इंग्लंडमधील कौटुंबिक जीवन

इंग्लंडमधील कौटुंबिक जीवनाचा शोध घेणे परदेशी पर्यटकाला शक्य नाही. परंतु त्याचे पडसाद त्यांच्या वृत्तपत्रात सतत ठळकपणे उमटत असतात. आमच्या मराठी वृत्तपत्रातच काय, आमच्या इतर सर्व भाषांतील वृत्तपत्रांत राजकीय पुढारी, त्यांचे राजकारण यावर जास्त भर असतो. ‘बड्या लोकांची गुप्त कृत्ये छापण्यास आमचे पत्रकार धजत नाहीत. ही ‘गुप्त कृत्ये उजेडात आणण्यासाठी परदेशी वृत्तपत्रांचे बातमीदार आणि त्या पत्रांचे संपादक आणि मालक राजी नसतात. पण दी टाइम्स, दी इंडिपेंडन्ट, डेली मेल, डेली एक्सप्रेस, गार्डीयन आदी वृत्तपत्रात सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांना प्राधान्य दिले जाते.
मध्यमवर्गीय इंग्रज कुटुंब, तसेच आमचे भारतीय वृत्तपत्रे विकत घेत नाहीत. लंडनच्या टाइम्सची रोजच्या अंकाची किंमत आहे वीस पेनी आणि रविवारच्या दोन किलो वजनाच्या आवृत्तीला एक पौंड द्यावा लगतो. यात टाइम्स लिटररी सप्लिमेंटचा समावेश नाही. लंडनच्या वास्तव्यात लंडन टाइम्सचे सातत्याने वाचन झाले. पण त्याव्यतिरिक्त अन्य वृत्तपत्रे राजूकडे येत, त्यातील ‘डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्रात टाइम्सपेक्षा कौटुंबिक जीवनाचे पडसाद तीव्रतेने उमटत. २४ ऑगस्ट १९९४ च्या ‘डेली टेलिग्राफ’ने भाग्यवान पिढी (fortunate generation) या मथळ्याखाली एक अग्रलेख लिहिला. यात ब्रिटनमधील मुलांच्या सामाजिक जीवनाची जी पाहणी केली गेली त्यातील निष्कर्ष सटीप मांडण्यात आले आहेत. इंग्लंडमध्ये पाच मुलांपैकी चार मुलांना आई आणि वडील या दोन पालकांकडे राहाण्याचे भाग्य लाभले आहे. या मुलांचे आणि त्यांच्या शिक्षकाचे संबंध खेळीमेळीचे आहेत. ही मुले आता पूर्वीपेक्षा उंच झाली आहेत. वीस वर्षांपूर्वी इंग्लंडमधील बरीचशी मुले प्राणघातक अपघातात सापडत. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे.
वीस वर्षांपूर्वपक्षा आता घटस्फोटाचे प्रमाण वाढल्यामुळे पाच मुलांपैकी एका मुलाला आई किंवा बाप याच्या सहवासात राहावे लागते. या वीस टक्के विभक्त कुटुंबातील १८ टक्के मुले आईजवळ राहातात तर दोन टक्के मुले बापाजवळ राहातात.
११ वर्षे वयाच्या एकूण ५० मुलांपैकी एक मुलगा आठवड्यातून एकदा दारू पितो. १५ वर्षे वयाच्या ५० मुलांपैकी तीन मुले आठवड्यातून एकदा दारू पितात. १४ वर्षे वयाच्या सात मुलांपैकी एक मुलगा ‘गर्द प्राशन करतो तर पंधरा वर्षे वयाची मुले या व्यसनाच्या आहारी गेली आहेत. ब्रिटनमध्ये लहान मुलांचा छळ ही एक भीषण सामाजिक समस्या आहे आणि हा छळ आई-बापांकडून होतो. अनेक वेळा यात आईचाच पुढाकार असतो.
