तिक माणूस दुराभिमान न बाळगता आणि आपली नास्तिकता न लपवता आपल्या सांस्कृतिक ओळखी विषयी ममत्व बाळगू शकतो. ह्या ममत्वाला लगेच धर्मांधता, fascism वगैरे लेबलं लावणं ठीक वाटत नाही.. श्री काळे ही लेबलं लावत नसतील पण ते त्याच वाटेनं जात आहेत.

    काळे विचारतात की तुम्ही कधीतरी एखाद्या नास्तिक/निधर्मी अतिरेक्याचे नाव ऐकले आहे का? त्यांनी 1925 ते 1945 या दोन दशकातल्या तेव्हाच्या कम्युनिस्ट सोवियेत रशियाच्या सामाजिक बदलांची आणि चळवळींची माहिती करून घ्यावी.

    काळे पुढं म्हणतात, “एखादी व्यक्ती भारतीय विचारधारेप्रमाणे गणित करू शकत नाही तसेच ‘भारतीय कुलाचाराप्रमाणे विवेकवाद’ अशी काही गोष्ट असू शकत नाही”. का नाही? निरुपद्रवी कुलाचार (संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे) आणि शिष्टाचार (नमस्ते, राम राम वगैरे) हा सांस्कृतिक ओळखीचा किंवा सवयीचा भाग असला तरी हे पाळून विवेकवाद आणि नास्तिक्य का राखता येऊ नये?

    आणि हो, गणित आणि विचारधारा किंवा संस्कृती यांचा अजिबात संबंध नाही हे म्हणणे न पटणारे. शून्याधारित दशस्थानांकाची पद्धत एखाद्या संस्कृतीत विकसित होईल तर दुसरीकडे दुसरी पद्धत. एखाद्या विचारधारेत विश्वसंच (universal set) असू शकत नाही तर दुसऱ्या संच प्रारुपात तो गृहितक म्हणून स्वीकारला जातो. गणितातील सांत (finitist, realist), अनंत (infinitary, platonic) आणि औपचारिक (formalist) या विचारधारा पायाभूत गणितातील तत्वज्ञांना माहीत असतात. त्यानुसार पायाभूत गणितातील (तर्क, संच थियरी वगैरे) प्रारुपे किंवा आकृतीबंध विकसित होतात.

    नास्तिकता आणि मूल्याधिष्ठित मानवतावाद स्वागतार्ह पण मूल्याधिष्ठित मानवतावाद केवळ नास्तिकच मानतात हे म्हणणे पटणारे नाही. तसं असेल तर गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा अर्थ लागू शकत नाही.

    विवेकवाद आणि नास्तिक्य हे एकच आहेत किंवा एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत हे प्रत्येक वेळी खरं असेलच असंही नाही. नरेंद्र दाभोळकरांच्या हे शेवटी लक्षांत आले असावे. म्हणूनच ते आम्हाला संतांचा देव – “जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले” असे देवत्व – मान्य आहे असे म्हणून गेले.

  • श्री पडळकर यांच्या टिप्पणी चे स्वागत आहे. परंतु काही स्पष्टीकरण आवश्यक आहेत. आम्ही नास्तिक लोक धर्मांच्या अधीन विकसित झालेल्या समृद्ध संस्कृती, कला आणि संगीताचे कौतुकच करतो. याच अंकात इतर ठिकाणी आम्ही लिहिले आहे की नास्तिक लोक कुठलाही कलेचा नमुना तो केवळ धर्मावर आधारलेला आहे म्हणून नाकारणार नाहीत. पुढे, आज आपण ज्याला आतंकवाद म्हणतो त्याला १९२५ ते १९४५ या काळात रशियातील हिंसक राजकारणाचा संदर्भ नाही. दुसर्‍या जागतिक युद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघ स्थापन झाले, एक नवीन विश्व व्यवस्थेची स्थापना झाली, त्या व्यवस्थेत आपण जगत आहोत आणि धार्मिक आतंकवादला बळी पडत आहोत. तसेच, नास्तिक, तार्किक लोकांना “राम राम” (ज्याने राज्यासाठी पत्नीस सोडले, शांबूक चा विनाकारण वध केला) किंवा “शुभं करोति” (“माझा नमस्कार सर्व देवांपाशी”) कधीच जमणार नाही. एवढे मात्र खरे की जीवन शुद्ध विज्ञान आणि गणित असू शकत नाही. ते तर्क आणि भावना यांचे मिश्रण आहे. माझे सह-सदस्य श्री अजित गाउनेकर जीवनाला “विवेक आणि भावना” या जोडप्याची संज्ञा देतात.

