मॅट रिडली - लेख सूची

मनुष्यस्वभाव : एकीतली विविधता

आपण आपल्या भूतकाळाने घडवलेले असतो-डार्विनच्या उत्क्रांतीबाबतच्या मांडणीत ही एक कळीची संकल्पना आहे. आपण देवाने आपल्याला घडवले असे न मानताही आपण घडवले गेलेलो आहोत असे मानू शकतो. आपल्या पूर्वजांच्या पुनरुत्पादनाच्या (प्रजननाच्या) निवडीतून आपण अजाणताच काही विशिष्ट जीवनशैलीसाठी घडवले जातो. एका सामाजिक, द्विपाद, मूळच्या आफ्रिकन कपीच्या आयुष्यक्रमासाठी मानवी स्वभाव घडलेला आहे. अशीच माणसाची पचनसंस्थाही एका सर्वाहारी, मांसाहाराची …