मायकेल सँडल (अनुवाद : अनुराधा मोहनी) - लेख सूची

बहुजनहितासाठी नवे राजकारण

[मायकेल सँडल यांचे चौथे व शेवटचे व्याख्यान ‘बहुजनहितासाठी नवे राजकारण’ ह्या विषयार होते. हे व्याख्यान अमेरिकेच्या राजधानीत, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत झाले. व्याख्यानाची पूर्वपीठिका अशी, की इंग्लंड व अमेरिका हे दोन्ही बलाढ्य देश लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. परंतु असे असले तरी ह्या दोन्ही देशांचे राजकारण सकृत्दर्शनी परस्परविरोधी दिसणाऱ्या टोकांमध्येच, म्हणजे प्रत्यक्षात एकाच रिंगणात अडकून पडले …