जुलमी सरकार वाघांहून भयंकर

थाई पर्वताच्या बाजूने जाताना कन्फ्यूशसला एक स्त्री एका थडग्याजळ धाय मोकलून रडताना दिसली. प्रभू तिच्याकडे गेले आणि त्यांनी त्सेलूला तिची विचारपूस करण्यास सांगितले. तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विलापावरून तुझ्यावर दुःखाचा कडेलोट झाला आहे असे वाटते.’ ती म्हणाली, “खरे आहे. माझ्या नवर्याुचे वडील येथे वाघाने मारले. माझा नवराही तसाच गेला. आणि आता माझा मुलगाही त्याच प्रकारे मारला गेला आहे. प्रभूने विचारले, ‘मग तू ही जागा सोडून दुसरीकडे का बरे जात नाहीस?’ ‘इथे जुलमी सरकार नाही -‘ तिने उत्तर दिले. प्रभू नंतर म्हणाले, ‘मुलांनो, हे लक्षात ठेवा, जुलमी सरकार वाघापेक्षाही जास्त भयंकर असते.