आगरकर व रानडे यांच्यातील वैचारिक द्वंद्व

दहा मे १८५८ रोजी पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ‘धर्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर एक ऐतिहासिक चर्चा घडून आली. ही चर्चा पूर्वनियोजित नव्हती. सुप्रसिद्ध प्राच्यविद्याविशारद रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात भांडारकरांनी मांडलेल्या एका मुक्ष्याच्या निमित्ताने ही चर्चा उत्स्फूर्तपणे सुरू झाली. इच्छित सामाजिक बदलासाठी धर्मसुधारणा आधी घडून येणे अत्यंत आवश्यक आहे, असा भांडारकरांचा मुद्दा होता. माधवराव रानडे, विष्णु मोरेश्वर महाजनी, लोकमान्य टिळक आणि गोपाळराव आगरकर इ.विख्यात व्यक्ती त्या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. ‘अज्ञेयवादी तत्त्वज्ञानाचे प्राथमिक धडे देऊ पाहणारे अनिष्ट पुस्तक’ अशी ज्याची रानड्यांनी संभावना केली होती त्या ‘बटलर्स मेथडऑफ एथिक्स’ या पुस्तिकेचे लेखक व डेक्कन कॉलेजचे प्राचार्य फ्रांसिस सेल्बी आणि विश्वविख्यात कवी वर्डस्वर्थचे नातू व एलफिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य विल्यम वर्डस्वर्थ हेही त्यावेळी उपस्थित होते.
रानडे आणि भांडारकर गटाचे म्हणणे असे होते की, उच्च गुणवत्तेचा एवढेच नव्हे तर सर्वसामान्य नीतिमत्तेचासुद्धा विशिष्ट धर्माच्या पालनाशी अविभाज्य संबंध असतो. उलट आगरकरसमर्थकगटाने तेवढ्याच ठामपणे प्रतिपादन केले की नीतिमत्ता आणि उच्च गुणवत्ता यांचे अस्तित्व व प्रसार कोणत्याही धर्मकल्पनेवर मुळीच अवलंबून नसतो.” १७ मे १८८५ च्या मराठा मधील रिलिजन, सायन्स अँन्ड फिलॉसफी’ या आपल्या लेखात आगरकर पुढे लिहितात, “सामान्य लोकांच्या धर्मभावनेला आवाहन करण्यापेक्षा त्यांना आधुनिक विज्ञानाची व तत्त्वज्ञानाची दृष्टी प्रदान करूनच त्यांची नीतिमत्ता लवकर सुधारता येईल.” परस्परविरोधी अशा या दोन्ही गटांच्या वक्त्यांनी त्या दिवशी आपापली मते इतक्या हिरिरीने आणि कळकळीने मांडली की उपस्थित विद्यार्थी आणि अन्य श्रोतृवर्ग यांपैकी अनेकांना आपण कोणती बाजू घ्यावी याचा निर्णय करता येईना. या वादळी चर्चेला तत्कालीन वृत्तपत्रांतून चांगली प्रसिद्धी मिळाली. विशेषतः केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी त्या विषयावर महत्त्वपूर्ण लेख प्रसिद्ध केले.
भारतात आजही इतिहासविषयक जाणिवेच्या दृष्टिकोनातून ज्यांचे महत्त्व वाटावे अशा या वादविवादातील काही प्रमुख पैलूंची चर्चा प्रस्तुत लेखात केली आहे.
