तारक काटे - लेख सूची

डार्विन आणि शेती

जागतिक इतिहासात – विशेषतः युरोपच्या संदर्भात – एकोणिसावे शतक हे एका मोठ्या मन्वंतराचे आणि सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांत दूरगामी परिणाम घडवून आणणारे राहिले आहे. वैज्ञानिक प्रगती, औद्योगिक क्रांतीचा प्रसार, भांडवलशाहीचा पगडा व लोकशाहीचा उद्गम ही या कालखंडाची वैशिष्ट्ये होत. एकोणविसाव्या शतकातील विज्ञानाचा जेवढा व्यापक परिणाम समाजजीवनावर झाला, तेवढा याआधीच्या काळात झाला नव्हता. या …

पुस्तक परीक्षण – समतामूलक पर्यावरणवादी वैश्विक समाजरचनेचा वेध

या विश्वपसाऱ्यामध्ये माणसाचे स्थान खरे तर बिंदुवत्. परंतु निसर्गाने बहाल केलेल्या बुद्धिमत्तेमुळे माणूस पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रापेक्षा वरचढ ठरला, तर सुखासीनतेच्या लालसेतून एका शोषणयुक्त समाजव्यवस्थेचा तो प्रेरक ठरला. आज पृथ्वीवरील सृष्टीचे एकूणच अस्तित्व माणसाच्या विवेकी वा अविवेकी वागणुकीने ठरणार आहे. माणसाचे जीवसृष्टीतील नेमके स्थान, त्याच्या प्रेरक व कारक शक्ती, त्याच्या स्वभावाची गुंतागुंत, त्याच्या जीवनातील ईश्वरी प्रेरणेचे …