बाळ सामंत - लेख सूची

इंग्लंडमधील कौटुंबिक जीवन

इंग्लंडमधील कौटुंबिक जीवनाचा शोध घेणे परदेशी पर्यटकाला शक्य नाही. परंतु त्याचे पडसाद त्यांच्या वृत्तपत्रात सतत ठळकपणे उमटत असतात. आमच्या मराठी वृत्तपत्रातच काय, आमच्या इतर सर्व भाषांतील वृत्तपत्रांत राजकीय पुढारी, त्यांचे राजकारण यावर जास्त भर असतो. ‘बड्या लोकांची गुप्त कृत्ये छापण्यास आमचे पत्रकार धजत नाहीत. ही ‘गुप्त कृत्ये उजेडात आणण्यासाठी परदेशी वृत्तपत्रांचे बातमीदार आणि त्या पत्रांचे …