आजचा सुधारक च्या संपादकांनी ‘सेक्युलरिझम् ‘ वर मला लिहावयाला सांगितले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांची प्रश्नावली आणि त्यानंतर आमचे मित्र श्री दिवाकरराव मोहनी यांचे आजचा सुधारकमधील लेख मी वाचले. त्या लेखातील प्रत्येक मुद्याला उत्तर देण्याऐवजी प्रथम आपली भूमिका विशद करावी आणि या विशदीकरणातून त्यांचे काही मुद्दे सुटले, तर त्यांचा परामर्श घ्यावा, असे मी ठरविले आहे. संपादकांनी घालून दिलेल्या शब्दमर्यादेचा भंग न करता मी हे करणार आहे. त्यामुळे काही मुद्दे सुटण्याचीही शक्यता आहे. पण आजचा सुधारक मध्ये या विषयावर चर्चा चालू राहणार आहे.
विषय «जात-धर्म»
इहवाद व हिंदू राष्ट्र
१९४७ च्या सत्तान्तरानन्तर आमचे राज्य secular आहे असे म्हणण्यास पं. नेहरूंनी सुरवात केली. वस्तुतः आमच्या संविधानात, हा प्रचार सुरू झाला तेव्हा secular हा शब्द नव्हता. तो पुढे इन्दिरा गांधीनी घातला. आज बहुधा सर्व पक्षांची secular म्हणवून घेण्यात अहमहमिका लागली आहे.
असे असले तरी या शब्दाच्या अर्थाबद्दल मात्र विलक्षण गोंधळ आहे. काँग्रेसजन साधारणतः secular च्या विरुद्ध communal असा शब्द वापरतात, व रामजन्मभूमीच्या विमोचनाच्या चळवळीला communal म्हणतात. उलट रामजन्मभूमीचे विमोचन ही secular चळवळ आहे असा दावा या चळवळीचे नेते मांडतात.
चेम्बर्सच्या कोशात ‘Secular’ या शब्दाचा अर्थ “Pertaining to the present world or things not spiritual’ असा दिला आहे.
जातिविग्रहाच्या मर्यादा व धोके
सध्या भारतात, विशेषतः उत्तर भारतात, मंडल आयोगाच्या काही शिफारसी केंद्र सरकारने अंमलात आणल्या म्हणून व्यापक प्रमाणात दंगली होत आहेत. राखीव जागांचे समर्थक व विरोधक मोठ्या अहमहमिकेने समर्थन व विरोध करीत आहेत. अशा वातावरणात पहिला बळी जातो तो विवेकाचा. या चळवळीत तरुण माणसे अविवेकी बनतात आणि उत्तर भारतात सवर्ण वर्गातील अनेक. रुणांनी आत्मदहन करून घेतले. त्यात दोघांचा बळी गेला. सरकारने विवेक दाखवला नाही तर अनेक लोकांचा बळी जातीजातीतील दंगलीत, गोळीबारात आणि आत्महत्येत होईल अशी चिन्हे दिसत आहेत. सरकार जर विद्यार्थ्यांशी चर्चा करणार नसेल, त्यांचे भवितव्य धोक्यात घालणार असेल, तर आत्मदहनाचा मार्ग कितीही आततायी असला तरी तो समजू शकण्यासारखा आहे असा युक्तिवाद राखीव जागांचे विरोधक करीत आहेत, तर कोणत्याही समाजसुधारणेस असा विरोध होतच असतो.
फुले-आंबेडकर शताब्दी समारोहाच्या निमित्ताने
हे वर्ष सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेबद्दल आस्था बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण या वर्षीपासून जोतीराव फुले यांची मृत्युशताब्दी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी प्रचंड उत्साहानिशी साजरी होत आहे. कालगतीने जयंतीमयंती आणि त्यांच्या शताब्दीही येतच असतात, पण त्या सगळ्याच समारंभपूर्वक साजऱ्या होत नसतात. तुरळक महापुरुषांच्याच वाट्याला हे सन्मान येत असतात कारण त्यांच्या विचाराबद्दल व कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी समाजाला या सोहळ्यांमधून मिळत असते. पण त्याचबरोबर काळाचा संदर्भही तितकाच महत्त्वाचा असतो. १८२७ साली जन्मलेल्या जोतीरावांची जन्मशताद्वी १९२७ साली कालक्रमाने आली होती. अगदीच नगण्य प्रमाणावर ती साजरी झाली असावी असे काही पुरावेही कागदोपत्री सापडतात, पण एक गोष्ट निश्चित की महाराष्ट्र राज्य-स्थापनेनंतर जोतीरावांच्या प्रतिमेला जेवढा उजाळा मिळाला आणि त्यांच्या कीर्तीचा जेवढा उदोउदो झाला तेवढा पूर्वी कधीच झाला नव्हता.