प्रभाकर बलवंत - लेख सूची

अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी,वेगळ्या दृष्टिकोणातून

अंताजीची बखर ही बखरीचा घाट दिलेली कादंबरी अर्थात् ही ऐतिहासिक कादंबरी आहे. तिच्यात खरा इतिहास आहेच, पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोणातून पाहिलेला आहे. ही आगळी दृष्टी हेच या कादंबरीचे मुख्य वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास मराठ्यांचाच पण प्रकाशझोत वेगळ्या क्षेत्रावर टाकला आहे. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेचा उपयोग एखादा पताकास्थानासारखा करून लेखकाने आपल्या दृष्टिकोणाचा परिचय करून दिला आहे. अर्पण …

समाजसुधारणा, पुनर्घटना आणि डॉ. केतकर

अमेरिकेस गेल्यानंतर आपण काय करावे याचे मनापुढे कोणतेच कल्पनाचित्र नव्हते’ असे म्हणणारे केतकर, तेथील विद्यार्जन आटोपताच, जाई देशी, कार्यलागे स्वजनांच्या कल्याणा असे कृतनिश्चय होऊन परतले होते. अमेरिका आणि इंग्लंडमधील वास्तव्यातज्ञानकोशाचा उपयोग त्यांनी पाहिला होता. तयार ज्ञान तत्काळ हाताशी असणे याचा फायदा इंग्रजी सुशिक्षितांस सहज मिळत होता. तसा ज्ञानकोश मराठीच असावा असे त्यांना वाटू लागले. एन्सायक्लोपीडिया …

ज्ञानप्रसारक डॉ. केतकर

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांना आपण ज्ञानकोशकार म्हणतो. ते स्वतःही हे बिरुद मोठ्या आवडीने मिरवीत. पण केतकरांनी केवळ ज्ञानसंग्रह केला नाही. ज्ञानाचा विस्तार केला. प्रसार केला. तरी त्यांना ज्ञानकोशकार ही पदवी भूषणास्पद आहेच. कारण त्यांच्या आधी मराठीत कोणीही हा गड सर करू शकले नव्हते. हे काम त्यांनी ज्या अवधीत पूर्ण केले तो एकै विक्रम आहे. राजाश्रय …