मासिक संग्रह: सप्टेंबर, २००६

आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन

आयुर्वेदाच्या ऱ्हासाची कारणे बरीच असली तरी मोगल आणि इंग्रजांचे आक्रमण हा यातील एक मोठा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मोगल आक्रमणापासून आयुर्वेदाचा राजाश्रय खंडित झाला तो आजतागायत पुन्हा आयुर्वेदाला पूर्णपणे प्राप्त झालेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्येदेखील आयुर्वेदाला मिळणारा वाटा हा एकंदर स्वास्थ्यावर खर्च होणाऱ्या रकमेच्या दोन ते तीन टक्केच होता. परंतु आयुर्वेदाचे खरे नुकसान झाले ते इंग्रजांच्या काळात. त्यांनी आपल्याबरोबर आपले वैद्यकशास्त्र आणले, जे आज ‘आधुनिक वैद्यक’ म्हणून ओळखले जाते. याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु याचबरोबर त्यांनी एक समज प्रचलित केला की पाश्चात्त्य विचारपद्धतीच एकमेव शास्त्रीय विचारपद्धती आहे.

पुढे वाचा

आयुर्वेदाच्या मर्यादा

होमिओपॅथीचे बिंग फोडल्याबद्दल लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकाचे आभार. परंतु अशीच काहीशी परिस्थिती आयुर्वेदाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील ८०% लोक रोगप्रतिबंधासाठी वैकल्पिक उपचारपद्धती वापरतात. त्यांपैकी आयुर्वेद एक महत्त्वाची उपचारशाखा असल्यामुळे या विषयाला विशेष महत्त्व आहे. सामाजिक आरोग्याच्या विषयावर प्रबोधन करणे हे डॉक्टरांचे कर्तव्यच असल्यामुळे हा लेखनप्रपंच केला आहे. आमच्या ज्ञानशाखेला ‘ॲलोपॅथी’ असे चुकीचे नाव पडले आहे. रोगाच्या परिणामांच्या विरुद्ध परिणाम घडविणारे उपचार (रोगाचे कारण न शोधता) करणे म्हणजे ॲलोपॅथी होय. वैज्ञानिक वैद्यक ॲलोपॅथीपेक्षा भिन्न आहे. वैज्ञानिक वैद्यकाचा एक भाग ‘लक्षणांवर आधारित उपचार’ (सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट) आहे.

पुढे वाचा

रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्रविभाग : दशा व दिशा

प्रास्ताविक:
M.B.B.S.च्या अभ्यासक्रमात रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र नावाचा विषय आहे. याच विषयाला इंग्रजीमध्ये प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडीसीन असेही संबोधण्यात येते. दंतवैद्यक, होमिओपॅथी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, सार्वजनिक आरोग्य परिचारिका पदवी व पदविका अभ्यासक्रम ह्यांसारख्या वैद्यक व पूरक अभ्यासक्रमातही हा विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. समाजशास्त्र, गृहशास्त्र, आहारशास्त्र, पोषणशास्त्र, रुग्णालय व सार्वजनिक आरोग्य-प्रशासन, व्यवसाय-आरोग्य, आरोग्य-शिक्षण अभ्यासक्रम, आरोग्य-कर्मचारी-अभ्यासक्रम, स्वच्छता-निरीक्षक-अभ्यासक्रम ह्यांसारख्या विद्यापीठांतर्गत व विद्यापीठाबाहेरील इतरही बऱ्याच अभ्यासक्रमांत रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र हा विषय अंतर्भूत करण्यात आलेला आहे. वर नमूद केलेल्या बहुतेक अभ्यासक्रमांमध्ये हा विषय राष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून अनिवार्य विषय म्हणून शिकविण्यात येतो.

पुढे वाचा

‘सर्वांसाठी आवश्यक औषधे’ का शक्य नाहीत ?