पूर्वी ११ वर्षे वयाच्या मुलात धूम्रपनाचे व्यसन वाढले होते. आता ते एकचतुर्थाशावर आले आहे. १९८५ साली इंग्लंडमध्ये बालगुन्हेगारांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. पण १९९३ साली हे प्रमाण फारच कमी झाले. याचे कारण मात्र समजले नाही. आता इंग्लंडमधील सगळीच मुले टी. व्ही. ला चिकटून बसत नाहीत. आता ही मुले चित्रपटगृहात जातात. १० पैकी सात मुले आठवड्यातून एकदा तरी ग्रंथालयात जातात आणि त्यातील निम्मी मुले दर आठवड्यात ग्रंथालयात जातात. पाऊण टक्के मुले गृहपाठ तत्परतेने करतात.
आज ब्रिटनमधील मुलांना त्यांच्या आई-वडिलांना जेवढा पॉकेटमनी मिळत होता त्यापेक्षा जास्त पॉकेटमनी मिळतो. अर्थात त्यांच्या आई-बापांना त्यांच्या आई-बापांपेक्षा थोडा जास्त मिळत होता. ब्रिटनच्या इतिहासात आजची ही पिढी सर्वांत भाग्यवान आहे. या पिढीचे क्षितिज विस्तारले आहे आणि त्यांना भरपूर प्रवास करण्याची संधी मिळतेय! आणि त्यांच्या आजोबांना जसे युद्धात भाग घेणे अपरिहार्य झाले ती पाळी आता या पिढीवर येणार नाही.
ब्रिटनमधील दारिद्र्य
या अग्रलेखात ब्रिटनमध्ये गरीबांची संख्या बरीच आहे आणि त्यांचे जीवन कष्टप्रद आहे असे म्हटले आहे. या दारित्र्यावर प्रकाश टाकणारा एक लेख ‘दी इंडिपेंडन्ट’च्या २६ ऑगस्ट १९९४ च्या अंकात प्रकाशित झाला. त्याचा मथळा असा.‘एकूण लोकसंख्येच्या १० टक्के लोकांची आर्थिक साहाय्याची मागणी’.गेल्या तीन वर्षात दारिद्र्यरेषेखाली जगणार्या व्यक्तींची संख्या (१८ वर्षे वयावरील व्यक्ती ) ४० लक्ष होती ती आता ५० लक्ष ६० हजार एवढी झाली आहे. ब्रिटनची लोकसंख्या साडेपाच कोटीहून अधिक आहे. या दारिद्र्यरेषेखालील ५० लक्ष ६० हजार व्यक्तीपैकी १९ लक्ष वीस हजार व्यक्ती बेकार आहेत. साठ वर्षे वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती १७ लक्ष ३६ हजार. निराधार पालक १० लक्ष, अपंग ५ लक्ष आणि इतर ४ लक्ष.
डोनल्ड डेवर हा लेबर्स सोशल सिक्युरिटीचा प्रवक्ता म्हणतो, ‘नवरा-बायको आणि दोन मुले यांना आठवड्याला अवघ्या १९९ पौंड भत्त्यात जगणे अशक्य आहे. ब्रिटनमध्ये आयुर्मर्यादा वाढत असल्यामुळे वयोवृद्धांची संख्या वाढत आहे. दारिद्र्यात जीवन कंठणारे पाच लक्ष ब्रिटिश नागरिक हे ऐंशी वर्षांचे आहेत. ८० वर्षे वयाच्या पाच लक्ष ६४ हजार स्त्रिया दारिद्र्यात खितपत आहेत. निराधार आईबापांची संख्या ७५ हजार होती ती आता एक लक्षाहून अधिक झालीय. त्यातील दोन पंचमांश माता एकाकी जीवन जगत आहेत. यातील ४५ टक्के स्त्रियांना एक मूल आहे तर ३५ टक्के स्त्रियांना दोन मुले आहेत. १५ टक्के स्त्रियांना तीन मुले तर पाच टक्के स्त्रियांना चार मुले आहेत’.
