प्रा. जयदेव डोळे - लेख सूची

हे ज्ञानिचि पवित्रता अखंड राहो

‘मराठवाडा’ या नावाने ३५ वर्षे आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ या नावाने १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या औरंगाबादेतील विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक मोठी घटना आहे. उच्चशिक्षण आधुनिक वळणाचे व काळानुरूप देण्याचा पाया मुंबईहून थेट मराठवाड्यात येऊन घालणारे डॉ. आंबेडकर आणि त्यांची दूरदृष्टी यांचे सुंदर फळ म्हणजे हा सुवर्ण महोत्सव ! बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाला …