भाकीत

पोर नागवे कभिन्न काळे
मस्त वावरे उघड्यावरती
बाप बैसला झुरके मारीत
चूल पेटवी मळकट आई
भिंतीमागे पॉश इमारती
कंपनी तेथे संगणकाची
थंड उबेधी लठ्ठ पगारी
कोडी सोडवत जगप्रश्नांची
कोण सोडवील कोडी इथली
उघड्यावरच्या संसाराची,
रस्त्यावरच्या अपघातांची,
मरू घातल्या वन रानांची?
पोर नागवे चालत चालत
जाईल का त्या इमारतीत
बसेल जर ते संगणकावर
कोडी सोडवील तेही झटपट
– अनिल अवचट (मस्त मस्त उतार मधून साभार)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.