गुलजार - लेख सूची

निरक्षर ईश्वर

जितक्या काही भाषा मी जाणतोत्या सर्व मी आजमावून पाहिल्यातईश्वराला त्यातली एकही समजली नाही अद्याप तो ना मान हलवत ना हुंकार भरतवाटलं कदाचित देवदूतांकरवी तरी तो वाचून घेईलचंद्राच्या पाटीवर कधी गालिबचा शेर लिहून ठेवला मीतो धुवून टाकतो किंवा कुरतडून खाऊन तरी टाकतो  शिकला सवरला असता जर आपला ईश्वर प्रेमाच्या गप्पागोष्टी नाही तरी  किमानपत्रांची देवाण घेवाण तरी शक्य …

चमत्कार

चमत्कार त्या रात्री कुठलाच झाला नाही उपासनागृहात होते जेवढे काही लोक सगळ्यांच्या ओठावर होते प्रार्थनेचे शब्द अन डोळ्यांत श्रद्धेचे दीप हे ईश्वराचे निवास्थान आहे भूकंप हद्रवणार नाही ह्याला. नाही अग्नी जाळू शकणार शेकडो चमत्कारच्या कथा सगळ्यांनीच ऐकल्या होत्या शेकडो नावांनी त्या साऱ्यांनी धावा केला त्याचा परलोकातूनही कोणाचाच आवाज आला नाही ना परमेश्वराचा, ना पोलिसाचा सारेच्या …