आगरकर-रानड्यांचा हा वादविवाद मूलतः आस्तिक आणि नास्तिक या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील वैचारिक संघर्ष होता. बिशप जोसेफ बटलर हे धर्मपंडित आस्तिकवाद्यांचे तर जे. एस. मिल् आणि हर्बर्ट स्पेन्सर हे नास्तिकवाद्यांचे प्रतिनिधी होते. मुंबई विद्यापीठाने लागू केलेल्या पाठ्यपुस्तकांचा पगडा एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या विचारसरणीवर पडलेला होता. त्यांचे अतिशय सूक्ष्म विश्लेषण एलेन मॅकडोनाल्ड यांनी ‘इंग्लिश एज्युकेशन अँड सोशल रिफॉर्म इन् लेट नाइन्टीनथ सेंच्युरी बॉम्बे या जर्नल ऑफ एशियन स्टडीज (XXV मे १९६६, पृ. ४५४-४७६) मधील लेखात केलेले आहेच. इ. स. १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हापासून बिशप बटलर याची ‘मारेल फिलॉसफी’ या विषयावरील पुस्तके या विद्यापीठात लावलेली होती. धर्मविषयक कल्पना उचलून धरणारे माधवराव रानडे यांच्यावर बटलरच्या ‘अॅनॉलॉजी अँड फिफटीन सरमन्स’ या पुस्तकाचा फार मोठा प्रभाव होता. उलट आगरकर हे सामाजिक नीतिमत्तेच्या वृद्धीसाठी धर्म-कल्पना निरुपयोगी आहे, असे मानणारया मिल आणि स्पेन्सर यांचे अभ्यासक होते.
खरे पाहता, संमेलनाच्या व्यासपीठावरील हा वादविवाद म्हणजे आगरकर, रानडे यांच्यात बटलर यांच्या पुस्तकावरून पूर्वीच सुरू झालेल्या बौद्धिक द्वंद्वाचा पुढील अंक होता.
अठराव्या शतकात युरोपात आलेल्या आस्तिकवादाच्या जबरदस्त लाटेविरुद्ध ख्रिश्चन धर्माचे, तसेच धर्म आणि नीती यांमधील परस्परसंबंधाचे समर्थन करणे हा बटलर यांच्या लेखनाचा प्रमुख हेतू होता. बटलर यांच्या नीतितत्त्वज्ञानासंबंधी दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे जरूर आहे. सुरुवातीला ते अंतिम कारणवाद’ गृहीत धरतात. त्यांच्या मते, जग आणि मानवी स्वभाव यांचा अंतिम कारणवादी अर्थ हा सृष्टीचा निर्माता आणि नियंता यांवर असलेल्या विश्वासातून निघणारा स्वाभाविक निष्कर्ष आहे. दुसरे असे की सदसद्विवेकबुद्धीचा आदेश म्हणजे ‘ईश्वराचा आवाज किंवा आदेश’ आहे, असेही बटलर मानतात. ते म्हणतात की, माणसाला स्वकर्तव्याची जाणीव व्हावी आणि त्याने ते पार पाडावे यासाठी त्याच्या ठिकाणी ईश्वरानेच विवेकबुद्धी निर्माण केली. विवेकबुद्धी हे परहितलक्षी तत्त्वआहे आणि त्याचा अनेकदा माणसाच्या ‘स्व-प्रेमा’ शी संघर्ष उडतो, ही गोष्ट अर्थातच ते नाखुपीने कबूल करतात. ही अडचण सोडविण्यासाठी बटलरनी अंतिम कारणवाद आपल्या म्हणण्याला जोडला. ‘स्व-प्रेम’,ही प्रवृत्ती जरी या जगातील गोष्टींपुरतीच मर्यादित असली तरी ती पूर्णतः सद्गुणांसह वास करीत असते आणि एकाच प्रकारच्या जीवनमार्गाकडे नेते. या नियमाला जे काही अपवाद असतील ते सर्व अंतिमतः विश्वाच्या नीतिमत्तेचा नियंता या कल्पनेवरील श्रद्धेमुळे कर्तव्याचा मार्ग आणि खर्यावखुर्याा स्व-प्रेमाचा मार्ग हे अंतिमतः एकच आहेत अशी माणसाची धारणा बनते.