स्त्रियांना असे एकाकी जीवन जगावे लागते याचे कारण युरोपातील घटस्फोटांचे दिवसेंदिवस वाढत असलेले प्रमाण. घटस्फोटाची ही साथ आता भारतातील सुशिक्षित
मध्यमवर्गीयातही आली आहे. कोट्यधीश मारवाडी कुटुंबातील मुली आता लग्नाला सहा महिने होण्यापूर्वीच घटस्फोट घेऊ लागल्या आहेत. क्षुल्लक कारणासाठी मराठी मध्यमवर्गीय मुली लग्न झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत घटस्फोट घेताहेत आणि यात नवण्यापेक्षा बायकाच पुढाकार घेत आहेत, आणि तेही माहेरच्या माणसांच्या पाठिंब्यावरआणि उत्तम नोकरीच्या हिमतीवर. ब्रिटनमध्ये आणि युरोपमध्ये प्रमाण वाढत आहे. त्यामुळे युरोप खंडात लग्न न करता केवळ मैत्रीच्या तत्त्वावर स्त्री-पुरुष बिनधास्त एकत्र राहू लागले आहेत. १९९० साली अमेरिकेत ११ लक्ष ७५ हजार घटस्फोट घेतले गेले, इंग्लंडमध्ये सव्वा लाखांहून अधिक तर रशियात ९ लक्ष. यातील जास्तीत जास्त घटस्फोट लग्नानंतरच्या पहिल्या चार वर्षातील असतात. उतार वयातील घटस्फोटाचे प्रमाण सर्वत्र अत्यंत अल्प असे आहे.
या घटस्फोटित स्त्रियांची समाजातील प्रतिष्ठा नाहीशी होते. युरोप-अमेरिकेत विवाहित स्त्रीला जशी मान्यता मिळते तशी मिळत नाही. अर्थात या पाट्र्यांची आमंत्रणे ‘श्री आणि सौं’ यांनाच उद्देशून पाठवलेली असतात. शक्यतो घटस्फोटित स्त्रीला अशा पाट्र्यांना आणि समारंभाला अर्थातच आमंत्रणे येत नाहीत. त्यामुळे पतीविना तिचे ‘सोशल लाईफ उद्धवस्त होते. ती एकाकी होते. आर्थिक स्वातंत्र्यामुळे ती पुरुषावर अवलंबून राहात नाही हे खरे असले तरी तिला जर मुले असली तर त्यांना एकट्याजवळ राहाणे फारच दुरापास्त होते, आणि त्यामुळे घटस्फोटित स्त्री आणि तिची मुले यांच्यात एक दुरावा निर्माण होतो.
अशी दुभंगलेल्या कुटुंबातील मुले वाममार्गाला लागतात. अमेरिकेत साठ टक्क्याहून अधिक शाळकरी मुले मद्यपान करतात. त्यामानाने इंग्लंडमध्ये हे प्रमाण कमी आहे. पण आता इंग्लंडमधील मुलांना ‘एडस् ‘चे भय भेडसावू लागले आहे. इंग्लंडमधील शाळांमध्ये विद्यार्थीनी जर गरोदर राहिली तर तिला शाळेत यायला बंदी होती. आता ती बंदी काढून घेण्यात आली असून गरोदर मुलींना वर्गात बसायची परवानगी आहे. इंग्लंडमध्ये कुमारी मातांचा प्रश्न वढतोय. कारण कुमारी मातांना सरकार राहायला जागा देते. त्यामुळे अनेक मुली बिनधास्त घरासाठी कौमार्यदशेत मातृत्व पत्करतात.
