अनघा मोहरील-राजे - लेख सूची

नकोशी !

इ.स. २००५ च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील गोष्ट. हॉस्पिटलच्या सभोवतालच्या परिसरात ताजुद्दीन बाबांच्या दर्यासमोर वार्षिक उरूस जोरात होता. आमच्या प्रादेशिक पातळीवरच्या ह्या शासकीय रुग्णालयात रोज सुमारे २०० ते २५० रुग्णांवर उपचार होतात. पण उरुसाच्या वेळी आमच्या परिसरातल्या एका शेडवजा इमारतीत जिला दर्गाह म्हणतात ह्या १५ दिवसांत रोज अक्षरशः हजारो भुते शांत करण्यात येत होती. बाबांच्या …