बटलर यांचे उपरोक्त पुस्तक तर्कशास्त्र आणि नीतितत्त्वज्ञानाच्या बी. ए. च्या विद्याथ्र्यासाठी नेमण्यात आले होते आणि ते प्राध्यापक सेल्बी डेक्कन कॉलेजात शिकवीत असत. इ. स. १८८१ मध्ये त्यांनी बटलरच्या मेथड ऑफ अॅनालॉजी या पुस्तकातील विचारांसंबंधात एक चोपडे प्रसिद्ध केले होते. बटलर यांचे विचार आणि निष्कर्ष उत्क्रांतिवादी तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात विद्याथ्र्यांना तपासता यावेत हा सेल्बींचा हेतू होता. केवळ बटलर यांच्या तर्कविसंगत गृहीतकांवर आणि उथळ कारणमीमांसेवर त्यांनी टीका केली. प्रा. सेल्बी लिहितात, “नीतितत्त्वविषयक तर्कवितर्क करण्यास चालना मिळणे हीच नास्तिकतेच्या युगाची फलश्रुती आहे. नास्तिक तत्त्वज्ञानामुळे एखाद्या देशाला लाभ होईल तेवढा इतर कशानेही होणार नाही. शंका निर्माण होऊ लागल्याशिवाय प्रगती होणे अशक्यप्राय आहे.
प्रा. सेल्बींचे शिष्य असलेले आगरकर हे बुद्धिवादी होते. आपल्या गुरूने लिहिलेल्या पुस्तिकेचे मराठा पत्रांतून त्यांनी प्रशंसापर शब्दांत परीक्षण केले. आपल्या परीक्षणात ते म्हणतात, बटलर यांची वादविवाद करण्याची पद्धत बर्या च अंशी नीती आणि तत्त्वज्ञानविषयक समस्यांची उकल करणार्याव सनातनी ब्राह्मणपंडितांप्रमाणे आहे; एका शास्त्रातील चुका उलगडून सांगताना, निदान काही अंशी तरी, दुसर्या् शास्त्रातील चुकाही अपरिहार्यपणे समोर येतात.
सेल्बींशी आणखीही एका बाबतील आगरकर सहमत होते – नवनवीन ज्ञान मिळवीत राहणे ही सामाजिक प्रगतीच्या प्रत्येक अवस्थेसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे.आणि शंका विचारणे व चौकसपणाचीवृत्ती असणे हे ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील परवलीचे शब्द आहेत. सद्‍सद्‍विवेकबुद्धीबद्दल चर्चा करताना आगरकर लिहितात, “प्रत्येक पिढीची विवेकबुद्धी तिच्या मागील व पुढील पिढीपेक्षा भिन्न असते हे सत्य विल्यम लेकी यांनी लिहिलेल्या हिस्टरी ऑफ युरोपियन मॉरल्स हा ग्रंथ वाचणार्याह कोणाच्याही मनावर ठसल्याशिवाय राहणार नाही.” ही भिन्नता एका निश्चित नियमानुसार निर्माण होत राहते. जे घटक दुःखपर्यवसायी असतात ते त्या पिढीच्या मनात कालबाह्य ठरत जातात आणि दुसर्या. प्रकारच्या विशिष्ट परिस्थितीत आनंदपर्यवसायी ठरणाच्या नवीन घटकांची भर पडते. आगरकर पुढे असेही लिहितात की, जुन्या काळात समाज प्रगतीच्या प्राथमिक अवस्थेत असताना, नीतीखेरीज अन्य भावनांमुळे धर्म आणि नीती यांची सांगड घातली गेल्याचे दाखले इतिहासात सापडतात. ती बौद्धिक विकासाच्या प्रत्येक पुढील टप्प्यावर ढिली पडत गेल्याचे आढळते. या क्रमाने पाहू गेल्यास नीती आणि धर्म यांचा संबंध कायमचा तुटू शकेल व नीती हे एक स्वतंत्र शास्त्रच होऊ शकेल.
