पन्नालाल सुराणा - लेख सूची

हिंदू कोण?

पूर्वीच्या काळी दिनचर्या, खाणेपिणे, वेशभूषा, व्यवसाय आदींबाबत मनुस्मृतीने घालून दिलेल्या नियमांपैकी काहींचे जरी उल्लंघन केले, तरी त्यामुळे संबंधित व्यक्तीचे हिंदू म्हणून असलेले इतर हक्क हिरावून घेतले जात नसत. मग काही नियम अनिवार्य तर काही उल्लंघनीय असे झाले. परंतु मग हिंदू कोणास म्हणावे असा प्रश्न उपस्थित झाला. स्मृती व रीतिरिवाज ह्यांचा मिळून असलेला हिंदू कायदा लागू …

भारतीय शेतीचे काय करायचे?

अमेरिकेत सरकारने १८६० ते १९०० या काळात ५० कोटी एकर जमीन आठ कोटी शेतकऱ्यांना विकली असा एक उल्लेख आहे. (क्रिस्टफर डी. कुक : डायेट फॉर दी डेड प्लॅनेट). प्रत्यक्ष लागवडीखालील शेतजमीन ५० कोटी एकर किंवा थोडी कमी जास्त असावी. ट्रॅक्टर्सची संख्या १९११ ते १९२० या काळात चार हजारांवरून अडीच लाखांवर गेली. भारतातील महत्त्वाच्या पिकांखाली २००३-०४ …