    • १. “आम्ही नास्तिक लोक धर्मांच्या अधीन विकसित झालेल्या समृद्ध संस्कृती, कला आणि संगीताचे कौतुकच करतो” हे लेखकाचे मत स्वागतार्ह!

      २. सोव्हियत रशियातील League of Militant Atheism (१९२५ -४७) यांतील अनेक पाद्रींची हत्या.. तसेच फ्रेंच राज्यक्रांती तील हिंसक जेकोबिन चळवळ ही अतिरेकी नास्तिक्याची किंवा तत्सम प्रवृत्तींची काही उदाहरणे. स्वतः हिटलर नास्तिक होता की आस्तिक या विषयी मत-मतांतरे आहेत. इतरत्र येथील एका लेखात जगात सध्या १८% नास्तिक आहेत किंवा असावेत असं वाचल्याच आठवत. हे सगळे दूधके धूले आहेत असं समजणं बाळबोध पणाचं ठरेल! राग, लोभ, प्रेम, स्वार्थ, अहंकार, दंभ वगैरे मानवी भावना आहेत त्या नास्तिकांमधे असल्यास आश्चर्य वाटू नये.

      ३. आपल्याला शबरीचा राम पाहिजे, निषादाचा राम पाहिजे की प्रक्षिप्त उत्तर रामायणातील शंबुकाचा वध करणारा राम हे ज्याचं त्यानं ठरवायचं. शंबुकाला मारणारा राम नको हे ठीक.. तो मूळ वाल्मिकी रामायणातील राम नव्हेच! त्यासाठी कुणाला “राम राम” अभिवादन नाकारायच असेल किंवा संपूर्ण रामायणच नाकारायच असेल तर ते त्याच स्वातंत्र्य. आम्हाला (म्हणजे माझ्या सारख्या नास्तिकांना) “राम राम” किंवा “शुभंकरोती” च वावडं नाही. शुभंकरोती ही दिव्याची प्रार्थना.. सर्व देवांची प्रार्थना नव्हे!

      ४. विवेकवाद आणि संस्कृती यांची संपूर्ण फारकत अशक्य. म्हणूनच विवेकवादाचा सांस्कृतिक विकास होऊ शकतो. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय उपखंडातील गणित, खगोलशास्त्र आणि तत्वज्ञान, विशेषतः प्रमाण शास्त्र (epistemology) ही त्याची काही उदाहरणे. लीलावती ग्रंथातील गणित शिकवण्याची काव्यमय पद्धत ही खास भारतीय. गणित आणि तत्वज्ञान यांचा पश्चिम युरोपातील विकास हा तेथील बुद्धिनिष्ठ संस्कृतीचा भाग असतो.

  • या अभिप्रायातील आणी मूळ समालोचनेतील विचार माझे व्यक्तिगत विचार आहेत.

  • It is typical of any blind faith: On the one hand, to split and sanitize Ram by disowning Shambook and embracing Shabaree, on the other hand to juxtapose us, the poor atheists from Pune, with militant atheists of 18th-century France and 1925 Russia – why, even Hitler! Who will ‘nirmool’ the blind faith from those who pledge to ‘nirmool andhashraddha’ is my moot question.

    Mr. Padalkar’s silence on Seeta is conspicuous. Let me help him: Ram did not dump Sita for kingdom. He ‘sacrificed his family life’ to serve the nation, right? We have a glaring example of a Sita’s Ram, and several examples of Shabree’s Rams who visit and pose for the camera eating her humble food before elections. It does not help though. Because, the Shabaree of our dreams is not poor (India’s income gap MUST fall) and our Nishaads must row in clean rivers not polluted by religious offerings.