बटलर यांच्या लेखनांतील उणिवांवर निखळ बुद्धिवादी टीका करणाच्या प्रा. सेल्बी यांच्या पुस्तिकेची आगरकरांनी केलेली प्रशंसा रानड्यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. त्यामुळेच रानडे दुखावले गेले होते. अल्पावधीतच रानड्यांनी सेल्बी यांच्या पुस्तिकेवर घणाघाती टीका करणारे परीक्षण लिहिले. (जानेवारी १८८२). त्यात त्यांनी सेल्बी तसेच आगरकर या लोकांचीही चांगलीच खरडपट्टी काढली. रानडे लिहितात, “डेक्कन कॉलेजच्या तरुण विद्याथ्र्यांना, त्यांच्या अत्यंत संस्कारक्षम वयात अशा प्रकारचे बौद्धिक खाद्य पुरविले जात आहे याचा आम्हाला फार खेद होतो.” चूक आणि बरोबर अशा अक्षयतत्त्वांवर विश्वास ठेवणारे एका संभ्रमात वावरत आहेत असे म्हणून त्यांचा पाणउतारा करणार्याा सेल्बींवर रानड्यांनी टीकेची प्रथमतः झोड उठविली. मानवी विवेकबुद्धी ही सतत बदलत राहणारी बाब आहे आणि ती आनंद देणार्यार अथवा न देणाच्या मानवी अनुभवाच्या वारशावर अवलंबून आहे असे म्हटल्याबद्दलही रानड्यांनी सेल्बींवर टीका केली. ज्या ईश्वराचे अस्तित्व निसर्ग आणि माणूस यांच्याद्वारे प्रगट होते आणि हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान व पारशी या सर्वांनी गेली हजारो वर्षे एक मूर्तिमंत चांगुलपणा व सर्वशक्तिमानता अशा स्वरूपात ज्या ईश्वरावर श्रद्धा ठेवली त्या ईश्वराचे अस्तित्व नाकारल्याबद्दलही रानड्यांनी सेल्बींवर टीकास्त्र सोडले. ईश्वराच्या चांगुलपणात तरी काही उणीव आहे किंवा त्यांच्या शक्तिमानतेत तरी काही कमतरता आहे हे मिलचे प्रतिपादन प्रा. सेल्बींनी मान्य केल्याचा आरोप रानडे त्यांच्यावर करतात.
बटलर यांच्याविरुद्ध घेण्यात आलेल्या सर्व आक्षेपांबाबत रानड्यांनी बटलर यांचे समर्थ केले आहे. अॅनॉलॉजी किंवा सरमन्स यांपैकी कोणत्याच पुस्तकांत बटलरने नीती व धर्मशास्त्र यासंबंधी सर्वंकष सिद्धांत मांडलेले नाहीत, असे रानड्यांचे मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बटलरच्या लेखनाचा मुख्य हेतू अस्तित्ववाद आणि शुद्ध नीतिमत्ता या बुद्धिगम्य बाबी आहेत, त्या जाणून घेता येतात; तसेच त्यांचा प्रत्यक्ष जीवनव्यवहारात उपयोग होतो, हे दाखविणे हा होता.
स्वतःला प्रामाणिकपणे पटणारे विचार प्रकट करण्याचा सेल्बींचा हक्क रानडे नाकारीत नव्हते. त्यांना खेद वाटला तो या गोष्टीचा की एका अग्रगण्य शिक्षणसंस्थेतील शिक्षक या नात्याने सेल्बींनी आपल्या विद्याथ्र्यांच्या मनातील एका फार महत्त्वाच्या विषयावरील श्रद्धेला हादरा दिला. आपल्या परीक्षणाचा शेवट रानड्यांनी पुढील शब्दांत केला आहे.
“ईश्वर आणि मानवी” मनाच्या आतील आवाज असलेली विवेकबुद्धी यांवरील श्रद्धा अधिक दृढ करण्याची गरज खास करून हिंदू विद्याथ्र्यांना आहे. अज्ञेयवादी विचारांत राष्ट्रमन वास करूच शकत नाही. ‘The national mind cannot rest in agnosticism. तशा प्रकारचा प्रयोग पूर्वी एका महान उपदेशकाने – गौतम बुद्धाने- फार मोठ्या प्रमाणावर करून पाहिला होता. पण तो अपयशी ठरला. याचा अर्थ तशा प्रकारचे विचार राष्ट्रमनाची पकड घेऊ शकत नाहीत, हेच सिद्ध होते. अज्ञेयवाद आणि नास्तिकता या दोन्ही विचारधारा तरुणांच्या संकारक्षम वयाचा विचार करता कालबाह्य ठरतात आणि त्यांचा अंतिम परिणाम नीतितत्त्वे समजावून घेण्याच्या दृष्टीने निरर्थक ठरतो. ईश्वरकल्पनेविरहित शिक्षण देणारी केंद्रे म्हणून अगोदरच आमच्या महाविद्यालयांविरुद्ध ओरड चालू असते. अशा परिस्थितीत सरकारच्या शिक्षणविषयक अलिप्ततावादी धोरणाचा आश्रय घेऊन अज्ञेयवादी विचारांचा धूमधडाक्याने प्रसार होऊ लागला तर वरील आरोप बरयाच अंशी सिद्ध होईल. आमचा विश्वास आहे की प्राध्यापक आणि विद्यार्थी दोघेही ही गोष्ट लक्षात घेतील आणि अशी टीका ओढवून घेण्याचे प्रसंग टाळतील.”