इंग्लंडमध्ये प्राथमिक शाळेत गर्द’चे व्यसन काही प्रमाणात आहे. व्यसनाला आळा घालून भावी पिढीचा बचाव करण्यासाठी पाच वर्षांच्या मुलांनाही ‘गर्द आणि त्याचे घातक परिणाम याचे शिक्षण देण्याचे ठरले आहे. कारण ही ‘गर्दची भयानक साथ आता माध्यमिक शाळांमधून प्राथमिक शाळातही आली आहे. या भयानक समस्येला तोंड कसे द्यावे आणि कोकेन आदी अंमली पदार्थांपासून शाळेतील मुलांचा कसा बचाव करावा या चिंतेने पोलीस. शिक्षणतज्ज्ञ आणि शासन संत्रस्त्र झाले आहे. शिक्षकांनी गर्दचे दुष्परिणाम याचे विद्याथ्र्यांना धडे द्यावे यासाठी लक्षावधी पौंड खर्च करण्याचे ब्रिटिश सरकारने ठरवले आहे. यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत गर्द’ या विषयाचे दुष्परिणाम सांगण्याचे धडे विद्यार्थ्यांना नियमितपणे देण्यात येणार आहेत. गर्द या व्यसनाच्या आधीन गेलेल्याविद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सहानुभूतीने वागून त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा एक कार्यक्रम आखण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक शाळेत हे कार्य चालू आहे की नाही याची तपासणी करण्यात येईल.
सायन्सच्या पुस्तकात ‘गर्द’ या विषयावर एक धडा अंतर्भूत करण्यात आला आहे. ब्रिटनच्या उत्तर-पश्चिम भागातील १५ ते १६ वर्षांच्या मुलांपैकी ७० टक्के मुलांना ‘गर्द। पासून परावृत्त करण्यासाठी दीड लाख पौंड मंजूर केले आहेत. मँचेस्टरचा पोलीसप्रमुख पॉल कुकचे म्हणणे असे आहे की, आता प्राथमिक शाळेतल्या मुलांनाही ‘ड्रग्ज’ म्हणजे काय हे चांगले माहीत झाले आहे. मचेस्टरमध्ये प्रत्येक शाळेच्या बाहेर एक पोलीस उभा असतो. त्या संदर्भात कुक म्हणतो, ‘Most of the kids know more about drugs than the officer at the front of the class room. The slogan ‘Dont take drugs’ simply hasn’t worked!’
ब्रिटनमधील तरुण पिढीचे अंतरंग एका स्थानिक वृत्तपत्रातील या कात्रणाने समजेल.
प्रश्न- माझा बॉय फ्रेंड मला सारखा छळतोय. माझ्याबरोबर झोप म्हणतो. पण मला भय वाटतं. पण मी जर माझं शरीर त्याला दिलं नाही तर तो मला सोडून जाईल.
उत्तर- सोळा वर्षे पूर्ण होईपर्यंत तुला असं ‘भलतं सलतं करता येणार नाही. कारण तो कायद्याने गुन्हा ठरेल. त्यामुळे निर्णय तुझा तूच घ्यायचा. त्याला स्पष्ट नाही म्हणून सांग. तो काही दिवस तुझ्याभोवती पिंगा घालील, पण लक्षात ठेव असं काही केलंस तर तो त्यानंतर तुला नक्कीच सोडून जाईल. (‘मिझ’ मासिक)
खप-१,८५,०००० अशी पत्रे दर आठवड्यास २००. उत्तर देणार – त्रिसिया क्रीटमन)
निराधार आई-बाप
इंग्लंड, युरोप आणि अमेरिका या राष्ट्रांत निराधार वृद्ध आई-बापांची समस्या फार भीषण झाली आहे. युरोप खंडात आई-बाप आपल्या मुलाला तरी स्वतंत्र बि-हाड करून देतात किंवा आपले घर मुलांच्या हवाली करून आपण अन्य ठिकाणी राहायला जातात. सून आणि मुलगा यांच्या कात्रीत सापडून आपली ससेहोलपट करून घेण्यापेक्षा दूर राहून मुलावर आणि नातवंडावर प्रेम करावे, असा ते सुज्ञ विचार करतात. म्हणजे त्यांना आपली कटकट नाही आणि त्यांचा आपल्याला सासुरवास नाही. परंतु अनेक वेळा यातील एखादी व्यक्ती मृत झाली तर एकाकी आई किंवा एकाकी बाप यांची परिस्थिती फारच बिकट होते. मात्र ब्रिटनमध्ये नॅशनल इन्शुअरन्सखाली मुले, विद्यार्थी, ६० वर्षांच्या स्त्रिया, ६५ वर्षांचे पुरुष यांना ८० टक्के वैद्यकीय अर्थसहाय्य मिळते. हे साहाय्य अपंग, आणि गरोदर स्त्रियांनाहीमिळते, पण आता या धोरणात काहीसा बदल करण्याचे शासनाने ठरविले आहे. असे दिसते.
