र. अ. देशमुख - लेख सूची

न्यायाधीश आणि अंधश्रद्धा

सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या घटनेत विशेष स्थान आहे. आजकाल ज्या घटना घडत आहेत त्यामुळे तर त्या न्यायालयाबद्दलचा नागरिकांचा आदर अनेकपटींनी वाढला आहे व अपेक्षाही वाढल्या आहेत. अशा वेळी या न्यायालयाचे पद भूषविणारे एक न्यायाधीश के. रामस्वामी यांनी नुकत्याच दिलेल्या एका निकालातील विधाने आश्चर्यजनक आहेत. भूमिसंपादनाचे हे प्रकरण शिरडीच्या साईबाबा संस्थानचे. या संस्थानाला शिरडीचे साईबाबा मंदिर व …