अज्ञेयवादी विचारसरणी राष्ट्रजीवनाला धोकादायक आहे असे रानडे समजत असत, हाच या विवेचनाचा उघड अर्थ आहे.
न्या. रानड्यांच्या परीक्षणाला आगरकरांकडून तात्काळ प्रत्युत्तर दिले गेले. प्रा. सेल्बींच्या पुस्तकातील विचार योग्य असल्याचा परत एकदा निर्वाळा देऊन आगरकर म्हणतात की, एक शिक्षक या नात्याने आपल्या विद्याथ्र्यांना बटलरच्या प्रतिपादनातील तेच ते तर्कट, चुकीची उदारहरणे आणि निष्कर्ष समजावून देणे हे सेल्बींचे कर्तव्यच होते. ते लिहितात. “अंधारात चाचपडणारा आणि आमच्या पुराणकथांत भरलेल्या सर्व प्रकारच्या भोळ्या समजुतींवर विश्वास ठेवणारा विद्यार्थीच फक्त बटलर यांच्या प्रतिपादनात समाधान मानेल. शेवटी ते रानड्यांना असा सवाल करतात की, बौद्ध विचारांच्या अपयशाचे उदाहरण देताना अज्ञेयवादी विचार राष्ट्रमनाची पकड घेऊ शकत नाहीत अशी त्यांची जर खात्री पटली असेल तर प्रा. सेल्बींच्या किंवा दुसर्या् एखाद्या प्राध्यापकाच्या तथाकथित अज्ञेयवादी लेखनाची रानड्यांना भीती बाळगण्याचे कारणच काय?
वरील पार्श्वभूमीवरच डेक्कन कॉलेजातील तो वाद घडून आला. धर्मविचारांचे महत्त्व सिद्ध करताना रानडे आणि भांडारकर यांनी काही मते मांडली. त्यांनी आगरकरांनाजोरदारपणे आव्हान दिले. एका प्रतिवादात रानड्यांनी ख्रिस्ती धर्म व त्याचे तत्त्वज्ञान यांचा काहीसा अनादरयुक्त उल्लेख केला व प्राचीन आर्यानी जगातील उत्कृष्ट धर्मविचार विकसित केला याबद्दल त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आर्य तत्त्ववेत्त्यांनी सखोल धर्मविचार प्रकट केला असे सांगून त्यांचीही स्तुती केली. धर्म आणि नैतिकता यांच्यातला प्रत्यक्ष संबंध तसेच मानवाला नैतिक आचारविचारांच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी धर्म या संकल्पनेचीच मूलभूत गरज आहे, असेही रानड्यांनी सांगितले. त्यांची ही दोन्ही विधाने आगरकरांनी तितक्याच जोरदारपणे खोडून काढली. नीतिमत्ता निर्माण होणे व तिची भरभराट होणे यांचा धर्मकल्पनेशी यत्किंचितही संबंध नाही; तसेच सामान्यजनांची नीतिमत्ता केवळ त्यांच्या धर्मभावनेला आवाहन करण्यापेक्षा जर त्यांना आधुनिक विज्ञान व तत्त्वज्ञान या विषयांचे थोडेसे ज्ञान दिले तर अधिक चांगली सुधारू शकेल असे आगरकरांचे म्हणणे होते. याप्रसंगी टिळकांनी आगरकरांची सर्व मते उचलून धरली. त्यामुळे रानडे पूर्वी कधी नव्हे इतके क्रुद्ध झाले आणि त्यांनी एक मोठी नैतिक शक्ती म्हणून धर्माचे महत्त्व कमी करण्याबद्दल आगरकरांवर व त्यांच्या पाठीराख्यांवर कडक शब्दांत टीका केली.