आज ब्रिटनमध्ये ‘अल्झायमर’ या मेंदूच्या असाध्य रोगाने पीडलेले साडेतीन लाख रोगी आहेत आणि डिमेन्टिया या मेंदूच्या रोगाने पछाडलेले ३ लाख रोगी आहेत. माणसाची स्मृती नाहीशी होण्यापासून या रोगाने सुरुवात होते. पण शासनाने इस्पितळातील खर्च कमी करण्यासाठी ज्या सुधारणा अंमलात आणण्याचे ठरविले आहे त्यामुळे इस्पितळातील वयोवृद्ध रुग्णांना उपलब्ध असणाच्या खाटांची संख्या कमी होणार. सरकारने नॅशनल हेल्थ स्कीमचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे अशी टीका विरोधी पक्षीयांनी केली. ज्या रुग्णाकडे तीन हजार पौंडापेक्षा जास्त ठेव बँकेत असेल त्याला उपचारांचा फक्त खर्च द्यावा लागणार आहे. शिवाय एकाच रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ ठेवायचे नाही, असे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे मेंदूच्या रोगाने त्रस्त अशा रुग्णांची फार पंचाईत होईल. कारण हा दीर्घकालीन असाध्य आजार आहे आणि हे रुग्ण सर्वजण सत्तर ते ऐशी वर्षे वयाचेआहेत.
अमेरिकेत तर वृद्धांच्या आरोग्यावर पैसा खर्च न करता तो पैसा तरुण माणसांच्या आरोग्यासाठी खर्च करावा, असे मत रूढ झाले आहे. युरोप खंडात आणि ब्रिटनमध्ये वृद्धांचे कष्टमय एकाकी जीवन पाहता असे दिसते की काही दिवसांनी भारतासारख्या देशात ही वृत्ती बोकाळणार. परवाच मला एक सेवानिवृत्त महाराष्ट्रीय गृहस्थ म्हणाले, ‘माझी पत्नी एकाएकी गंभीर आजारी झाली, तेव्हा माझा कर्तासवरता मुलगा बेफिकीरीने म्हणतो, “मलाआई-बाप नाहीच असे मी समजतो!’ पश्चिमेचे वारे इथे पोहोचले याची ही साक्ष!
(लोकसत्ता’वरून साभार)
दक्षिण महाराष्ट्रातील मुस्लिमांचे सामाजिकसर्वेक्षण अहवाल
कोल्हापुरातील मुस्लिम समाज प्रबोधन व शिक्षण संस्था या स्वयंसेवी संस्थेने, १९९१-९२ मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील २२ शहरे व १४६ गावात ५००० मुस्लिम कुटुंबांचे (२८११६ व्यक्ती) सामाजिक शैक्षणिक सर्वेक्षण केले. मुस्लिम समाजाचे राहणीमान, सामाजिक धार्मिक परिस्थिती, सामाजिक दृष्टिकोन आणि मुस्लिमांचे शिक्षण व व्यवसाय या बाबतीतमाहिती या सर्वेक्षणाद्वारे गोळा करण्यात आली. मुस्लिम समाजाची वास्तविक परिस्थिती जाणून घेण्याबरोबरच या माहितीवर आधारित काही विकास प्रकल्प हाती घेण्याचे उद्दिष्ट या सर्वेक्षणामागे होते.
