आर. रामचंद्रन - लेख सूची

मलेरियातील गोलमाल

लॅन्सेट या धारदार आरोग्याच्या मासिकाने भारतात जागतिक बँकेने मलेरियाचा फैलाव थांबवण्यासाठी आखलेले कार्यक्रम नीट राबवले जात नसून त्यासाठी भारत सरकारला दोषी ठरवले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने आखून दिलेल्या इलाजाप्रमाणे न चालता आपले सरकार जीवघेण्या मलेरियासाठी अर्धवट इलाज किंवा चुकीचे इलाज करते आहे कारण आपली कार्यपद्धती सदोष, धीमी व कालबाह्य ठरलेली आहे. १९९० सालापासून भारतात दरवर्षी …

नगर व नागरद्वेष्टी मते

इसवी सनापूर्वी ६०० वर्षांपासून ते आजपर्यंत भारतीय विचारांत वारंवार भेटणारे एक मत शहरांना वाईट मानते व नागर जीवनशैलीला दुष्ट मानते. पण नागर जीवनशैली हे सुसंस्कृत माणसांचे एक लक्षण आहे, असे मतही साधारण तितक्याच (इ.स.पूर्वी ६००) प्राचीन काळापासून व्यक्त केले जात असे. ‘अर्थशास्त्रा’त कौटिल्याने आणि ‘कामसूत्रा’त वात्स्यायनाने नागर जीवनाची भलावण केली आहे. हे नागर पक्षाचे द्वेष्टे …