उदंड आजार, औषधे व वंचितताः
माणूस म्हटला की तो केव्हातरी आजारी पडणारच व त्यासाठी त्याला थोडेफार तरी औषधपाणी लागणारच! पण तरी आपण अशा समाजाचे ध्येय ठेवले पाहिजे की ज्यामध्ये अनावश्यक व अकाली आजारपणे कमी असतील व एकंदरीतच औषधपाण्याची गरज तुलनेने कमी राहील. पण सध्याच्या समाजात अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, रोजगार या मूलभूत गरजाही बहुसंख्य लोकांबाबत पुरेशा भागवल्या जात नाहीत किंवा चुकीच्या रीतीने भागवल्या जात आहेत. त्यामुळे अकारण व अकाली आजारपणे याने समाज ग्रस्त आहे. भारतासारख्या देशात कुपोषण, जंतुजन्य आजार (जुलाब, न्यूमोनिया, टी.बी.

पुढे वाचा

जगात आरोग्यकर्मींची त्रुटी?

जागतिक आरोग्य संस्थेच्या २००६ चा रिपोर्ट “आपण सर्व मिळून आरोग्यासाठी काम करू.” या विषयावर आहे. आता पुढच्या १० वर्षांत जगभरात आरोग्यसेवेतले मनुष्यबळ कमी होत चालले आहे. जगातल्या ६० देशांमध्ये कमी मनुष्यबळामुळे आरोग्यसेवेत सुधारणा नाही. त्रेचाळीस दशलक्ष डॉक्टर्स, दाया, नर्सेस आणि आरोग्यसेवक यांची गरज आज आहे. आफ्रिकेतील सबसहारन देशात या सर्वांची सर्वांत जास्त गरज आहे. भयानक, गरिबी, काम करण्यासाठी लागणारी अपुरी साधने, वाईट वातावरण, अशिक्षित जनता, यामुळे प्रश्न बिकट होत आहेत.

एकोणसाठ दशलक्ष हा आकडा जगभरातील आरोग्यसेवेतील मनुष्यबळाचा आहे. यातील एक तृतीयांश बळ अमेरिकेत व कॅनडात आहे जिथे जगातील ५० टक्के आर्थिक सुबत्ता आरोग्यसेवेत आहे.

पुढे वाचा

सध्याचे वैद्यक-शिक्षण आणि डॉक्टर विद्यार्थी

सध्याचे म्हणावे असे (भारतातील) वैद्यक शिक्षण मुळातून गेल्या वीस वर्षांत बदलले आहे अशातला काही भाग नाही. परंपरागत शिक्षणपद्धती राबवताना अत्याधुनिक उपकरणे बऱ्यापैकी वापरात आली असली तरी मेडिकल कॉलेजेसची परिस्थिती फारशी सुधारली आहे असे नाही. त्याच कालावधीत या कॉलेजेसमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. वैद्यकशिक्षणावर ज्याचा विपरीत परिणाम होईल असा हा एक महत्त्वाचा घटक आहे. वैद्यकीय शिक्षणाचे चार खंड आहेत. त्यांतील सामान्य त्रुटी आणि शक्ती यांचा या लेखात एकत्रित विचार केला गेला आहे. सरकारी व कॅपिटेशन फीची कॉलेजेस व पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण असे हे चार खंड आहेत.

पुढे वाचा

स्त्री-आरोग्य

“In nature there are neither rewards nor punishments, there are consequences.” Robert Ingersoll (निसर्गात कुणाला बक्षिसही नाही किंवा शिक्षाही नाही. निसर्गात फक्त परिणाम असतात. रॉबर्ट इंगरसॉल)

बाह्य रुग्ण विभागात (ओ.पी.डी.त) एक बाई रुग्ण खूप आरडाओरडा करीत होती म्हणून मी पहायला गेले. चौथ्यांदा गर्भ राहिला होता, ५-६ महिने झाले होते. पहिल्या तीनही मुली होत्या. तिला तपासून शांत करण्याचा प्रयत्न केला. नंतर समजले की आता जर मुलगा नाही झाला तर तिची धडगत नव्हती. सासू-नवऱ्याने दम भरला होता. त्यामुळे मनातून प्रचंड भ्यालेल्या या बाई विचित्र वागत होत्या.

पुढे वाचा