या सामाजिक सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभाग व सांख्यिकी विभाग यांचे तांत्रिक साहाय्य व तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांतचे संपर्कासाठी साहाय्य लाभले. प्रत्येक जिल्ह्यातील काही शहरे व काही तालुक्यांतील काही गावे निवडून त्या गावातील मुस्लिम लोकसंख्येच्या व नमुना (सॅपल) संख्येच्या टक्केवारीच्या तुलनेत गावातील किंवा मोहल्यातील एक श्रीमंत, तीन मध्यमवर्गीय व सहा गरीब कुटुंबे निवडून त्यातील कुटुंब सदस्याकडून माहिती गोळा करण्यात आली. माहिती देणार्याग व्यक्तींपैकी ७१.३६% स्त्रिया होत्या. उरलेले २८.६६% पुरुष होते. शिवाय यांपैकी २३.३४% अशिक्षित होते. ६४.५६% मध्यम शिक्षित होते. १२.१०% उच्च शिक्षित होते.
कुटुंब सदस्यांची माहिती
या ५००० कुटुंबातील आढळलेल्या सर्व २८११६ सदस्यांची वय, लिंग, शिक्षण आणि व्यवसाय याबाबतची काही माहिती या सर्वेक्षणात गोळा करण्यात आली. यातून आढळले की, प्रत्येक कुटुंबात सरासरी ५.६ व्यक्ती होत्या. एकूण संख्येपैकी १४२४९ (५०.६८%) पुरुष आणि १३८६७ (४९.३२%) स्त्रिया होत्या. यावरून लक्षात येते की स्त्रियांचे दर हजारी प्रमाण ९७३ आहे. वयाच्या दृष्टिकोनातून एकूणात ११४६६ अठरा वर्षांखालील मुले (६३०२ मुलगे, ५१६४ मुली), ७५८१ पुरुष (१८ ते ६० वयोगट) व ९७२ हे ६० वर्षावरील वृद्ध स्त्रीपुरुष होते.
मुले
एकूण मुलांमध्ये (११४६६) २६२२ मुले ही ५ वर्षांखालील होती व उर्वरित ८८४१ ही ५ ते १८ वयोगटातील होती. या ८८४१ मुलांपैकी ७५६३ (८५.५४%) विद्यार्थी होते, आणि बाकी १२७८ (१४.४५%) शाळेत न गेलेली/न जाणारी मुले होती. यांपैकी २६२ (२.९६%) बालमजूर, ४६९ (५.३०%) किरकोळ घरगुती कामे करणारी, ५४७ (६.१८%) रिकामी मुले होती.
शिक्षणाच्या दृष्टीने विचार केल्यास ४०२ (४.५५) अशिक्षित म्हणजे मुळात शाळेत न गेलेली, ७७३१ (८७.४४%) शालेय शिक्षण घेणारी, ४६१ (५.२१%) एस्. एस्सी. नंतर शिक्षण घेणारी आणि २४७ (२.७५%) ही एस्. एस्सी. पर्यंत उर्दू माध्यमात शिकणारी मुले होती.
पुरुष
एकूण सदस्य संख्येत १८ ते ६० वयोगटातील जे ७५८१ पुरुष आढळले त्यांपैकी९२८ (१२.२४%) अशिक्षित, ५३५६ (७०.६५%) एस्. एस्सी. च्या आत शिक्षण घेतलेले, ८६५ (११.४१%) एस्. एस्सी. ते १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेले पुरुष आढळले. २६३ (३.४७%) पदवीधर, १४५ (१.९१%) इतके पदव्युत्तर शिक्षण घेणारे, ४१ इतर पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, ९ व्यावसायिक शिक्षण घेत असलेले आणि २४ इतर पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले पुरुष आढळले. याशिवाय एकूणात २४ (०.३२%) धार्मिक शिक्षणघेतलेले आढळले.
