काळ बदलत आहे…!

अलीकडे माणसं होतायेत निकामी

भेसूर चेहरे अडकताहेत

तंत्रज्ञानाच्या महाकाय जाळ्यात…

गतिमान होणाऱ्या काळात

धर्मांधतेच्या वाळवंटात पाय रुतून पडलेत..

ऑक्सिजन झालाय गढूळ!

हवेतील समानतेचा ओलावा होतोय जहरी..

मेंदू झोपलेत, डोळे बंद आहेत

ही प्रतिकृती होऊन बसलीय शत्रू

सारं अगदी चिडीचूप

फक्त आदेश घेणे…पुढे जाणे…

हे हात पडलेत गळून

सौंदर्यमुद्रा होतेय अंधूक…. धूसर

गर्भबीजांवर होतंय अतिक्रमण

माणूस होतोय बेवारस दिवसेंदिवस 

हे तेच उगवलं जे पेरलं होतं

अती विकासाच्या नावातील भयंकर अंधार…

पायरीवर पाऊल टाकून स्तब्ध उभे राहा

गर्दीचा भाग बनून, रेंगाळत

पुढे सरका

नव्या युगात तुमचे स्वागत आहे

डोळे मिटवून माना हलवा

आता काळ बदलत आहे…!

जि. वाशिम
मो. 7875173828

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.