वा. रा. जहागीरदार - लेख सूची

समान नागरी कायदा आणि शरीयत

न्यायमूर्ती हरिनाथ तिलहरी यांनी दि. १२ एप्रिल ९४ रोजी तलाकबाबत जो निकाल दिला त्याचे उलट सुलट पडसाद संपूर्ण मुस्लिम समाजात उमटत असून पूर्वीच्या शहाबानो प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरणही गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. पुरोगामी विचारवंत श्री. असगरअली इंजीनीअर यांनी निकालाचे स्वागत केले असून सय्यद शहाबुद्दीन व अन्य मुस्लिम विचारवंतांनी टीका केली आहे. न्यायालयासमोर मूळ प्रश्न तलाकचा …