“परंपरा”

“याहून महत्त्वाचा भाग समग्र मराठशाहीच्या आर्थिक पायाचा किंवा आत्यंतिक भाषेत बोलावयाचे म्हणजे हीस खरा पाया होता की नाही? कां ती केवळ बिनबुडाची होती?” . . . केतकर विनोदाने म्हणत असत की, मराठ्यांच्या मोहिमांचें मूळ सावकारांच्या तगाद्यांत शोधले पाहिजे! मानी बाजीराव कर्जाच्या भारामुळे ब्रीद्रस्वामींपुढे कसा नमत असें याबद्दलचे राजवाड्यांचे निवेदन प्रसिद्ध आहे. . . ही कर्जे, कधीच कां फिटली नाहीत? पुढील वसुलाच्या भरंवशावर आधींच रकमेची उचल करावयाची, असे सर्वांचेच व्यवहार सदैव कसे राहिले? यांचा शास्ता, नियंता कोणी नव्हताच काय? आमच्या सत्ताविस्ताराच्या आर्थिक पायामुळेच आमच्यांतील मिरासदारी वृत्ती, ऐदीपणा व गैरहिशेबीपणा हे आजचे पुढील दुर्गुण उत्पन्न झाले काय?

[१३ डिसेंबर २००० च्या महाराष्ट्र टाईम्समधील श्री. शि. ना. माने यांच्या लेखात डॉ. धनंजयराव माडगिळांच्या एका पुस्तकातील वरील उतारा उद्धृत केला. गाडगिळांचे १९६२ सालचे पुस्तक आजही कालबाह्य झालेले नाही. आजचे बाजीरावही आजच्या ब्रह्मेद्रस्वामींपुढे नमतच आहेत!]

राजकारणात कोण शिरतो?
रुदॉल्फ व्हॉव (Rudolf Virchow) हा एकोणिसाव्या शतकातील जर्मन वैद्य होता. त्याला पाश्चरने सुचवलेले कारण पटत नसे, की रोगांचे मूळ सूक्ष्म कृमींमध्ये आहे. पण जसजसा पाश्चरच्या मताला पूरक पुरावा साचत गेला, तसतसे व्हॉवचे महत्त्व कमी होत गेले. आपली चूक कबूल करण्याऐवजी तो राजकारणाकडे वळला.
[१६ डिसें. २००० च्या हितवादावरून]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.