देवदत्त दाभोलकर - लेख सूची

काही समीक्षण, काही चिन्तन

‘प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’ हा मराठी भाषेतील एक अपूर्व असा ग्रन्थ आहे. एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या हयातीतच त्याच्या तत्त्वचिंतनाविषयी मोकळेपणाने समकक्ष लोकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवावी व तत्त्ववेत्त्याने त्यांचा त्याच ग्रन्थात परामर्श घ्यावा अशा स्वरूपाचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. अन्य भारतीय भाषांतही अशा स्वरूपाचा ग्रन्थ प्रसिद्ध झाल्याचे मला माहीत नाही. इंग्रजीमध्ये मात्र Living Philosopher’s Library …

हे प्रभो विभो, अगाध किति तव करणी!

(१) धरणीकंपासारख्या प्रसंगीही महात्मा गांधीसारखे वकील ईश्वराचा चांगुलपणा सिद्ध करू पाहतात. त्याहून ताण युक्तिवाद एका कॅथॉलिक धर्मगुरूने केला. तो असा-कॅनडामधील माँट्रील शहरी एकदा एका सिनेमागृहाला आग लागली. तो खेळ मुद्दाम शाळेतील लहान मुलांसाठी होता. त्या आगीत सुमारे शंभर मुले जळून मेली. ती रोमन कॅथॉलिक पंथाच्या फ्रेंच लोकांची होती ईश्वराच्या दयाळूपणाचा हा विचित्र प्रकार ईश्वराला कमीपणा …