    More seriously and without condoning violence let us note that the atheism of the French revolution and ancient Russia was a reactionary, anti-church atheism to snatch political power from a cruel all-powerful church. Many of them took to extreme violence. Such atheism is no different from theism, because it carries the hallmarks of theism: blind faith in leaders (Rams) and hate in the heart. The atheism born out of knowledge and reason, particularly scientific understanding (as in modern, post-WW era) is passionate: it rejects religions; not the religious, who are simple, gullible folks.

    So gullible that they cannot absorb a simple lesson from their own child’s 8th standard reading: “In India, government spaces like law courts, police stations, government schools and offices are not supposed to display any one religion” (CBSE textbook: Social and Political Life-III, Chapter 2, Page 21). Seen any office in Maharashtra without religious imagery? Even annual rituals? If no, care to join us in this primary-school public tuition? We can adjust it to our risk-taking capacity.

    Lastly, there is no gainsaying that there could be a hundred approaches to science and mathematics. But rightly or wrongly we are stuck with the western one: what we know as mathematics from our school books and the Newtonian approach to physics. After all, Vaimānika Śāstra never produced an airplane for our religious leaders to fly.

  • श्री काळे म्हणतात: “It is typical of any blind faith: On the one hand, to split and sanitize Ram by disowning Shambook and embracing Shabaree … ”

    रामायणातील शंबूक कथा नाकारणे हा सामाजिक उत्क्रांतीचा किंवा समाज सुधारणेचा भाग म्हणून पहाता येईल. ही अंधश्रद्धा खचित नव्हे! अंध-श्रद्धाळू किंवा अंधभक्त ही कथा नाकारणार नाहीत तर तिचे समर्थन करतील.

    बाकीच्या ठिकाणी काळे यांच्या वरील उत्तराला विरोध असायचे काही कारण नाही. मुद्दा हा की प्रहार करण्यापेक्षा प्रबोधन हे जास्त उपयुक्त. आजचा सुधारक याच साठी सुरू केला गेला असावा असं मला वाटतं.

  • Yes, Mr. Padalkar, A.C.S. is certainly a platform to debate progressive ideas, not to attack anyone.

    In our discussion, other side of the coin is, in general, I do not recommend passing organized atheism as rationalism. Atheism can only be a personal position—like being vegan, or gay.

    LGBTs may huddle together for safety (laws are sketchy), but in atheism is no crime in India. It is not dangerous to be an atheist. It is also not a license to denigrate theists. At best an atheist organization can provide a platform for free, rational conversation.

    Given generations of conditioning organized atheism is prone developing features of an organized religion with atheist leaders replacing spiritual leaders. The followers remaining the same: ‘sheep (citing from Christianity) blessed to be led into green pastures and to lie near refreshing water’ and equally mean toward fellow humans. Such organizations cannot bring about any social change.

    No doubt opposing blind faith on the scientific grounds is brave rationalism (Note the dangers of the word “blind”). Still, we can talk about them only as organizations against blind faith. A specific agenda. Like ANiS. There can be no ‘organized rationalism’ just like there cannot be ‘organized big-bang theory’.

    Atheist rationalism can be discerned from irrationality by conduct. As organization do our atheists embrace democratic principles? Are they tolerant to dissent? Do they follow ‘due process’ in resolving differences? Do they fight local corruption? What they do against the heaps of garbage in the Maharashtrian streets? Unclean rivers?

    Will they unite for asking public offices, Courts, to remove temples from their premises (under the Constitutional doctrine of state-religion separation)? Or, at least, will they be vocal in support of politically subdued 2017 GR of Fadnavis Government directing all government institutions to keep religion out of their premises? (Under my RTI that GR is still valid. Press wrongly teported it as withdrawn.)

    Rationalism is about living rationalism, not speaking about it. If atheist organizations draw a blank on all the rational issues facing Mahararashtra, then it’s all about speeches, high tea and misguided politics. Not rationalism.

  • 👍

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.