प्रियदर्शन तुरे - लेख सूची

युटोपियन सोशालिस्ट; रॉबर्ट ओवन

एकोणविसाव्या शतकात युरोपातील स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. नेपोलियनसोबत नुकत्याच झालेल्या युद्धाची झळ सर्वदूर पोहोचली होती. सामान्य नागरिक अत्यंत हलाखीचे दिवस जगत होते. त्यातच माल्थसने भाकीत केलेली जागतिक आर्थिक मंदी खरोखरच सुरू झाली. बेरोजगारी प्रचंड वाढली आणि त्यासोबत हिंसाचाराच्या घटनासुद्धा. औद्योगिक क्रांतीची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यादरम्यानच भांडवलदारांनी स्वतःचा फायदा वाढविण्याकरिता नवनवे कायदे आणले ज्यामुळे …

ओळख अर्थशास्त्रज्ञांची (३) – डेविड रिकार्डो (१८ एप्रिल १७७२ – ११ सप्टेंबर १८२३)

अॅडम स्मिथ ने मांडलेल्या आशावादाला जेव्हा माल्थसने सुरुंग लावले तेव्हा बहुतांश लोकांना डेविड रिकार्डो च्या आशावादाने तारले. घरातून व समाजातून बहिष्कृत केलेल्या त्याच्या आयुष्यात त्याने एक अत्यंत यशस्वी उद्योजक, उत्तम गुंतवणूकदार व नंतर मोठा जमीनदार, ख्यातनाम अर्थशास्त्र- पंडित होण्याचा व आयुष्याच्या शेवटी शेवटी तर ब्रिटिश संसदेमध्ये जागा मिळवण्याचा मान मिळवला होता. अर्थशास्त्राचा प्रकांड पंडित म्हणून …

ओळख अर्थशास्त्रज्ञांची (२) – थॉमस रॉबर्ट माल्थस

अठराव्या शतकात राजकीय अर्थशास्त्राचे जनक मानले गेलेले अॅडम स्मिथ (Adam Smith) (१७२३-१७९०) यांच्या विचारांचा पगडा होता. जे काही बदल समाजात घडत आहेत, जी काही औद्योगिक प्रगती समाजात होत आहे ती सर्व मनुष्यजातीला वरदान ठरेल ही भावना जनसामान्यांत आणि विचारवंतां ध्ये रुजू लागली होती. हे सर्व बदल समाजाला एका आदर्श सामाजिक व्यवस्थेकडे घेऊन जातील हा विशास …

ओळख अर्थशास्त्रज्ञांची (१) – अॅडम स्मिथ

मनुष्यप्राणी जंगलातील झाडावरून खाली उतरला तेव्हापासून त्याला प्रत्येक पावलागणिक जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या सर्व अडचणींवर मात करीत करीत तो आजच्या स्थितीपर्यंत पोहोचला. हे साध्य करण्यासाठी त्याला बऱ्याच उपाययोजना कराव्या लागल्या. परंतु आजही जगातल्या सर्वांत श्रीमंत राष्ट्रात पसरलेल्या गरिबी, भेदाभेद, उच्चनीचता यावरून असे अनुमान काढावे लागते की हे उपाय अनेकदा तोकडे पडले. अनेक संकटातून माणूस …