विठ्ठल सी. नाडकर्णी - लेख सूची

अशरीरी आत्मा (?)

दहा वर्षांपूर्वी आम्ही सूझन ब्लॉकमोअरला तिच्या ससेक्स परगण्यातल्या ‘पेअरट्री कॉटेज’मध्ये भेटलो. त्यावेळी शरीरबाह्य अनुभव (out of body experiences उर्फ OBE) या क्षेत्रात संशोधन करणारी ती बहुधा जगातली एकुलती एक परामानस शास्त्रज्ञ (Parapsychologist) होती. शरीरबाह्य अनुभव म्हणजे आपण आपल्या शरीरबाहेरून शरीराकडे पाहत असल्याचा अनुभव. यासारखाच एक प्रकार म्हणजे मृत्यूच्या निकटचे (near death) अनुभव, किंवा NDE. वैद्यकीयदृष्ट्या …