जेरेड डायमंड - लेख सूची

न सुचलेले प्रश्न

शिक्षणाच्या प्रक्रियेत म्हणे दोन वेगवेगळ्या भूमिका वठवणाऱ्या गटांचा सहभाग असतोः शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात आणि विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान घेतात. पण प्रत्यक्षात प्रत्येक खुल्या मनाच्या शिक्षकाला हेही जाणवते की विद्यार्थीही शिक्षकांना ज्ञान देतात. कधी हे ज्ञानदान शिक्षकाच्या भूमिकेच्या गृहीततत्त्वांना आह्वान देण्यातून घडते, तर कधी शिक्षकाला न सुचलेले प्रश्न विचारून. मी विद्यार्थ्यांना ईस्टर आयलंडचे समाज कसे कोलमडले …

इतिहासाचे विज्ञान

इतिहास ही ज्ञानशाखा सामान्यपणे विज्ञानात न धरता मानव्यशास्त्रांजवळची मानली जाते फारतर सामाजिक शास्त्रांपैकी एक, पण त्यांतही सर्वांत अवैज्ञानिक. शासनव्यवहाराचे ते ‘राज्यशास्त्र’, अर्थव्यवहाराबाबतचे नोबेल पारितोषिक ‘अर्थ-विज्ञान’चे, पण इतिहास विभाग मात्र स्वतःला ‘इतिहास-विज्ञानाचे विभाग’ म्हणत नाहीत. इतिहासाला तपशिलांची जंत्री मानण्याकडे कल दिसतो, जसे “शोभादर्शकात (घरश्रशळवीलेशि) दिसणाऱ्या आकृत्यांमागे जसा नियम नसतो तसाच इतिहासामागेही नसतो.” ग्रहांच्या हलचालींमध्ये जी नियमितता …