अनिल अवचट - लेख सूची

भाकीत

पोर नागवे कभिन्न काळे मस्त वावरे उघड्यावरती बाप बैसला झुरके मारीत चूल पेटवी मळकट आई भिंतीमागे पॉश इमारती कंपनी तेथे संगणकाची थंड उबेधी लठ्ठ पगारी कोडी सोडवत जगप्रश्नांची कोण सोडवील कोडी इथली उघड्यावरच्या संसाराची, रस्त्यावरच्या अपघातांची, मरू घातल्या वन रानांची? पोर नागवे चालत चालत जाईल का त्या इमारतीत बसेल जर ते संगणकावर कोडी सोडवील तेही …

मनुष्यनिर्मित दुःखे आणि मी

. . . . ज्या वेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी मनात विचार येतात त्या वेळी मी हे मानवसमूह नजरेसमोर आणतो. त्या विचारांची स्वतःलाच लाज वाटू लागते. एखाद्या यंत्रमाग-कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून वही-फणीच्या कामाला जुंपला गेलो असतो तर? किंवा कामाठीपुऱ्यातल्या एखाद्या वेश्येपोटी जन्मलो असतो तर? या समूहांमध्ये जन्मणाऱ्या बहुतेकांच्या वाढण्याला केवढ्या मर्यादा असतात! … …