ना. ग. गोरे - लेख सूची

धारणात् ‘धर्मः’?

आपल्या देशामध्ये धर्माची व्याख्या धारणात् धर्मः।’ अशी केलेली असून त्याबद्दल कोणतीही शंका उरू नये म्हणून लगेच धर्मो धारयते प्रजाः । असेही विधान केलेले आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा असा संकल्प उच्चारण्यापूर्वी हजारो वर्षापूर्वी प्रजांना म्हणा किंवा प्राणिमात्राला धारण करणारा धर्म अस्तित्वात होता आणि तो केवळ माणसांमध्येच नसून कृमिकीटकांपासून तो पशुपक्ष्यांतही होता. मुंग्यांची वारुळे, मधमाश्यांची मोहळे, दिगंत संचार …

परिसंवाद निसर्ग आणि मानव – १

श्रीमती मेधा पाटकर गेल्या आठवड्यामध्ये पुण्यास आल्या असता स्नेहसदनात भरलेल्या सभेत त्यांनी जी भूमिका मांडली तिचे माझ्या मते दोन स्थूल विभाग पाडता येतील. पहिला भाग म्हणजे त्यांनी नर्मदा घाटीतील धरणात बुडणार असणाऱ्या ग्रामीण जनतेला जागे करून एक जबरदस्त संघटन उभे केलेले आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नर्मदा प्रकल्पाच्या अनावश्यकतेचा, त्याच्या सिद्धीसाठी चाललेल्या अमानुष सरकारी दडपशाहीचा आणि …