मासिक संग्रह: सप्टेंबर, २०००

तर्क अप्रतिष्ठित कसा?

“तर्क अप्रतिष्ठित आहे म्हणून दुसऱ्या रीतीने म्हणजे वचनप्रामाण्याने अनुमान करावे असे तुमचे (म्हणजे पूर्वपक्षाचे) म्हणणे असेल तर ते चूक आहे. कारण ह्याप्रमाणे देखील तुमची (म्हणजे पूर्वपक्षाची) ह्या अप्रतिष्ठितत्वाच्या आक्षेपा-तून सुटका होत नाही. शब्दप्रामाण्य मानल्यास शब्द अनेकांचे आहेत व त्यांचे अर्थही अनेक करता येतात. म्हणून शब्दप्रामाण्यच अप्रतिष्ठित आहे. म्हणून तर्क अप्रतिष्ठित मानू नये आणि तर्काने सिद्ध होईल तेच ब्रह्माचे ज्ञान ग्रहण करावे”. “दृश्यते त्वग्र्यया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः” (ब्रह्म सूक्ष्मबुद्धि मनुष्यांच्या श्रेष्ठ बुद्धीने पाहिले जाते) असे उपनिषदाने कंठरवाने सांगितलेही आहेत. “श्रुतेस्तु शब्दमूलत्वात्’ २।१।२७ ह्या सूत्राचा अर्थ श्रीशंकराचार्य करतात तसा नाही.

पुढे वाचा