या सर्व पुरुषांच्या व्यवसायाचा विचार करता १३९३ (१८.३७%) शेती व्यवसायात, २३० (१३.१३%) मजूर, (३३.८२%) छोटे धंदेवाईक, १८८६ (२४.८८%) खाजगी नोकर्या, करणारे, ३१६ (४.१७%) शासकीय-निमशासँकीय नोकर, १२४ (१.६३%) शिक्षकी पेशात ८ (०.१० %) डॉक्टर्स ५, (०.०७%), इंजिनिअर्स ६ (०.०८%) वकील आढळले, आणि उरलेल्यातील ३२६ (४.३६%) विद्यार्थी व ७१६ (९.४४%) पूर्ण बेकार आढळले. हे मुद्दाम नमूद केले पाहिजे की या ७५८१ पुरुषापैकी ४६ जणांनी २ व दोघांनी तीन लग्ने केली होती. म्हणजे एकूण ४८ (०.६३%) हे एकापेक्षा अधिक लग्ने करणारे आढळले.
स्त्रिया
एकूण ८२७७ प्रौढ, म्हणजेच १८ ते ६० वयोगटातील, स्त्रियांपैकी ३६६६ (४४.२९%) अशिक्षित, ४०२८ (४८.६६%) एस्. एस्सी.. च्या आत शिकलेल्या, २६३ (३.१७%) एस्. एस्सी. ते १२ वी पर्यंत शिकलेल्या, १११ (१.३४%) पदवीधर, २२(०.२६%) पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या (त्यापैकी ११ तांत्रिक शिक्षण घेतलेल्या) आणि ९८७ (२.२६%) एस्.एस्सी पर्यंत उर्दूतून शिक्षण घेतलेल्या स्त्रिया आढळल्या. या स्त्रियांच्या व्यवसायाबाबत असे आढळले की ७६४७ (९२.३९%) घरकाम करणार्याआ, १५३ (१.८५%) किरकोळ धंदा, २२१ (२.६७%) मजुरी, ५७ (०.६९%) खाजगी नोकरी, आणि २ (०.०२%) या शासकीय निमशासकीय नोकरी करणार्या८ आढळल्या,आणि ४० (०.४८%) शिक्षिका, ५ (०.०६%) डॉक्टर्स होत्या. तसेच १०६ (१.२८%) शिकत असलेल्या, १६ (०.१९%) शेती व्यवसायात असलेल्या, व ३० (०.३६%) स्वतःस बेकार समजणाच्या आढळल्या. या सर्व स्त्रियांमध्ये १२२ (१.३७%) तलाकपीडित स्त्रिया आढळल्या.
कुटुंबाविषयी माहिती
राहणीमानः- या विभागातील मुस्लिमांच्या आवासाचा विचार करता ४.७६% कुटुंबे झोपड्यांत, ३७.५७% कुटुंबे कच्च्या घरात, ५३.४४% कुटुंबे दगडामातीच्या घरांत आणि ४.२२% कुटुंबे पक्या घरांत राहताना आढळली. बोलीभाषेबाबत, ९०.३२%, मुसलमानी भाषा, ५.९४% उर्दू भाषा, २.०८% कुटुंबे मराठी व १.६६% कुटुंबे इतर भाषा बोलतात असे आढळले, ५९.५८% कुटुंबे मराठी माध्यमात, १०.२४% कुटुंबे उर्दू माध्यमात, १४.४६% कन्नड, गुजराथी इ. भाषांच्या माध्यमात, १३.०२% इंग्रजी माध्यमात शिकलेली, शिकताना आढळली. शिवाय १२.४८% कुटुंबे उर्दू माध्यमात व १०.९८%कुटुंबे मदरशात शिकताना/शिकलेली आढळली.
