पी. साईनाथ - लेख सूची

उदारीकरणात रुतलेली प्रसारमाध्यमे

भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण ९१ साली स्वीकारल्यानंतरच्या अवस्थेबद्दल मी बोलणार आहे. गेले दोन महिने माझे फिरणे जरा कमी करून मी घरी घालवले. ह्या दोन महिन्यांत मी दोन गोष्टी केल्या. एक–टीव्हीवरचे काही कार्यक्रम पाहिले, दुसरे – माझ्याकडे असलेल्या ३०-४० मासिकांची मुखपृष्ठे फाडली व अवती-भोवती पसरून ठेवली. जेणेकरून मला या मासिकांतून कोणकोणते विषय मांडले आहेत ते पाहता …