मायकेल क्रिक्टन - लेख सूची

सुप्रजननाचा इतिहास

अशी कल्पना करा की एक नवे वैज्ञानिक तत्त्व एका येऊ घातलेल्या आपत्तीची सूचना देते आहे, आणि त्या आपत्तीपासून वाचायचा मार्ग सुचवते आहे. तत्त्वाला अनेक अग्रगण्य वैज्ञानिकांचा, राजकारण्यांचा आणि मान्यवरांचा (Celebrities) आधार मिळाला आहे. अनेक दाते संशोधनासाठी देणग्या देत आहेत, आणि विख्यात विद्यापीठे संशोधन करत आहेत. आपत्तीबद्दल माध्यमे अहवाल देत आहेत. नवे वैज्ञानिक तत्त्व शालेय अभ्यासक्रमांत …