एकूण कुटुंबांपैकी ६४.०२% कुटुंबांचा पारंपारिक व्यवसाय होता. पण त्यापैकी ३८.६२% कुटुंबे अद्याप हे व्यवसाय करीत होती. यामध्ये ३५.९८% शेती हा पारंपारिक व्यवसाय म्हणून करणार्यां८ना समावेश होता. विविध सरकारी कल्याण योजनांचा लाभ ४.४४% कुटुंबांनाच मिळालेला आढळला व बाकी ९५.५४% कुटुंबे अशा लाभापासून वंचित राहिलेली आढळली. एकूण कुटुंबांपैकी ९४.८२% कुटुंबे मतदानात भाग घेतात. ३.०६% कुटुंबांच्या सदस्यांनी वेगवेगळ्या निवडणुकांत भाग घेतला होता.
सामाजिक धार्मिक स्थिती
एकूण कुटुंबापैकी ३८.५२% कुटुंबे ही एकत्रित कुटुंबे आढळली. ५३.३०% कुटुंबांचा तबलीग जमात चळवळीशी पूर्णाशाने किंवा अल्पांशाने संबंध होता. ६६.४०% कुटुंबे उरूस साजरा करतात आणि ५४.४६% कुटुंबे स्थानिक देवदेवतांच्या यात्रांत सहभागी होतात.
सामाजिक दृष्टिकोन
एकूण कुटुंबांपैकी ७२.२६% कुटुंब प्रतिनिधींनी मुलींच्या शिक्षणाच्या बाजूने मत दिले. ५३.६८% प्रतिनिधींना कुटुंबात मुलगा असणे आवश्यक वाटले. सर्वात जास्त म्हणजे ४६.९०% ना लग्नासाठी मुलगा पाहताना त्याची आर्थिक स्थिती महत्त्वाची वाटली. तसेच सर्वांत जास्त २४.३०% ना मुलगी पाहाताना तिचे शिक्षण महत्त्वाचे वाटले. एकूणात ७७.९६% कुटुंब प्रतिनिधींना २१ ते २५ हा मुलांच्या व ८९.०८% ना १६ ते २० हा मुलींच्या लग्नासाठी योग्य वयोगट वाटतो.
एकूण ७२.४६% कुटुंबाना कुटुंब नियोजन गरजेचे वाटते. शिवाय ६१.४०% कुटुंबांनी प्रत्यक्षात कुटुंब नियोजन केले आहे. मुस्लिम व्यक्तिगत कायदा व अलिकडे शाहबानो प्रकरणात त्याबाबत झालेला बदल गाबाबत फक्त ३५.३६% कुटुंब प्रतिनिधींना माहिती आहे. ६४% कुटुंब प्रतिनिधींना तलाकपीडित स्त्रीला पोटगी देण्याची जबाबदारी नवर्या३वर असावी असे वाटते. ६८.३०% ना मुस्लिम कायद्यातील द्विभार्यापद्धती अनुचित असल्याचे वाटते व ६५.१८% ना तलाकची पद्धत चुकीची वाटते.
एकूण कुटुंब प्रतिनिधींपैकी ९२.९४% ना कुटुंबांत २ ते ३च मुले असावीत असे वाटते. ३१.९६% कुटुंब प्रतिनिधींना या समाजाचे सामुदायिक प्रश्न जास्त महत्त्वाचेवाटतात, तर २९.७९% ना आर्थिक प्रश्न महत्वाचे वाटतात, आणि फक्त १.३०% ना धर्माबाबतचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात.
एकूण वरील सर्व माहितीवरून असे आढळले की या भागातील मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती दारुण आहे, सामाजिक दृष्टिकोन व्यवहारवादी आहे, आणि या समाजाबाबत सध्या प्रचलित असलेल बरचेसे समज खोटे आहेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.