राम आपटे - लेख सूची

परिवर्तन: उन्नत मानवतेकडे झेप

प्रस्थापित व्यवस्थेचा इतका जबरदस्त पगडा समाजातील सर्वांवर—सामान्य जनांवर आणि त्यांच्या नेत्यांवर— असतो की ही सर्व मंडळी प्रस्थापित रीती व मूल्यांप्रमाणे वागत असताना, त्यातील दोष व चुका त्यांना दिसत असूनही, तो रुळलेला मार्ग सोडायला तयार होत नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये माणसे इतकी गुंतून राहण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण असे की त्या व्यवस्थेने मान्य केलेल्या सुख-कल्पना, त्या कल्पनांतील सुखप्राप्तीची …

विवेकासाठी चळवळ हवी!

व्यक्तिजीवन आणि समाजजीवन सुख-शांतीचे व्हावयाचे असेल तर त्यासाठी विवेकाच्या संगोपन-संवर्धनाची नितान्त आवश्यकता आहे. बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा आणि विवेक या संकल्पना परस्परांच्या फार जवळ आहेत. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण आणि बुद्धिप्रामाण्य यांना सोडून विवेक असू शकणार नाही आणि विवेक नसेल तर खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्य असू शकणार नाहीत. विवेक ही अधिक व्यापक अशी जीवनसंवर्धक संकल्पना आहे. विवेकाची सविस्तर …