उपरोक्त वादविवाद १७ मे १८८५ च्या मराठाच्या अंकात दोन लेखांत सारांशरूपाने मांडण्यात आला होता. त्या लेखांचे शीर्षक होते-‘रिलिजन, सायन्स अँड फिलॉसफी’. बहुधा ते आगरकरांच्या लेखणीतूनच उतरले असावेत. रानड्यांच्या प्रक्षुब्ध उद्गारांचा उल्लेख करताना मराठा ने पुढील टीका-टिप्पणी केली : या दुदैवी प्रसंगावरून एक गोष्ट लक्षात येते की अत्यंत समंजस व्यक्तीदेखील धर्माबाबतच्या उत्साही मतांमुळे आपला संयम सहजपणे हरवून बसते आणि चुकीची विधाने करू लागते, इतकी की विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील एखाद्या नवशिक्याच्या बाबतीतही ती अक्षम्य ठरावीत. अशी व्यक्ती एखादे उघड सत्य पाहतानादेखील ते विपर्यस्त स्वरूपातच पाहते. रुचणार नाही अशा सत्याची तपासणी करताना बुद्धीवर भावना आणिविकार मात करतात हेच या उदाहरणावरून स्पष्ट होते.
हिंदू धर्माच्या श्रेष्ठत्वाचा रानडे यांनी जो दावा केला त्या संबंधात लिहिताना मराठा ने पृच्छा केलीः “हा हिंदू धर्म काय आहे?” आपल्या या प्रश्नाचे उत्तर देताना मराठा कार लिहितात, “रानटी अवस्थेतून सुसंकृतपणाकडे वाटचाल करणाच्या प्राचीन आर्यांच्या विविध अवस्थांतील धर्मविचारांच्या गोंधळलेल्या व जुनाट मतमतांचा तो केवळ गलबला आहे. त्यात आत्यंतिक टोकाच्या अनेकेश्वरी विचारांपासून तो अद्वैत विचारांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. धर्मविचारातील प्रगतीच्या विविध अवस्थांतील प्रत्येक श्रद्धेला, बहुधा हिंदू धर्माची मान्यता आहे. लोकांना आपापल्या कल्पनेनुसार ज्याचे अनुकरण करावे व ज्याचे पुनरुज्जीवन व्हावे असे रानड्यांना वाटते तो हाच धर्म आहे का? अशी मराठाकार शेवटी पृच्छा करतात.
मराठा मधील लेखात धर्म आणि तत्त्वज्ञान यांमधील संबंध प्रत्यक्ष स्वरूपाचा नसून तो व्यवहार्यही नाही, असे म्हटले आहे. जगात धर्म ही सर्वत्र श्रद्धेची बाब झाली आहे. उलट ७४/आजचा सुधारक/ जून-जुलै १९९५तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात उलट-सुलट विचारांना वाव आहे. आधुनिक विज्ञान व तत्त्वज्ञान सावकाश पण निश्चितपणे धर्मविचारांच्या पायावरच आघात करीत आहेत, असे म्हटले जाते. पण असेही सांगण्यात येते की, जोपर्यंत धर्मविचारांना त्याच्या अंतिम आश्रयस्थानातून
-मानवी भावनेतून – हाकलून लावता येत नाही तोपर्यंत विज्ञानाला आणि तत्त्वज्ञानाला धर्मविचारांवर विजय मिळविता येणार नाही. त्यांना मानवी जीवनातून हद्दपार करता येणार नाही. तरीदेखील मराठाने ठामपणे असे म्हटले आहे की, विज्ञानातील आणि तत्त्वज्ञानातील सत्याचा प्रसार करूनदेखील धर्मविचारांची लोकमानसावरील पकड ढिली करणे शक्य आहे. जोपर्यंत प्रसाराचे हे कार्य पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत धर्मविचारांबद्दल उदासीन वृत्ती धारण करणे हाच चांगला मार्ग आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.