जे. व्ही. नाईक - लेख सूची

आगरकर व रानडे यांच्यातील वैचारिक द्वंद्व

दहा मे १८५८ रोजी पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ‘धर्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर एक ऐतिहासिक चर्चा घडून आली. ही चर्चा पूर्वनियोजित नव्हती. सुप्रसिद्ध प्राच्यविद्याविशारद रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात भांडारकरांनी मांडलेल्या एका मुक्ष्याच्या निमित्ताने ही चर्चा उत्स्फूर्तपणे सुरू झाली. इच्छित सामाजिक बदलासाठी धर्मसुधारणा आधी घडून येणे अत्यंत आवश्यक …