जॉनथन हॅरा - लेख सूची

एक दिवाणी दावा

पुस्तक-परीक्षणः एक दिवाणी दावा जॉनथन हॅरा अमेरिकन संघराज्याच्या ईशान्य कोपऱ्यातले बॉस्टनजवळचे वोबर्न नावाचे खेडे. एक उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी मध्यमशी नदी, ॲबरजोना नावाची. नदीच्या पश्चिमेला वोबर्न पसरलेले. नदीजवळच्या एका वस्तीत राहणाऱ्या अॅन अँडर्सनच्या जिमी नावाच्या मुलाच्या नाकातून अधूनमधून रक्त यायचे. सहज मुक्या माराने त्याचे शरीर काळेनिळे व्हायचे. बॉस्टनचे डॉक्टर सांगायला लागले की मुलाला ल्यूकेमिया आहे, रक्ताचा …