न. चिं. केळकर - लेख सूची

शोधावें लागतें

‘आपल्या पूर्वजांच्या काळाकडे पाहण्याच्या दोन दृष्टी असतात. एक अभिमानाची व दुसरी केवळ ऐतिहासिक किंवा विवेकाची. अभिमानाच्या दृष्टींत बऱ्यावाईटाचा विवेक नसतो; आणि कांहीं एका मर्यादेपर्यंत जुन्याचा अभिमान बाळगणें हें स्वाभाविकच नव्हे तर योग्यहि ठरतें. अभिमानाच्या दृष्टीला स्वकीयांच्या इतिहासरूपी पर्वतांचीं सर्वांत उंच शिखरें कर्तृत्वरूपी बर्फानें मढवलेलीं व कीर्तिरूपी उज्ज्वल सूर्यप्रकाशांत चमकणारी तेवढीच दिसतात. कारण अभिमान दुरून आणि …