लोकमत - लेख सूची

उलटे नियोजन

पाणी हवे आणि वीजही हवी; पण वीजनिर्मितीला पाणी देण्याची आमची तयारी नाही. पाणी संपले, तर औरंगाबादची तडफड बघवणार नाही, अशी भीती सर्वांना वाटते, ती अनाठायी नाही. परळी विद्युत केंद्रातील तीन संच आधीच बंद पडले आहेत. एक संच चालू आहे; पण त्याला पाणी कमी पडते. नाथसागराचे दरवाजे उघडले, परंतु तहानलेल्या औरंगाबादकरांच्या रेट्यापुढे ते बंद करावे लागले. …